अरुण जेटलींच्या मृत्यूचं कारण वेट लॉस सर्जरी?

३० ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


ख्यातनाम वकील आणि राजकारणी अरुण जेटली यांचं नुकतंच निधन झालं. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण मोदी सरकार १.० मधे शेवटच्या काळात त्यांना फारसं काम करता आलं नाही. ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होते. मधुमेह कंट्रोल करण्यासाठी त्यांनी वेट लॉसचं ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे त्यांना इतर आजार जडले असावेत, अशी चर्चा होतेय.

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्टला निधन झालं. जेटलींनी ६६व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून ते ओळखले जायचे. आजारपणाने त्रस्त असतानाही जेटली वेगवेगळ्या माध्यमातून सरकारच्या मदतीला धावून जायचे. प्रत्यक्ष समोर न येता ब्लॉग लिहून सरकारची पाठराखण करायचे. मोदी सरकार १.० मधेच आजारपणाशी झगड असलेल्या जेटलींना मोदी सरकार २.० मधे सामील न होण्याचा निर्णय घेतला.

आजारांचं मूळ कारण मधुमेह

जेटलींना श्वास घेण्यास त्रास होतहोता म्हणून हॉस्पिटलमधे दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. यापूर्वी ते बऱ्याच आजारांनी त्रस्त होते. त्यांची हार्ट सर्जरी, गॅस्ट्रीक सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी इत्यादी ऑपरेशन झाली. तसंच त्यांना सॉफ्ट टिश्यू सर्कोमा कॅन्सरसुद्धा झाला. ज्यावर ते अमेरिकेत उपचार घेत होते. तसंच त्यांना साधारण १५ वर्षांपासून मधुमेहसुद्धा होता, ही माहिती लोकमत न्यूजने आपल्या वेबसाईटवर दिलीय.

जेटलींचं २००५मधे हृदयविकाराचं ऑपरेशन झालं. पण त्यानंतर त्यांच्या गंभीर आजारपणाची सुरवात मधुमेहापासून झाली. मधुमेह वाढत वाढत पुढे कंट्रोल न करण्याच्या पलिकडे गेला. म्हणूनच त्यासाठी एक ऑपरेशन करण्याचं ठरवलं. ते ऑपरेशन म्हणजे बॅरिअॅ'ट्रीक सर्जरी. ज्याला आपण आपल्या भाषेत वेट लॉस सर्जरी म्हणतो. ही सर्जरी २०१४मधे करण्यात आली.

दिल्लीतल्या मॅक्स नावाच्या खासगी हॉस्पिटलमधे १ सप्टेंबर २०१४ला जेटली दाखल झाले. मंगळवारी २ सप्टेंबरला त्यांचं ऑपरेशन झालं. अशाचप्रकारचं ऑपरेशन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचंही झालंय, अशी माहिती आपल्याला टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर सापडते.

हेही वाचाः रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?

जेटलींनी धोकादायक सर्जरी केली

वेट लॉस सर्जरीचे ३ प्रकार असतात. लॅप बँड सर्जरी, स्लीव गॅस्ट्रीअक्टोमी सर्जरी आणि गॅस्ट्रिक बायपास सर्जरी. हे ऑपरेशन लॅप्रोस्कोपिक पद्धतीने करतात. ही ओपन सर्जरीच असते. फक्त यात वापरण्यात येणाऱ्या इंस्ट्रुमेंटला छोटा कॅमेरा लावलेला असतो. ही पद्धत १९०१ मधे सुरू झालीय.

वेट लॉस सर्जरीतल्या सर्वच सर्जरी धोकादायक असतात. लॅप बँडमधे माणसामधे खाण्याची क्षमताच राहात नाही. तर स्लीव गॅस्ट्रीअक्टोमीमधे दर आठवड्याला दोन किलो वजन कमी होतं. असं करत  ८५ टक्क्यांपर्यंत वजन कमी होतं. आणि गॅस्ट्रिक बायपास प्रकारात पोटाला दोन हिश्श्यात विभागलं जातं. आणि ते एका पॅकेट किंवा मोठ्या चेंडूच्या आकाराचं बनवतात, असं आज तक न्यूज चॅनलने आपल्या बातमीत म्हटलंय. या स्टोरीचा आपण यूट्यूबवर वीडिओही पाहू शकतो.

गॅस्ट्रिक बायपास सर्जरीमुळे अन्न पचायला वेळ लागतो. तसंच भूक निर्माण करणारं ग्रेहलिन हार्मोनची निर्मिती थांबते. त्यामुळे शरीरातली चरबी एनर्जीच्या रुपाने वापरली जाते आणि वजन कमी होतं. आणि भूकही कमीत कमी लागल्याने वर्षभरात किमान ६० किलो वजन कमी होतं. २०१४मधे जेटलींचं वजन ११७ किलो होतं. आणि त्यांनी हीच सर्जरी केली. ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क म्हणता येईल. ज्यामुळे त्यांनी त्यांचं आयुष्यच धोक्यात आणलं.

हेही वाचाः मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

जेटलींना एवढे आजार का झाले?

वेट लॉसच्या ऑपरेशनमधे फुफ्फुस, किडनी यावर परिणाम होतो. तसंच लो ब्लड शुगर, मुळव्याध, पोटाचे विकार इत्यादी आजारही होऊ शकतात. तसंच अगदी दुर्मिळ केसमधे मृत्यू येऊ शकतो. या ऑपरेशनमुळेच जेटलींना इतर आजारांचा सामना करावा लागला आणि यातच ते गेले अशी दबक्या आवाजात चर्चा होतेय.

वेटल लॉस ऑपरेशननंतर जेटलींच्या किडनीवर परिणाम होऊ लागला. आणि २०१८मधे त्यांना किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करावं लागलं. आता काही महिन्यांपासून त्यांना कॅन्सर होता. सॉफ्ट टिश्यू सर्कोमा कॅन्सरचं प्रमाण १०० मागे ५ असल्याचं कॅन्सर डॉट नेट वेबसाईटवर म्हटलंय.

यामागे वेट लॉस ऑपरेशन हेच कारण असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींचंही म्हणणं आहे. पण समोर येऊन कोणी बोलत नाही. तसंच डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनानेही नेमकं कारण सांगितलेलं नाही.

वेट लॉस ऑपरेशन करताना घ्यायची काळजी

जेटली हे श्रीमंत वकील, मंत्री होते. त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी माणसं, पोषक आहार, व्यायाम, ट्रिटमेंटसाठी जगातले बेस्ट डॉक्टर असं सगळं असतानाही त्यांना हा कॅन्सर झाला. आणि या कॅन्सरचा परिणाम हाडं, मेंदूच्या नसा, यकृत, फुप्फुसावर होतो, असं सरकारी कॅन्सर वेबसाईट लिहिलंय. जेटलींना शेवटच्या काळात श्वास घेता येत नव्हता म्हणून हॉस्पिटलमधे नेलं. तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात पाणी भरलं होतं. यामागे वेट लॉस ऑपरेशन असल्याचं काही अंशी दिसून येतं. कारण ज्या ज्या भागांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्या भागांवर परिणाम झाला.

वेट लॉस ऑपरेशन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे यावर हेल्थ केअर वेबसाईटवर एक स्टोरी आहे. त्या स्टोरीत डॉ. पियुश खुराना यांनी लिहिलंय, वेट लॉस सर्जरी करताना डॉक्टर आणि डॉक्टरची टीम तसंच या सर्जरीसाठी आपली पात्रता, त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम याची माहिती आपण करून घेतली पाहिजे. गरज पडल्यास सेकेंड ओपिनियन घ्यावं. तसंच आपल्या एकूण रिपोर्टप्रमाणे यात कोणते इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे या सगळ्याची चौकशी करणं गरजेचं आहे.

हेही वाचाः 

झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार

संसदीय राजकारणाचा फड गाजवणारे वकील

कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश