विस्तारवादाचं युग संपलं, हा विकासवादाचा काळ आहेः नरेंद्र मोदी

०४ जुलै २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला अचानक लेहला भेट देत भारतीय जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जवानांना भेटण्यास मोठं महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी भाषण करताना पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं मनोबल उंचावत असतानाचा चीनलाही नाव न घेता इशारा दिला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.

भारत-चीन सीमेवर गेल्या दोनेक महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे. चीनच्या घुसखोरीला भारतीय जवान चोख प्रत्यूतर देत आहेत. चिनी सैन्यानं भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं मीडियातून बोललं जातंय. अशातच १५ जून २०२० ला गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबतच्या झटपटीत भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचे जवानही मारले गेल्याच्या बातम्या आल्या. चीन सीमेवरून मागं हटायला तयार नाही. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांत चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलै २०२० ला अचानक लेहला भेट दिली. गलवान खोऱ्यातल्या चकमकीत जखमी झालेल्या जवानांची पंतप्रधांनी लष्करी रूग्णालयात जावून विचारपूस केली. लेहजवळच्या निमू भागात पंतप्रधानांनी भारतीय जवानांशी संवाद साधला. त्यांचा भाषणाचा हा संपादित अंश.

भारत माता की – जय,
भारत माता की – जय,

भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही दाखवत असलेलं शौर्य, धाडस आणि समर्पित वृत्ती असामान्य आहे. इतक्या उंच प्रदेशात, कठीण परिस्थितीत आपण ज्या पद्धतीने भारत मातेचं रक्षण आणि सेवा करत आहात ते जगात कोणीही करू शकणार नाही. तुम्ही ज्या उंचावर काम करत आहात त्यापेक्षा जास्त उत्तुंग तुमचं शौर्य आहे. तुमच्या सभोवताली असलेल्या पर्वतांप्रमाणे तुमची इच्छाशक्ती भक्कम आहे.

भक्कम इच्छाशक्ती असलेल्या तुमच्या हातांमध्ये देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने, देशाचा विश्वास अढळ आहे. तुमची समर्पित वृत्ती देशाच्या प्रत्येक नागरिकाला रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा देते.

हेही वाचा : चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

आपल्या त्याग आणि बलिदानाने आत्मनिर्भर भारताचं स्वप्न अधिकच दृढ झालंय. आपण दाखवलेल्या शौर्यानं संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याचा संदेश मिळाला. मला तुमच्यामध्ये महिला सैनिकही दिसत आहेत. रणांगणावर, सीमेवर हे पाहायला मिळणं, सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

राष्ट्रदकवी रामधारी सिंह दिनकर यांनी लिहिलंय, 

जिनके सिंहनाद से सहमी। धरती रही अभी तक डोल।।
कलम, आज उनकी जय बोल। कलम आज उनकी जय बोल।।

मी तुमचे कौतुक करतो आणि तुमचा जयघोष करतो. मी पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या वीर जवानांना आदरांजली वाहतो. त्यांचं धाडस आणि शौर्य यासाठी ही भूमी त्यांना नेहमीच अभिवादन करेल. प्रत्येक भारतीय नागरिकाचा आपल्या शौर्याला सलाम. संपूर्ण जगाने आपलं अद्वितीय शौर्य पाहिलंय, आपल्या शौर्याच्या कथा घरोघरी सांगितल्या जात आहेत. आपला त्वेष आणि दाहकता शत्रूने पाहिलीय.

लडाख ही देशासाठी कोणताही त्याग करायची तयारी असलेल्या देशभक्तांची भूमी आहे. कुशोक बकुला रिनपोशे यांच्यासारखे महान देशभक्त लडाखने या देशाला दिलेत. लडाखमधले लोक, मग ते सैनिक असोत किंवा नागरिक, देश बळकट आणि सामर्थ्यशाली करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

मला तुमच्या डोळ्यात मातृभूमीच्या रक्षणाचा निर्धार आणि बांधिलकी दिसते. तुम्ही त्या भूमीचे शूर सुपुत्र आहात ज्या भूमीने हजारो वर्षांपासून ज्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपला छळ केला त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. आपल्याला नुकसान पोचवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची आपली प्रदीर्घ परंपरा आहे. आम्ही बासुरीवादक कृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. एवढंच नाही तर सुदर्शन चक्रधारी कृष्णालाही आपण आदर्श मानतो. याच प्रेरणेतून प्रत्येक हल्ल्यानंतर भारत अधिकच बलवान झालाय.

शांतता आणि मित्रत्व, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, जग आणि मानवतेसाठी आवश्यक असल्याचं सर्वांनाच मान्य आहे. दुर्बल, शांतता आणू शकत नाहीत. शौर्य, शांतता स्थापन करू शकते. भारत आपली क्षमता भूमी, जल आणि अंतराळात विस्तारत आहे. हे इतर कशासाठी नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी आहे. आपल्या संरक्षण प्रणालीला अत्याधुनिक बनवण्याचं, भारतीय लष्करासाठी सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचं, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्टदेखील त्यासाठीच आहे.

आपले शूरवीर आणि महिलांचं साहस यांचं जग नेहमीच साक्षी राहिलंय. जागतिक शांततेसाठीचं त्यांचं योगदानही जगाने पाहिलंय. आपण सदैव मानवतेच्या रक्षणासाठी काम केलंय आणि प्राण अर्पण केलेत. आपण सर्वजण या परंपरेनुसार जीवन व्यतीत करत आहात.

तमिळ संतकवी थिरुवल्लुवर यांनी शेकडो वर्षांपूर्वी म्हटलंय,

मरमानम मांड वडिच्चेलव्  तेट्रम   
येना नान्गे येमम  पडईक्कु

म्हणजेच शौर्य, आदर, विवेकी वर्तन आणि विश्वासार्हता ही आपल्या देशाच्या लष्कराचं वर्णन करणारी चार वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या संरक्षण दलांनी नेहमीच या मार्गावर वाटचाल केलीय.

हेही वाचा : छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

विस्तारवादाच्या युगाचा अंत झालाय. सध्याचं युग हे विकासाचं आहे. झपाट्यानं बदलणाऱ्या काळात केवळ विकासालाच संधी आहे, आणि हा विकासवादच भविष्याचा पाया आहे. गेल्या शतकांमधे विस्तारवादानंच मानवतेचे सर्वांत मोठं नुकसान केलंय, मानवतेच्या विनाशाचा प्रयत्न केलाय. ज्याच्या कुणाच्या डोक्यात विस्तारवादाची हवा जाते, त्यांनी नेहमीच जगाच्या शांततेपुढे धोका निर्माण केलाय. आणि अशा विस्तारवादाच्या अस्ताचा इतिहास साक्षीदार आहे. संपूर्ण जगाची विस्तारवादाविरोधात मानसिकता तयार झालीय. जग विकासवाद, विकासाप्रती समर्पित आहे. विकासावर लक्ष केंद्रित करण्याचं स्वागत केलं जातंय.

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील निर्णयांचा मी विचार करतो, त्यावेळी माझ्या मनात दोन मातांचे विचार येतात. एक आपली सर्वांची भारत माता आणि दुसऱ्या त्या शूर माता ज्यांनी तुमच्यासारख्या धाडसी सैनिकांना जन्म दिला. तुम्हा सर्वांचा, तुमच्या कुटुंबाचा सन्मान आणि देशाचं संरक्षण याला देशाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आधुनिक शस्त्रास्त्र असोत किंवा सैनिकांना सुविधा असोत, आम्ही त्याकडे बारकाईने लक्ष पुरवत आहोत.

शौर्य आपल्याला काय योग्य आहे ते दाखवायला शिकवते. आणि योग्य ते करण्यासाठी आपल्याला ऊर्जा देते. आपल्या सैनिकांनी गलवान खोऱ्यात सर्वोच्च वीरतेचे दर्शन घडवलंय. देशाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही सर्वजण खडतर परिस्थितीत उत्तम काम करत आहात. तुम्ही सर्वांनी देशाच्या सेवेला वाहून घेतलंय. तुमच्या खडतर कष्टांमुळे देश एकजुटीने अनेक आव्हानांना तोंड देतोय. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही प्रत्येक आव्हानावर आणि अडचणीवर विजय मिळवत राहू.

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?