म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीचा फायदा हा केवळ गुंतवणूकदारांनाच नाही, तर गुंतवणूकदाराच्या वारशालाही मिळतो. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास ही गुंतवणूक कोणाच्या नावावर व्हावी, ही गोष्ट गुंतवणुकीच्या वेळी नॉमिनीचा उल्लेख करून मार्गी लावू शकतो. जर नॉमिनी नसेल तर फंडमधल्या गुंतवणुकीवर कोण दावा करू शकतो, हे समजून घ्यायला हवं.
म्युच्युअल फंड एकटा असो किंवा संयुक्त गुंतवणूकदार असो. प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम असतात. मात्र गुंतवणूकदारांनी पुढच्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी वारसदार नेमणं हिताचं आहे. तसंच प्रत्येक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरू करताना म्युच्युअल फंडच्या व्यवहाराची प्रक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीत नॉमिनीचा उल्लेख नसेल तर त्यावरही अनेक पर्याय आहेत. त्या आधारावर युनिटवर दावा करता येतो.
हेही वाचा: एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय
बहुतांशी भारतीय घरात घराचा कर्ता पुरुष नेमकी कुठे गुंतवणूक करतो, याची फार कमी माहिती कुटुंबातल्या सदस्यांना असते. पण परिस्थिती अशी नसावी, अशी अपेक्षा आहे. कर्त्या पुरुषाने घरातल्या सदस्याला किंवा विश्वासू मित्राला गुंतवणुकीची माहिती देणं आवश्यक आहे.
जेणेकरून भविष्यात कुटुंब आर्थिक अडचणीत सापडणार नाही. म्युच्युअल फंडच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गुंतवणूकदार संयुक्त असेल तर आणि पहिल्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यावर म्युच्युअल फंडचे युनिट्स दुसर्या गुंतवणूकदाराला मिळतील. जर म्युच्युअल फंडमधे एकल गुंतवणूकदार असेल, तर वारसदाराला म्युच्युअल फंडचे युनिट्स मिळतील.
म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीचा फायदा हा केवळ गुंतवणूकदारांनाच नाही, तर गुंतवणूकदाराच्या वारशालाही मिळतो. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास ही गुंतवणूक कोणाच्या नावावर व्हावी, ही गोष्ट गुंतवणुकीच्या वेळी नॉमिनीचा उल्लेख करून मार्गी लावू शकतो. जर नॉमिनी नसेल तर फंडमधल्या गुंतवणुकीवर कोण दावा करू शकतो, हे जाणून घेऊ या.
म्युच्युअल फंडची गुंतवणूक संयुक्तपणे असल्यास पहिल्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास यातले युनिट्स हे दुसर्या गुंतवणूकदारांना मिळतात. जर म्युच्युअल फंडचा एकच गुंतवणूकदार असेल, तर अशा स्थितीत ते युनिट वारसदारांना मिळेल. युनिट्सच्या या प्रक्रियेला ट्रान्समिशन असं म्हणतात.
पहिल्या जॉईंट होल्डरचा मृत्यू झाल्यास दुसर्या होल्डरला युनिट मिळतील. यासाठी दुसर्या होल्डरला पहिल्या गुंतवणूकदाराचं मृत्यू प्रमाणपत्र, अकाऊंट क्लोजिंग फॉर्म सादर करावा लागेल. युनिट्स ट्रान्स्फर करण्यासाठी जर दुसर्या होल्डरचं खातं नसेल, तर नवीन डिपॉझटरीचं खातं सुरू करावं लागेल. ट्रान्समिशनसाठी फर्स्ट होल्डरचं मृत्यू प्रमाणपत्र तसंच दुसर्या होल्डरचं ओळखपत्र सादर करावं लागेल. नवीन फर्स्ट होल्डरचा कॅन्सल चेकही जमा करावा लागेल.
पतीच्या मृत्यूनंतर पत्नी सीएएमएस किंवा कार्वी एमएफएसकडे जाऊ शकते. तिथं पत्नीला गुंतवणूकदारांशी असलेले संबंध सिद्ध करून दाखवावं लागेल. त्यासाठी लग्नाचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रं जमा करावी लागतील. सीएएमएस, कार्वी संस्था संपूर्ण कागदपत्रांची चाचपणी करेल आणि त्यानंतर फोलिओ किंवा अकाऊंट स्टेंटमेंट पत्नीच्या नावावर ट्रान्स्फर केले जातात.
हेही वाचा: आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?
म्युच्युअल फंडच्या सर्व होल्डरचा मृत्यू झालेला असल्यास आणि नॉमिनीची नोंद असेल, तर अशा स्थितीत एएमसीमधे वेगवेगळ्या ट्रान्समिशनसाठी कागदपत्रं सादर करावे लागतील. मृत युनिट होल्डरची मूळ किंवा अटेस्टेड फोटोकॉपी संस्थेला सादर करावं लागेल. नॉमिनी किंवा वारसदाराचे केवायसी कन्फरमेशनही आवश्यक आहे. नवीन बँकेचा कॅन्सल चेक, बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. यावर नॉमिनीचं नाव असणं गरजेचं आहे. एफएटीसीए सेल्फ सर्टिफिकेशनही महत्त्वाचं असतं.
अनेकदा अशी स्थिती निर्माण होते की, कोणी होल्डरही नसेल आणि वारसदारही नसतो. अशा वेळी कागदपत्रांची गरज वाढते. कायदेशीररीत्या वारस म्हणून सिद्ध करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर शपथपत्र द्यावं लागतं. इंडेन्मिटी बाँडच्या सर्व कायदेशीर वारसदारांना सह्या कराव्या लागतात. दाव्याची रक्कम जर २५ लाखांपेक्षा कमी असेल, तर अशा वेळी पुराव्यासाठी कागदपत्रं सादर करणं बंधनकारक आहेत. जर दाव्याची रक्कम अधिक असेल तर मृत्युपत्राची नोटराईज कॉपी, सक्सेक्शन सर्टिफिकेट द्यावं लागेल. लेटर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, एफएसीटीएचं विवरणही द्यावं लागेल.
सिंगल होल्डर असेल तर घटस्फोटीत महिलाही फंड्स काढू शकते. गरज वाटल्यास गुंतवणूकही सुरू ठेवू शकते. जर संयुक्त गुंतवणूक असेल तर दोघांच्या सह्या असणं गरजेच्या आहेत. संयुक्त खातं असेल आणि पत्नी पहिली होल्डिंग असेल तर पत्नी जॉईंट होल्डरला खात्यातून काढून टाकू शकते. पत्नीला घटस्फोटाचं प्रमाणपत्र आणि पतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागेल.
गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्यानंतर त्याच्या मालमत्तेवर हक्क हा नॉमिनीचा असतो. गुंतवणूकदार कोणालाही नॉमिनी करू शकतो. नॉमिनी पती किंवा पत्नी, मुलगा किंवा कुटुंबातला कोणताही सदस्य असू शकतो. मित्र किंवा असा कोणत्याही विश्वासू व्यक्तीला नॉमिनी करू शकतो. सिंगल होल्डिंगमधे सुरू होणार्या गुंतवणुकीत नॉमिनी असणं गरजेचं आहे. जॉईंट होल्डिंगमधे नॉमिनीची गरज लागत नाही.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या अर्जात एक कॉलम असतो. त्यात नॉमिनीचं विवरण सादर करू शकता. गुंतवणूकदार एकट्याने किंवा संयुक्त रूपाने नॉमिनी नेमू शकतो. नॉन-इंडिव्हिज्युअल जसे की सोसायटी, ट्रस्ट नॉमिनी नेमू शकत नाहीत. कोणताही गुंतवणूकदार तीन नॉमिनी नेमू शकतो. कोणत्या नॉमिनीला किती वाटा मिळावा हे स्वत: गुंतवणूकदार निश्चित करू शकतो. जर वाटा निश्चित नसेल तर प्रत्येक नॉमिनीला समान वाटा मिळेल.
गुंतवणूकदार कोणत्याही वेळेला नॉमिनीत बदल करू शकतो. गुंतवणूकदार आपल्या मर्जीने जुन्या नॉमिनीला पुन्हा नेमू शकतो आणि नवीन नॉमिनीची निवड करू शकतो. नॉमिनी नसल्यास कायदेशीररीत्या वारसांत अडचणी येतात. ट्रान्समिशनसाठी बर्याच किचकट औपचारिकता पार पाडाव्या लागतात. अनेक कागदपत्रं जमा करावी लागतात. त्यामुळे गुंतवणूक करताना अर्जात नॉमिनीचा उल्लेख आठवणीने करणं हिताचं ठरतं.
हेही वाचा:
नाहीतर आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं नाही!
तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस भारतात इन्वेस्टमेंट का करतोय?
एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट