आज ९ जुलैला बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात झाली. बीएसई सुरु होण्याआधी २५ वर्षांपासून शेअर ट्रेडींग सुरु होतं. शेअर बाजाराला आजही अनेकजण घाबरतात. कारण हा सेन्सेटीव इंडेक्स आहे. आकडे खाली वर होतात तेव्हा अनेकांचं हजार, लाख नाहीतर अब्जावधींनी नुकसान होतं. सध्या कोरोना वायरसमुळे आपला सेन्सेक्सही मंदावलाय.
कोरोना वायरसमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झालेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येतोय. आपला सेन्सेक्स मंदावतोय.. सेन्सेक्स हे बीएसई अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाला म्हणतात. बीएसई हे शेअर बाजार आजच्याच दिवशी १८७५ ला सुरु झालं. आज जगातला सगळ्यात मोठा दहावा बाजार आहे. पण त्याकाळात सुरु झालेला आशियातला पहिला शेअर बाजार होता.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरवात कॉटन किंग यांनी केलं. कॉटन किंग म्हणजे कपड्यांचा ब्रँड नाही तर त्याकाळातले कापसाच्या व्यापारातले किंग समजले जाणारे व्यावसायिक प्रेमचंद रायचंद यांनी सुरु केलं. १८३१ ला सुरतहून मुंबईला आले. त्यांनी शेअर ब्रोकर म्हणून कामाला सुरवात केली. पण १८४० पासून कमर्शिअल स्टॉक एक्चेंजमधे काम करू लागले.
पुढे त्यांनी १८५० ला नेटीव शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन सुरु केलं. याचंच पुढे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं नामकरण झालं. फोर्टमधल्या टाऊन हॉलसमोर जिथे आज हार्मोनिअम सर्कल आहे तिथे पूर्वी वडाचं झाड होतं. त्या वडाखाली पहिली सभा झाली. सुरवातीची अनेक वर्षं तिथेच सभा होतहोती. पुढे ब्रोकर्सची संख्या वाढल्यामुळे एमजी रोडवरच्या वडाखालीही सभा घेतली. ज्याचं नाव त्यावेळी मिडॉज स्ट्रीट असं होतं. पण शेवटी १८७४ ला त्यांना आपली हक्काची जागा मिळाली ज्याला आजही आपण दलाल स्ट्रीट म्हणूनच ओळखतो.
हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?
मग काय त्या दलाल स्ट्रीटवर नेटीव शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशनची स्थापना करून आशियातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज बनवलं. देश स्वातंत्र्य झाल्यावर ३१ ऑगस्ट १९५७ ला सरकारने सिक्युरीटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अँक्टच्या अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नाव दिलं आणि देशातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज म्हणून मान्यताही मिळाली. पुढे १९८० पासून फिरोज जीजीभाई टॉवर हे बीएसईचं हेडक्वार्टर बनलं. जी बिल्डिंग आपण जाता येता किंवा बातम्यांमधे आपण बघतो.
बीएसईच्या शेअर बाजाराची मोजणी म्हणजे इंडेक्स. या इंडेक्सला १९८६ पासून सेन्सेक्स म्हणू लागले. यामुळेच सेन्सेक्सने उसळी घेतली किंवा आपटलं अशी बातमी आल्यावर आपण समजून जातो की हे आकडे बीएसईचे आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार बीएसईने १९९५ पासून इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुरु केलं.
हेही वाचा : कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?
या शेअर बाजाराने अनेकांना कधी राजा बनवलं तर कधी भिकारीही बनवलं. शेअर बाजारामुळे सगळ्यात मोठा परिणाम गुंतवणूकीवर होतो. देश आणि परदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीचा त्याचा परिणाम होत असल्यामुळे देशातल्या अनेक प्रकल्पांवर परिणाम होतो. कंपन्यांचा नफा तोटा यावर अवलंबून असतो. त्यामुळे याला सेन्सेटिव इंडेक्स असंही म्हणतात. कंपन्यांच्या मालकांना या खाली वर होणाऱ्या आकडेवारीवरुन झटके बसतात.
आता बजेट सादर झाल्यानंतरही सेन्सेक्स खाली आलाय. ८ जुलैला शेअर बाजार बंद होताना ७९२ अंकांनी कमी झाला. सेन्सेक्स घसरण्याचं कारण बजेटच आहे. बजेटमधे इम्पोर्ट, एक्सपोर्टची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवण्यात आले आणि शेअर बाजारातल्या कंपन्यांचे पब्लिक शेअर होल्डिंग २५% वरुन ३५ टक्के केलं ही शेअर बाजार घसरण्याची सगळ्यात मोठी कारणं आहेत.
हेही वाचा :
पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?
२६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाण
येणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला?
अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
मोदी सरकार प्रोत्साहन देत असलेली इलेक्ट्रिक कार आपणही घेऊ शकतो?