कोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं?

०२ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आता ४ मेपासून दोन आठवड्याचा नवा लॉकडाऊन सुरू होणार आहे. या काळात काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवानगीही देण्यात आलीय. परवानगीचा अर्थ काही आपण मोकळे झालो, असा नाही. अजून कोरोनावर औषधं सापडलं नाही. त्यामुळे कोरोनाला अंगाला न खेटू देता शॉपिंग करावी लागेल. वाचा त्यासाठीच्या साध्यासोप्या गोष्टी.

गेल्या दीडेक महिन्यापासून आपण सगळे लॉकडाऊनमधे आहोत. ३ मेला संपणाऱ्या लॉकडाऊनलाही अजून दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. तरीही रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन करून लॉकडाऊनमधे शिथिलता देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेड झोनमधे अगोदरसारखंच जवळपास सारे व्यवहार बंद असणार आहेत. तर ग्रीन झोनमधे बऱ्यापैकी कामधंदे सुरू करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. ऑरेंज झोनमधल्यांची अवस्था दोन्हींच्या मधली आहे.

येत्या काही दिवसात आपण संपूर्णपणे लॉकडाऊनमधून बाहेर पडू आणि जनजीवन हळूहळू सुरळीत होईल. असं असलं तरी कोरोना वायरसचं संक्रमण अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही. शिवाय, अजूनही कोरोनासाठी प्रतिबंधात्मक लस किंवा औषधोपचारचंही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे पंधरा दिवसांनी लॉकडाऊन संपल्यावर आपण घराबाहेर पडलो तरी बाहेरच्या जगात कोरोना वायरस आपली वाट बघत थांबलेला असू शकतो.

३ मे नंतर काही ठिकाणी छोटी छोटी किंवा जास्त गर्दी होणार नाही अशी दुकानं उघडण्याला परवागनी दिली जाईल. अशा दुकानात काही प्रमाणात मालही भरला गेलेला असेल. काही जुनाच माल शिल्लक असेल. अशावेळी या दुकानांमधे असलेलं पॅकबंद सामान सुरक्षित आहे का असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा : बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल 

शेजारच्या व्यक्तीकडे लक्ष ठेवा

किराणा माल आणि भाजीपाला पुरवणारे अनेक मॉल भारतात आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून या मॉलच्या प्रशासनाने खरेदीची वेळ मर्यादित ठेऊन उरलेला वेळ मॉलची साफसफाई करण्यासाठी किंवा वस्तूंचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी राखीव ठेवलाय. शिवाय, अनेक असे मॉल घरपोच डिलिवरीही देतात. पण अशा मॉलपेक्षा भारतातले बहुतांश लोक गल्लीबोळातल्या दुकानातूनच किराणा सामान खरेदी करणं पसंत करतात. त्यामुळेच, अशा दुकानात खरेदी करताना थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

दुकानातल्या वस्तूंना हात लावल्याने कोरोनाची लागण होण्याची शक्यता असतेच. पण त्यापेक्षा जास्त शक्यता दुकानात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने असते, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल म्हणजेच सीडीसी या अमेरिकेतल्या संस्थेकडून वारंवार सांगण्यात आलंय. थोडक्यात, दुकानातला ब्रेड, भाजी, मॅगीचं पॅकेट यावर कोरोना असेल अशी शंका घेण्यापेक्षा जास्त काळजी आपल्या शेजारचा माणूस आपल्या किती जवळ उभा आहे, याबद्दल घेतली पाहिजे. वस्तुंपेक्षा माणसांपासून अंतर राखलं पाहिजे.

हे कोरोना  स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

फिजिकल डिस्टसिंग महत्त्वाचं

खरेदी करताना पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे खरेदीसाठी कमीतकमी वेळा बाहेर पडणं. ‘आठवडाभराचं किंवा दोन तीन आठवड्याचं सामान तुम्ही एकदाच आणू शकलात तर ते खूप चांगलं असेल,’ असा सल्ला वॉशिंग्टन युनिवर्सिटीतल्या लेक्चरर ऍने मारी ग्लोस्टर यांनी वोक्स या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगतात. त्याचबरोबर दुकानात फारशी गर्दी नसेल अशावेळीच खरेदीला बाहेर पडावं असंही त्या म्हणतात.

काही दुकानांनी खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांसाठी काही चांगले नियम बनवलेत. त्यात ६ फुटांचं अंतर पाळणं हा महत्त्वाचा नियम जवळपास सगळ्याच दुकानांनी केलाय. त्यासाठी दुकानदार रंगीत टेप लावून ग्राहकांना उभं राहण्यासाठी चौकट किंवा गोल आखून देतात. किंवा एकावेळी दुकानात एकाच किंवा दोघाच ग्राहकांना सोडण्याची पद्धतही काही दुकानात वापरली जातेय. पण हे डिस्टन्सिंग जिथं दिसणार नाही, त्या दुकानातून खरेदी करणं आपण शक्यतो टाळायला हवं.

खरेदी करायला जाताना आपण शक्य असेल तर एकटंच जावं. अनेकांना आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन शॉपिंगला जायची सवय असते. मुलं कुतूहलापोटी अनेक गोष्टींना सारखा हात लावत असतात. पण कोरोनावर काही ठोस उपाय सापडत नाही तोपर्यंत कुटुंब निघाला शॉपिंग हा प्रकार आपल्याला थांबवावा लागेल. शिवाय, जाण्याआधी कागदावर काहीएक नियोजन करून ठेवलं तर ते खूप कामाला येईल. दुकानदाराला फोन करून सामान तयार ठेवायला सांगणं, हाही एक चांगला पर्याय आपण वापरू शकतो.

हेही वाचा : किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

मास्क वापरायचा की नको?

लोकांपासून शारीरिक अंतर म्हणजेच फिजिकल डिस्टसिंग ठेवणं याकडे आपण नेहमी लक्ष दिलंच पाहिजे. पण हे करताना आपण मास्क वापरायचा की नाही असा प्रश्न अनेकांना पडत असतो. मुळात, फिजिकल डिस्टसिंग पाळणं अवघड आहे फक्त अशाच ठिकाणी मास्क वापरायची गरज पडू शकते, असं सीडीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमधे लिहिलंय.

सर्जिकल मास्क आणि एन९५ या प्रकारच्या मास्कचा सध्या भारतातच नाही तर जगभरात तुटवडा आहे. आणि आपल्यापेक्षा जास्त या मास्कची गरज डॉक्टर आणि आरोग्यसेवा देणाऱ्या माणसांना आहे. त्यामुळेच हे मास्क त्यांच्यासाठी राखीव ठेवून साधे कापडाचे मास्क आपण वापरू शकतो. फक्त एकदा बाहेर जाऊन आल्यानंतर लगेचच हे मास्क धुवायला हवेत.

हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

न विसरता पिशवी धुवा

सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सगळ्यांनी वर्षभरापूर्वीच प्लॅस्टिक पिशव्या वापरणं बंद केलं होतं. त्याऐवजी रियुजेबल अशा कापडाच्या किंवा नायलॉनच्या पिशव्या आपण किराणा माल आणायला वापरतो. इतर सगळी सफाई करण्याच्या नादात या पिशव्यांमार्फतही कोरोना वायरस पसरू शकेल हे आपण विसरून जातो. बाहेरून जाऊन आल्यावर प्रत्येकवेळी या पिशव्या धुवायला हव्यात, असं वॉशिंग्टन युनिवर्सिटीतल्या ग्लोस्टर यांचं म्हणणं आहे.

आता पिशव्या कापडी असतील तर आपण वॉशिंग मशीनमधे त्या धुवू शकतो. मशीन नसेल तरी साधे कपडे धुतो त्याप्रमाणे पाण्यात भिजवून साबण लावून पिळून वाळत घालू शकतो. पण कागदाची बॅग असेल तर ती धुता येणार नाही. अशावेळी त्याचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे.

यासोबतच, बाहेर असताना मोबाईल न वापरणं, डोळ्याला, नाकाला हात न लावणं, पैशांऐवजी डिजिटल व्यवहार करणं असे छोटे छोटे उपायही करावे लागतील. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सतत हात धुवत राहणं, नाहीतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करत राहणं. सामान घेण्याआधी, सामान घेऊन घरी आल्यानंतर, सामानाचं निर्जंतुकीकरण केल्यानंतर अशा प्रत्येकवेळी हात धुवत राहणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा : 

आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

आयडिया ऑफ महाराष्ट्रः लोकशाही, समता, सर्वसमावेशकता- शरद पवार

दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली आयडिया ऑफ महाराष्ट्र: विनय सहस्रबुद्धे

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी