कोरोनाच्या संकटात अडकलेल्या अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येनंतर दंगल उसळलीय. ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलन सुरू झालंय. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. आज अमेरिकेतल्या दंगलींचं काळंपांढरं करताना आपल्याला भारतीय सामाजिकतेचं वास्तव तपासून बघावं लागणार आहे.
कोरोना संकटाच्या सावटाखालीच यंदा नोव्हेंबरमधे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी कामाला लागलेत. पण या निवडणुकीआधीच ते वेगवेगळ्या वादात सापडत आहेत. एक वाद संपत नाही तोच नवा वाद उकरून काढत आहेत किंवा त्याला खतपाणी घालण्याचं काम ट्विटरवरून चोखपणे पार पाडत आहेत.
कोरोनानं अमेरिकेतल्या चार कोटी लोकांना बेरोजगार केलंय. अशाच एका बेरोजगार कृष्णवर्णीय तरुणावर एक बनावट नोट व्यवहारात आणल्याच्या आरोपावरून आता अमेरिका पेटलीय. या ४५ वर्षांच्या जॉर्ज फ्लॉईडच्या मानेवर पोलिसाने गुडघा दाबत त्याचा जीव घेतल्याचा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. ८ मिनिटं ४६ सेकंदाच्या या वीडियोत जॉर्ज पाच मिनिटांत १५ वेळा 'आय कान्ट ब्रिद' म्हणजे मी श्वास घेऊ शकत नाही असं म्हणतो. २४ मे रोजी मिनेसोटा राज्यातल्या मिनेपोलिस इथं घडलेल्या या हत्येविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरलेत. आता ‘आय कान्ट ब्रिद’ हाच ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ या चळवळीचा नारा झालाय.
हेही वाचा : लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?
अमेरिकेतल्या जवळपास १४० शहरांत आंदोलनांचा भडका उडालाय. ४० शहरांत कर्फ्यू लावण्यात आलाय. न्यूयॉर्क शहरात तर जवळपास ७० वर्षांनी कर्फ्यू लागू झालाय. 'ब्लॅक लाईव्ज मॅटर' म्हणजे कृष्णवर्णीय लोकांचाही जीव गोऱ्यांइतकाच महत्त्वाचा आहे, या २०१२ मधे सुरू झालेल्या चळवळीच्या नेतृत्वात ही आंदोलनं सुरू आहेत. प्रकरण आणखी चिघळल्यास देशात नॅशनल सिक्युरिटी गार्ड तैनात करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. अमेरिकेत आधीच लॉकडाऊन उठवण्यासाठी आंदोलन सुरू आहेत.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी इकॉनॉमीला रिस्टार्ट करण्यासाठी ट्रम्प यांची धडपड सुरू आहे. देशातला कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वेगाने वाढतोय. आतापर्यंत जवळपास २० लाख जणांना कोरोनाची बाधा झालीय. तर सव्वा लाखाच्या घरात लोकांचा मृत्यू झालाय. तीसेक हजार लोक हे आयसीयूमधे आहेत. या संकटावर कसं नियंत्रण मिळवायचं याचं काहीच उत्तर अमेरिकेला सापडत नाहीय.
सार्स, स्वाईन फ्लू सारखं आरोग्य संकट असो, की २००८चं आर्थिक संकट, अशा संकटकाळात अमेरिकनं जगाचं नेतृत्व केलं. तसंच जगाला सहीसलामत या संकटातून बाहेरही काढलं. पण आता हीच अमेरिका ट्रम्प यांच्या दादागिरीमुळे नेतृत्वहीन झाल्यासारखी दिसतेय.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
ग्लोव्ज घातल्याने कोरोनापासून आपलं संपूर्ण संरक्षण होतं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोना संकटात राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाला संबोधित करताना त्यांनी नवा वाद निर्माण केला. सध्याच्या हिंसाचाराच्या काळात ट्रम्प यांनी देशाला संबोधित करावं अशी मागणी नागरिक करत आहेत. पण वाचाळवीर ट्रम्प पुन्हा काही तरी घाण करतील म्हणून त्यांचे काही सल्लागार याला विरोध करत आहेत.
