लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

२० ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


धोनीने कधीही गोलंदाजाला शिव्या दिल्या नाहीत की आक्रमक हावभाव दाखवले नाहीत. तरही त्याची ही शैली भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवायची. धोनीने आपल्या निवृत्तीची स्टाईलही आपल्या फिनिशिंग टच सारखी ठेवली. कोणतीही निवृत्तीची प्रेस कॉन्फरन्स नाही. इन्स्टाग्रामवर एक इन्स्टंट फोटोंचा स्लाईड शो आणि त्याच्या बॅकग्राऊंडला 'मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी हैं पल दो पल मेरी हस्ती हैं!'

काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनी आपली किटबॅग घेऊन चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर दाखल झाला. त्यावेळी सगळ्यांना वाटलं होतं की आता धोनी पुन्हा भारतीय संघात परतणार. पण, दुसऱ्याच दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याची ही निवृत्तीची स्टाईल पाहिली तर त्याने आपल्या खेळाच्या शैलीप्रमाणेच निवृत्तीही जाहीर केली. धोनी आता निळ्या जर्सीत कधीही दिसणार नाही. चाहत्यांना हा धक्का त्याने स्वतंत्रता दिनीच दिल्याने अनेक चाहते त्याच्यावर नाराजही असण्याची शक्याता आहे.

धोनी असाच आहे. त्याने सचिन बाद झाला की सामना संपला ही भारतीय चाहत्यांची मानसिकता बदलली. ती फक्त एका सामन्यासाठी बदलली नाही तर त्याने त्यात सातत्य ठेवले. त्यामुळे त्याची मॅच फिनिशर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्याच्या जोडीला युवराज असल्याने आणि तोही एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद ठेवत असल्याने ही फिनिशरची जोडगोळी भारताला मिळाली होती.

पण, त्यातही धोनीची स्टाईल खास होती. तो सामना अखेरच्या षटकापर्यंत नेत तो जिंकून देत होता. प्रेशर गेममधे त्या काळात सामना अखेरच्या षटकापर्यंत घेऊन जायचा नाही तो त्या आधीच संपवायचा असा प्रघात होता. हा प्रघात धोनीने मोडला. त्याने सामना अखेरपर्यंत नेत गोलंदाजावर दडपण वाढवले आणि त्याच्या खास षटकार शैलीत सामना संपवला.

हेही वाचा : लेडी सेहवाग शफालीचा सिक्सर पुरुषांनाही तोंडात बोट घालायला लावतो!

भारतीय संघातील भीष्माचार्य

धोनीच्या कारकिर्दीच्या पीकवर ही शैली म्हणजे एक प्रघातच झाला होता. त्याने हळूहळू सामना अंतिम षटकापर्यंत नेला म्हटलं की धोनी आता धुलाई करणार हे बॉलर ओळखून जायचे. त्यामुळे विकेट काढण्यासाठी जायचं की धावा रोखायच्या या द्विधा मनस्थितीत बॉलर असायचा. त्याचवेळी धोनी षटकार मारून सामना संपवायचा. म्हणजे बॉलरचं अधिकच मानसिक खच्चीकरण.

धोनीने कधीही गोलंदाजाला शिव्या दिल्या नाहीत की आक्रमक हावभाव दाखवले नाहीत. तरही त्याची ही शैली भल्या भल्या गोलंदाजांना घाबरवायची. धोनी क्रीजवर असताना अखेरची ओवर कोण टाकणार हा यक्षप्रश्न प्रतिस्पर्धी टीम लीडरसमोर उभा राहत असे. 

असाच एक यक्षप्रश्न धोनीने आता भारतीय कर्णधारासमोर उभा केलाय. अचानक निवृत्ती जाहीर करुन आता भारतीय संघातील भीष्माचार्य धारातीर्थी पडलाय याचे संकेत दिलेत. त्यामुळे विराट कोहलीचे यष्ट्यांमागील मास्टर माईंड, भारतीय गोलंदाजांचा दिशादर्शक, दबावाच्या काळातला फलंदाजाचा आधारस्तंभ हरपला आहे. त्यामुळे आगामी वर्ल्डकपसाठी आपला हा अज्ञातवासात गेलेला भीष्माचार्य परतेल आणि आपल्याला मार्गदर्शन करेल या आशेवर असणाऱ्या भारतीय संघाला आता त्याच्या विनाच लढावे लागणार आहे.

धोनीचा वारसा कोण चालवणार?

खेळाडूपेक्षा खेळ आणि संघ मोठा असतो. खेळाडू गेला म्हणून खेळ थांबत नाही. तसेच धोनी गेला म्हणून भारत जिंकायचा थांबणार नाही. पण, एक गोष्ट नक्की की धोनीच्या निवृत्तीने भारतीय संघाची यष्टीमागील धुरा कोण सांभळणार हा प्रश्न अनुत्तरीतच ठेवून धोनीने संघाची ड्रेसिंग रुम सोडली आहे. 

त्याने कर्णधारपदाचे हस्तांतरण पद्धतशीपणे केले, पहिल्यांदा कसोटीचे आणि त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२०चे कर्णधारपद कोहलीकडे दिले. फलंदाजीतही हार्दिक पांड्यासारख्या फिनिशरला धोनीचा सहवास लाभला आहे. भारताची फिनशरची फळी तयार आहे. पण, विकेट किपिंगच्या बाबतीत असं झालं नाही. त्यामुळे धोनीचा यष्टीमागील वारसा कोण चालवणार हा यक्षप्रश्न संघव्यवस्थापनासमोर असणारच आहे. त्यातच धोनीची चपळाई आणि त्यामुळे संघाला विजयासाठी होणाला मोठा फायदा पाहता. अनेक सामने आपण धोनीची आठवण नक्की काढणार यात शंका नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

पल दो पल का शायर

धोनीने आपल्या निवृत्तीची स्टाईलही आपल्या फिनिशिंग टच सारखी ठेवली. त्याने कोणालाही थांगपत्ता न लागू देता त्याच्या पुनरागमनाची आशा पल्लवीत झाली असताना   निवृत्तीचा आपला अखेरचा षटकार मारला आणि आपल्या कारकिर्दीला फिनिशिंग टच दिला. त्याच्यावर राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराज सिंग यांना चांगल्या पद्धतीने निवृत्ती घेऊ दिली नाही असे आरोप होते.

पण, त्याने दाखवून दिले की त्याच्या दृष्टीने एकच महान गोष्ट आहे ती म्हणजे 'खेळ'. ज्यावेळी तुमचा 'खेळ' संपतो त्यावेळी मागे सरका आणि दुसऱ्याला संधी द्या. धोनीने आपल्या निवृत्तीच्या षटकाराने याच तर नव्या ट्रेंडची पायाभरणी केली आहे. त्याने कोणतीही फेअरवेल मॅच खेळली नाही. कोणतीही निवृत्तीची प्रेस कॉन्फरन्स नाही. इन्स्टाग्रामवर एक इन्स्टंट फोटोंचा स्लाईड शो आणि त्याच्या बॅकग्राऊंड 'मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी हैं पल दो पल मेरी हस्ती हैं!'

हेही वाचा : 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

(दैनिक पुढारीमधून साभार)