ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

११ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


कोरोना वायरसमुळे साऱ्या जगाला कोणत्याही साथीला रोखण्यासाठी बुवाबाबाच्या जादुची, मंत्राची नाही तर लसीची गरज असे हे कळून चूकलंय. कोरोनाची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चला तर मग आपण यानिमित्तानं लस कशी तयार केली जाते हे समजून घेऊ या.

एकाएकी अवतरत सगळ्या पृथ्वीवरच्या मानवजातीसमोर संकट बनून उभं राहिलेली गोष्ट म्हणजे नोवेल कोरोना वायरस. या वायरसपासून उद्भवणाऱ्या आजारासाठी, अर्थात कोविड-१९ साठी लस शोधण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. ही लस म्हणजे नक्की काय? आजवर कोण कोणत्या रोगांवरची लस कशी आणि कधी उपलब्ध झाली हे समजून घेणं खूप रंजक आहे.

पू वापरून बनवलं देवीची लस

एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधली ते साल होतं १७९६. पण त्याच्याही खूप आधीपासून चीन, आफ्रिका, तुर्कस्थान इथे देवीच्या फोडांमधील पू वापरून लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरू होते. जेन्नरचं निरीक्षण असं होतं की गायींना होणाऱ्या 'काऊपॉक्स' या  रोगातल्या फोडांमधला पू माणसाच्या शरीरात टोचला तर नंतर देवी आल्या तरी त्या लगेच बऱ्या होतात.

पूर्वी देवी रोगाने कायमचे व्रण राहायचे, अंधत्व यायचे. पण काऊपॉक्सची लस टोचल्यास देवी येतच नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात येतात. १७९६ नंतर लस तयार करण्याच्या पद्धतीत खूप सुधारणा होऊन देवी रोगाचं निर्मूलन झालं. जो रोग फक्त माणसालाच होतो त्याचं निर्मूलन होऊ शकतं. मात्र काही जंतू प्राण्यांमधे राहून माणसांमधे येतात. असे रोग फक्त नियंत्रित करता येतात. उदा पोलिओ.

हेही वाचा :  अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

लसीमागचं प्रिंसिपल

दुसरी शोधलेली लस म्हणजे रेबिज किंवा कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या रोगाची. लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने ही लस शोधली. बाकी सर्व लसी या रोगाचे जंतू शरीरात जाण्याआधी देतात. रेबीज या रोगाची लस मात्र कुत्रा चावला तरच दिली जाते. कारण रेबीज वायरस कुत्रा चावलेल्या अवयवापासून नर्व मधून मेंदूमधे जातो आणि त्यानंतरच रोग होतो. पूर्वी १४ इंजेक्शन घ्यावी लागायची. आता तीनच घ्यावी लागतात.

काही प्रकारच्या कॅन्सरवरही लस शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. सध्या टिटॅनस, घटसर्प वगैरे रोगांवर लस उपलब्ध आहे.

कोणत्याही लसीत अँटीजेन अँटिबॉडी हे तत्व वापरलं जातं. यासाठी जिवाणू किंवा वायरस अथवा त्याचा भाग शरीरात टोचला जातो. हा कमी इन्फेक्टिव केलेला असतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा त्याचा सहज नाश करते. त्याच्याविरुद्ध मेमरी सेल्स तयार होतात. त्यामुळे प्रत्यक्षात रोगजंतू शरीरात येतो तेव्हा रोग होतच नाही किंवा त्याचा प्रभाव कमी प्रमाणात होतो. लसीमुळे रोग लवकर बरा होतो आणि मृत्यू टळतो.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

लसींचे प्रकार

१. इनएक्टिवेटेडः यात वायरस रसायन, उष्णता किंवा रेडिएशन यांना निष्प्रभ करून तो वापरला जातो. पोलिओ, हिपेटायटीस बी, रेबीज या लसींमधे हा प्रकार वापरण्यात आलाय.

२. लाइव एटेन्युटेड: यात एक्टिव वायरस वापरला जातो. मात्र त्याचं 'कल्चर' करताना अशी रसायनं वापरली जातात. त्यामुळे वायरस कमी इन्फेक्टिव होतो. यलो फिवर, गोवर, गालगुंड, जर्मन गोवर, टायफॉईड, टी बी, प्लेग या लसींमधे याचा वापर करण्यात आलाय.

बीसीजी म्हणजेच bacillus of Calmette and Guerin हा टीबीच्या जंतूसारखा असणारा जंतू वापरून बीसीजी ही लस बनवली जाते. याच्या इफेक्टबद्दल शंका आहे. पण भारतातही मुलाला जन्मल्यावर लगेच ही लस दिली जाते. त्यामुळे कोरोना वायरस कमी प्रमाणात पसरतोय असं म्हटलं जातं?

लाइव एटेन्युटेड लस कधीकधी धोकादायक ठरू शकते. कारण हा जंतू पुन्हा एक्टिव होऊ शकतो.

३. टॉक्झॉइड: काही जिवाणू टॉक्सिन तयार करतात. धनुर्वात, घटसर्प यांच्या लसी टॉक्सिन इनऍक्टिवेट करून वापरल्या जातात.

हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो

लसीकरणाचं वेळापत्रक

लसीकरणाचं वेळापत्रक प्रत्येक देशात ठरलेलं असतं. भारतात बीसीजीची लस मुलं जन्मला आल्यावर लगेच देतात. मग दर महिन्याला ट्रिपलचा डोस, पोलिओ, ९ महिने झाल्यावर गोवर असं वेळापत्रक आहे.

याशिवाय साथीच्या काळात कॉलरा, टायफॉईड अशा लसी दिल्या जातात. त्यामुळे हर्ड इम्युनिटी तयार होते. म्हणजे सर्वांमधे अँटिबॉडीज असतात. याने रोग गंभीर रूप धारण करत नाही. साथ आटोक्यात येते.

कोरोना वायरस हा नवीन असल्याने त्याच्यावर अजून तरी लस उपलब्ध नाही. त्याचे प्रोटीन किंवा सरळ आरएनए वापरून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही लस सुरक्षित आहे की नाही ते बघण्यासाठी मानवावरच प्रयोग करणं आवश्यक आहे. सध्या असे प्रयोग चालू आहेत. लस उपलब्ध झाल्यास साथ लगेच आटोक्यात येईल. जगभरातली मानवजात या मुक्ती दिनाकडे डोळे लावून बसलीय.

हेही वाचा : 

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

शेतकऱ्यांच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी