दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स

१९ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


लॉकडाऊन संपल्यानंतर भारतात आणि जगभरात मानसिक अनारोग्याची मोठी लाटच येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आजपासूनच आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर केल्यात स्वतः डिप्रेशनमधून गेलेली आणि मानसिक आरोग्यावर काम करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोननं.

आपण सगळे सध्या एका अभुतपूर्व परिस्थितीत जगतोय. २५ मार्च २०२० पासून भारतातले सव्वाशे कोटीहून अधिक नागरिक लॉकडाऊनमधे अडकून पडलेत. कोरोना वायरसचं संकट दूर करण्यासाठी जाहीर केलेला हा लॉकडाऊन आता अनेक नव्या प्रश्नांना जन्म देतोय. त्यातलाच एक म्हणजे लोकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न.

इंडियन सायकिएट्रिक सोसायटी या भारतातल्या मानसशास्त्रज्ञांच्या संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार लॉकडाऊन चालू झाल्यानंतर एकाच आठवड्यात भारतातल्या मानसिक आरोग्याच्या प्रकरणात २० टक्क्यांनी वाढ झालीय. त्यानंतरचे कित्येक आठवडे आणि महिने ही वाढ होतच राहिलीय. आता लोकांच्या नोकऱ्या जाणं, दारू न मिळणं, कौटुंबिक हिंसाचारात झालेली वाढ अशा अनेक कारणांमुळे देशात मानसिक आजाराची लाट येणार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. या मानसिक आजाराच्या लाटेत गरीब, श्रीमंत सगळे वाहून जातील. त्यामुळेच आपण आजपासूनच आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं चालू केलं पाहिजे. कारण मानसिक आरोग्यातून शारीरिक आरोग्याची निगा घेणं सहज शक्य होतं.

ही काळजी कशी घ्यायची याच्या काही महत्त्वाच्या टिप्स अभिनेत्री दीपिका पादुकोननं इन्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यात. काही वर्षांपूर्वी दीपिका स्वतः मानसिकरित्या आजारी पडली होती. त्यानंतर तिनं ‘लिव, लव, लाफ’ ही मानसिक आजारावर काम करणारी एनजीओ सुरू केली. आता कोरोना काळातल्या लॉकडाऊनमधला मानसिक ताण ओळखून दीपिकानं आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.

हेही वाचा : सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा

१. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या

या संकटाच्या काळात आपल्याला दुसऱ्यांना मदत करायचीय, दुसऱ्यांना आधार द्यायचाय. पण सगळ्यात पहिले आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

२. मानसिक आरोग्याच्या टिप्स

लॉकडाऊनमधे किंवा आयसोलेशनमधे राहणं हे अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकतं. विशेषतः आधी मानसिक आजाराचा सामना केलेल्यांसाठी तर हे जास्तच त्रास देतं. त्यासाठी,

- तुम्हाला कशामुळे भीती वाटते, काळजी वाटते आणि ताण येतो ते समजून घ्या.

- तुम्ही एकटे पडणार नाही याची काळजी घ्या.

- तुमची भीती आणि अस्वस्थता घालवण्यासाठी तज्ञांची किंवा हेल्पलाईनवर कॉल करून तिथल्या वॉलेंटिअरची, स्वयंसेवकांची मदत घ्या.

- तुमचं मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे याकडे लक्ष ठेवा.

- शक्य होतील अशी आणि स्वतःला आनंद देतील अशी काम करा. त्याने मनात येणारी अनिश्चिततेची भावना कमी होईल.

- पुरेशी झोप होतेय, दररोज व्यायाम आणि मेडिटेशन होतंय ना याची नीट काळजी घ्या.

३. तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा

कोण किती चांगलं काम करतं याची स्पर्धा लागलेली नाहीय. पण आपल्याला आवडतं ते काम केल्यानं मनाला आनंद आणि शांतता दोन्ही मिळते. लिखाण काम असो, घरकाम किंवा स्वयंपाक पाणी. तुम्हाला काय आवडतं?

४. दिनचर्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची

लॉकडाऊनमधलं जगणं फार अवघड आहे. अशात रोजचं वेळापत्रक बनवून, तुमचं रूटीन एकदम मस्त असेल तर मनावर येणारा ताण आपल्याला सहज नियंत्रित करता येतो.

५. छंदासाठी वेळ द्या

स्वयंपाक करणं हे मला नेहमीच रिलॅक्सिंग वाटत आलंय. माझा बहुतांश वेळ मी त्यासाठी वापरते. अशाप्रकारचे काही छंद तुम्हाला आहेत का?

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

६. तुम्हाला आधार देणारी गोष्ट कोणती?

कोविड १९ च्या या परिस्थितीत तुम्हाला आधार देणारी गोष्ट शोधा. तुमचे नातेवाईक, आईवडील यांच्याशी बोलत रहा. ऑफीसमधल्या सहकाऱ्यांशी संपर्कात रहा. दुसऱ्यांना मदत करा. जमेल तसं सामाजिक कार्यही करा.

७. निसर्गातला मोहोर बघा

वर आकाशाकडे बघणं, पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकणं, निसर्गासोबत एकरूप होणं या गोष्टी मला ऊर्जा देतात.

८. जवळच्या माणसांसोबतचं नातं

माझ्या अत्यंत जवळच्या माणसांना वेळ दिल्याने, त्यांच्याशी नातं जोडल्याने माझं मन शांत राहतं. आम्ही सोबत असताना केलेली थट्टा मस्करी आणि इतर गोष्टी मला नंतर सतत आठवत राहतात.

९. मेडिटेशन आणि व्यायाम

मीसुद्धा एखाद्यादिवशी आळस करते. अंगात अख्खा दिवसभर सुस्ती असते. पण उरलेले सगळे दिवस व्यायाम केल्याने माझ्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.

१०. तुमचं वेगळेपणा ओळखा 

दुसऱ्यासोबत स्वतःची तुलना केल्याने आपल्याला काहीही साध्य होणार नाही. तुमच्यातही काही वेगळं आहे हे मान्य करा आणि मग जगही तुम्हाला कवेत घेईल.

११. म्युझिकला थँक्स म्हणायला हवं

गाणी ऐकल्याने मला खूप आनंद मिळतो आणि माझ्या मूडवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

हेही वाचा : मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

१२. ताणतणावाला बाय बाय म्हणा

हा काळ स्वतःच्या वाढीसाठी, नवीन शिकण्यासाठी आणि सकारात्मक होण्यासाठी वापरा. असं केल्यानं ताणतणावच तुम्हाला स्वतःहून बाय बाय म्हणेल.

१३. टीनएजर मुलामुलींचं मानसिक आरोग्य (भाग १)

आपल्या करिअरविषयी साशंक असणाऱ्या मुलांसाठी,

- परीक्षा बंद असल्या तरी तुमचा अभ्यास थांबवू नका. दररोज पुरेसा अभ्यास करा.

- अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तकं वाचा.

- नवीन कौशल्य किंवा छंद शिका.

एका खोलीत बंद असणाऱ्या मुलांसाठी,

- योगा, एरोबिक्ससारखे व्यायाम प्रकार करत रहा.

- दररोज ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात जा.

इंटरनेट आणि सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्यांसाठी,

- आपण किती वेळ स्क्रिनवर घालवायचा ते ठरवा.

- सोशल मीडियाचा मर्यादीत वापर करा.

१४. टीनएजर मुलामुलींचं मानसिक आरोग्य (भाग २)

मित्रमैत्रिणींपासून बाजुला पडलो आहोत असं वाटणाऱ्यांसाठी,

- तुमच्या मित्रमैत्रीणींशी दररोज फोनवर, वीडियो कॉलवर बोलत रहा.

- ऑनलाईन गाठीभेटींसोबतच मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन काही ऑनलाईन एक्टिविटी सुरू करा.

अनियमित दिनचर्या असलेल्यांसाठी,

- रोजचं वेळापत्रक बनवा

- झोपेच्या वेळा पाळा

- पौष्टिक खा आणि जंकफुड टाळा

कंटाळा आलेले, निराश झालेले आणि सतत चिडचिड करणाऱ्यांसाठी,

-  घरकामात मदत करा.

-  काहीतरी जबाबदारीचं काम स्वतःहून उचला.

- बुद्धीवर जोर देणारे काही व्यायाम किंवा खेळ खेळा. 

१५. लपवून ठेवायचं कारण नाही

तुम्हाला ताण जाणवत असेल किंवा डिप्रेशन येत असेल तर मानसिक आरोग्यातल्या तज्ञ डॉक्टरांची मदत घ्या. त्यात लपवून ठेवण्यासारखं किंवा लाज वाटण्यासारखं काहीही नाही.

हेही वाचा : 

दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

संत कोरोना आणि कोरोना वायरसचा काही संबंध आहे का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं