सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

१० ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज शनिवार १० ऑगस्ट. आजच्याच दिवशी १९६२ ला स्पायडर मॅनची गोष्ट पहिल्यांदा प्रकाशित झाली. नंतर ती कॉमिकच्या रुपाने बाजारात आलं. आणि लोकप्रिय झाली. आजही ती गोष्ट लोकप्रिय आहे. स्पायडर मॅन बराक ओबामांपासून सगळ्यांच्याच मनातला तो सुपर हिरो आहे.

सुपरमॅन, बॅटमॅन, ब्लॅक पँथर, हल्क, थॉर, वंडर वुमन डायना, आयर्न मॅन, क्रिश हे सर्व सुपरहिरो वेगवेगळे सिनेमे, मासिकं आणि मालिकांमधून आपल्यासमोर आलेत. या सुपहिरोंची यादी तशी खूपच मोठी आहे. पण आपल्याला आवडतो तो केवळ पीटर पार्कर अर्थात स्पायडर मॅनच.

स्पायडर मॅनला डोक्यावर घेतलं

या आपल्या लाडक्या स्पायडर मॅनची गोष्ट आजच्याच दिवशी म्हणजे १० ऑगस्ट १९६२ ला प्रकाशित झाली. द वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मार्वल पब्लिकेशनच्या अमेझिंग फँटसी या कॉमिकमधून स्पायडर मॅन हा सुपर हिरो पहिल्यांदा जगासमोर आला. आणि पुढच्या काही दिवसांत हे कॉमिक बाजारात विक्रीसाठी गेलं. काही आठवड्यांतच हे मासिक लोकप्रिय झालं. या कथेला स्टॅन ली यांनी जन्म दिला. जॅक किरबे आणि स्टीव डिटको या दोन आर्टिस्टनी स्पायडर मॅनचं आणि त्याच्या कारनाम्यांचं रेखाटन केलं.

अवेंजर मालिकेतला भाग पकडून स्पायडर मॅनचे एकूण ४ सिनेमे आलेत. तसंच १९९४ ला याची टीवीवर मालिकाही सुरू झाली. ही मालिका ४ वर्ष चालली. त्यानंतर २००२ ला स्पायडर मॅन सिनेमा बनला. टीवी मालिका आणि सिनेमा या मीडियात ही गोष्ट तुफान चालली. लहानांपासून मोठ्यांनी या सुपरहिरोला डोक्यावर घेतलं.

स्पायडर मॅनच्या गोष्टीत काय होतं?

या सुपरहिरोची गोष्टच मनाला भावणारी, आपली वाटणारी होती. पीटर पार्कर नावाचा एक अनाथ मुलगा म्हाताऱ्या आजीआजोबांबरोबर राहतोय. एक रेडियोएक्टिव कोळी त्याला चावतो आणि त्याच्यात सुपरनॅचरल पॉवर्स येतात. तो स्पायडर मॅन बनतो. तो आपल्या मनगटातून लांबच लांब कोळ्याचं जाळं सोडू शकतो. उंच इमारतींना लोंबकळू शकतो. बलाढ्य शत्रूंना मारू शकतो. आणि तो सुपरहिरो बनतो. फक्त गोष्टीतला नाही तर आपल्या मनातलाही.

कॉमिक्सच्या दुनियेतला बापमाणूस स्टॅन ली आणि मार्वेल यांनी आणलेले स्पायडर मॅनसहीत इतर सगळेच सुपरहिरो हे माणसाळलेले होते. त्यांच्यात माणसासारख्या नाही तर माणसाच्याच भावभावना असायच्या. त्यामुळे त्या कार्टूनमधे आपण स्वतःला पाहू लागलो. म्हणूनच पीटर पार्कर हा नेहमीच आपल्यातला वाटतो. त्यांनी मायथॉलॉजी, साहित्य आणि इमॅजिनेशनची अशी काही सांगड घातलीय की अख्ख्या जगाला त्यांच्या गोष्टींनी वेडं लावलंय.

हा स्पायडर मॅन आजच्या पिढीलाही आपला वाटतोय. १९६२ ते १९७० पर्यंत स्पायडर मॅनची कवर स्टोरी असलेलं कॉमिक बेस्ट सेलिंग कॉमिक ऑफ द इयर ठरत होतं. मग ७१ मधे त्यांनी एमेझिंग फँटसी या कॉमिकच्या नावाऐवजी अमेझिंग स्पायडर मॅन असं नाव केलं.

हेही वाचा: गावाकडच्या मराठी पोराचा चांद्रयान २ मोहिमेत सहभाग

जग जिंकण्याची पॉवर देणारा सुपरहिरो

मुख्य म्हणजे ६० दशकात अमेरिकेतल्या परिस्थितीमुळे हतबल पिढीला स्पायडर मॅन आपला वाटला. जग जिंकण्याची पॉवर मिळवण्याच्या स्वप्नांचं तो मूर्तरूप ठरला. हा स्पायडर मॅन पुढे बदलत्या जगातल्या नव्या माध्यमांमधेही अगदी चपखल बसला. आणि अधिक जास्त आवडू लागला. स्पायडर मॅन जास्तच जवळचा वाटू लागला. 

स्पायडर मॅनचं पहिलं कॉमिक येऊन आता ८६ वर्षं झाली. अगदी भारतातल्या जवळपास २० भाषांमधे स्पायडर मॅन मालिका टीवीवर आजही लागते. पण आजही बाजारात सर्वाधिक विक्री होणारा सुपरहिरो ब्रँड हा स्पायडर मॅनच आहे. आणि रेडियो, टीवी, सिनेमे, वीडियो गेम, वेब सिरीज इत्यादी सगळीकडे आपण स्पायडर मॅन पाहू शकतो. आणि या प्रत्येक मीडियात तो नंबर वनच आहे.

एवढं भरभरून यश कशामुळे मिळालं?

त्याकाळी किशोरवयीन मुलांसाठी कॉमिक्स नव्हते. त्यांच्यासाठी कॉमिकची मागणी लोकांकडून होतहोती. तसंच उपलब्ध असलेलं साहित्य हे धार्मिक स्वरुपाचं होतं. नाहीतर मोठ्यांसाठीचं आणि अगदीच लहानग्यांसाठीच. अशावेळी मार्वलने कॉमिक्स आणले. फॅन्टॅस्टिक फोर कॉमिकच्या यशाचा फायदाही सुरवातीला स्पायडर मॅनला झाला.

स्पायडर मॅनची गोष्ट किशोरवयीन मुलांना रिलेट करता येणारी होती. म्हणूनच हायस्कूलच्या मुलांमधे हे कॉमिक खूपच लोकप्रिय झालं. हे स्पायडर मॅनच्या यशाचं गमक आहे. असं मार्वल एंटरटन्मेंटचे सध्याचे एडिटर इन चीफ सी. बी. सेबुलस्की यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. ती मुलाखत युट्यूबवरही उपलब्ध आहे.

हेही वाचा: गोल्डन गर्ल हिमा दासकडे धावण्यासाठी शूज नव्हते, आज तिच्या नावाची शूज रेंज आहे

स्पायडर मॅनबद्दलच्या ५ इंटरेस्टिंग गोष्टी

१. स्पायडर मॅनची गोष्ट कोळी या किटकावर आधारलेली आहे. पण मूळात लेखक स्टॅन ली यांना माशीवर आधारीत कथा लिहायची होती.
२. खरंतर सुपरहिरो हे नेहमी वयाने मोठे, समंजस दाखवले गेलेत. पण स्पायडर मॅन हा पहिला किशोरवयीन सुपरहिरो आहे.
३. स्पायडर मॅन कॉमिकचा २०१२ मधे ७०० वा अंक प्रकाशित झाला.
४. स्पायडर मॅन सिनेमा पहिल्यांदा २००२ ला रिलिज झाला. पण हा सिनेमा बनवण्यासाठी १७ वर्षं लागली. ही सर्व माहिती मार्वल डिरेक्टरित उपलब्ध आहे.
५. अमेरिकेचे माजी पंतप्रधान बराक ओबामा यांचा आवडता सुपरहिरो स्पायडर मॅन आहे. असं खुद्द ओबामांनी वॉशिंगटन पोस्ट या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

हेही वाचा: 

बूक माय शो: ऑनलाईन तिकीट बुकिंगमधला असली किंग

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?

विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?