देशाला संबोधित करायचं सोडाच ट्रम्प आंदोलकांना भिऊन व्हाईट हाऊसमधल्या बंकरमधे लपून बसले, अशी बातमी न्यूयॉर्क टाईम्सने दिलीय. २००१मधे वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर विमान हल्ला झाला तेव्हाही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना सुरक्षा दलानं असंच बंकरखाली लपवून ठेवलं होतं. यावरून अमेरिकेतल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
१९६३मधे कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या नेतृत्वात वॉशिंग्टन डीसीवर अडीच लाख लोकांचा मोर्चा गेला होता. त्यानंतरचं हे सगळ्यात मोठं आंदोलन मानलं जातंय. काळेगोरे वादावरून अमेरिकेत आतापर्यंत चार गृहयुद्धं झालीत. त्याची पुनरावृत्ती होईल, अशी मांडणी काही अभ्यासक करत आहेत.
हेही वाचा : डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?
परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन ती आटोक्यात आणण्याऐवजी ट्रम्प आंदोलनाच्या आगीत तेल ओतत आहेत. आंदोलकांना दंगलखोर म्हणत आहेत. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन यासारख्या नामांकित माध्यमसमूहांवर फेकन्यूज पसरवण्याचे आरोप करत सुटलेत. जगाला सुसंस्कृतपणा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारी अमेरिका ट्रम्प यांच्या वाचाळपणामुळे सैरभैर झालीय.
असं असलं तरी राष्ट्राध्यक्षाचं वागणं हाताबाहेर जात असल्याचं बघून काही अमेरिकन संस्था आणि अधिकारीही ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. ट्विटरनं जगातल्या सर्वशक्तिमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचं आंदोलकांना चेतवणारं ट्विटच बेकायदेशीर ठरवत हाईड केलंय. हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी 'ब्लॅक लाईव्ज मॅटर'मधे सहभागी होत 'आय कान्ट ब्रिद'चा नारा दिलाय. येत्या निवडणुकीत शहाणपणानं मतदान करण्याचं आवाहन केलंय.
या सगळ्यात ह्युस्टन राज्याचे पोलिसप्रमुख आर्ट एक्वेडो यांनी तर ट्रम्प यांना खूपच कठोर शब्दांत सुनावलंय. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, ‘मला देशातल्या पोलिस प्रमुखांच्या वतीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक गोष्ट सांगायचीय. सांगण्यासारखं चांगलं काही करता येत नसेल तर कमीत कमी तोंड तरी बंद ठेवा. इथं कोणी कुणाला हरवलं, कोण जिंकलं, हा मुद्दाच नाही. हा मनं जिंकण्याचा विषय आहे.’
ट्रम्प मात्र मनं जिंकण्याऐवजी गोऱ्यांच्या जीवावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत. आंदोलकांना उचकावत आहेत. पोलिस मात्र आंदोलकांना प्रेमाने सामोरे जात, आम्ही तुमच्या भावनांसोबत असल्याचं सांगत आंदोलकांना धीर देत आहेत. ह्युस्टनच्या पोलिसप्रमुखाच्या प्रतिक्रियेकडेही आपल्याला अमेरिकी सुसंस्कृतपणाच्या या नजरेतूनच बघावं लागतं.
हेही वाचा : अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
अमेरिकेत कृष्णवर्णीयांना भेदभावांसोबतच जगावं लागतंय. त्याविरोधात वेळोवेळी आंदोलनंही होतात. पण आताचं आंदोलन या साऱ्या भेदभावांविरोधातला शेवटचा घाव समजला जातोय. त्यामुळेच या आंदोलनात अमेरिकेतलं सामुहिक शहाणपण पणाला लागल्याचं दिसतंय.
सोशल मीडिया, टीवी चॅनल यावरचे वेगवेगळे वीडियो, फोटो बघितले तर या आंदोलनाचा चेहरा हे काळे लोक असल्याचं दिसतं. पण या आंदोलनात गोऱ्या लोकांचा सहभाग काळ्यांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे आज हा निव्वळ वर्णभेदविरोधी लढा नाही, तर विषमतेविरुद्ध हक्कांचा लढा बनलाय. निव्वळ काळे-गोरे एवढ्यापुरता मुद्दा असता तर लोक कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले नसते. हा त्यांच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा लढा आहे. अमानवी जगण्यापेक्षा न लढून मरू, या भूमिकेतून हा संघर्ष सुरू आहे.
म्हणूनच आज अमेरिकेतल्या दंगलींचं काळंपांढरं करताना आपल्याला भारतीय सामाजिकतेचं वास्तव तपासून बघावं लागणार आहे. माणसाची केवळ जात आणि धर्म बघून होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आपल्या देशांतले बहुसंख्यांक आपल्या जीवाची बाजी लावत कधी सरसावणार आहेत?
हेही वाचा :
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी क्रिकेटने मदत केली तेव्हा,
राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण