अमर्याद सुरूय प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं

१० ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


सुशांत सिंग प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं त्यांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवली तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. या प्रकरणाचा वापर करून सगळेच आपापला स्वार्थ साधून घेतायत.

सुशांत सिंग राजपूतच्या करूण अंतानंतरही त्याच्या मृत्यूभोवती उठलेलं वादळ शमलेलं दिसत नाही. हे वादळ मुळात सुरू झालं तेव्हा अनेक टीवी चॅनेलने याबाबतीत वेगवेगळे तर्क-वितर्क मांडायला सुरूवात केली. या सगळ्या तर्कांच्या तळाशी एकच आक्षेप होता की, सुशांतचं मरण हे अचानक होतं. मुंबई पोलिसांनी घाईघाईत या घटनेचा तपास केला आणि लागलीच सुशांतनी आत्महत्या केली आहे, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले.

या सगळ्या केसला सुशांतच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी झालेली दिशा सालियन हिच्या आत्महत्येची पार्श्वभूमी होती. दिशा ही पूर्वी सुशांतची मॅनेजर असल्यामुळे तिच्या मृत्यूचेही धागेदोरे सुशांतशी जोडले गेले. त्यानंतर सुशांतचे पालक पाटणा पोलिसांकडे गेले आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने सुशांतशी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. यामुळे पाटणा पोलिस मुंबईत आले आणि या प्रकरणाबद्दल जास्त सतर्क झाले. आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरता प्रवर्तन निदेशनालय म्हणजेच ईडीचाही तपास सुरू झाला.

हे सगळं चालू असतानाच टीवी चॅनेलवर या प्रकरणावरचं कुतुहल वाढत होतं. या प्रकरणात आधी कुणीच पुढे येऊन गुन्हा न नोंदवल्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली नव्हती. पण या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता त्याचा तपास घेणं मुंबई पोलिसांनी थांबवलं नव्हतं. बिहार पोलिसांकडे सुशांतच्या पालकांनी एफआयआर नोंदवला तिथपासून या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आणि मग प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा अमर्याद कार्यक्रम सुरू झाला.

अनेक लोक वेगवेगळे प्रमेयं घेऊन येऊ लागले. लोकांचे आरोप हेच सत्य असल्याप्रमाणे न्यूज चॅनेल तेच दाखवत होते. एका वैज्ञानिक आणि निष्पक्ष, निरपेक्ष तपासाची जागा गोंगटाच्या वादळांनी घेतली. हे वादळ कोणतं? ते समजून घ्यावंच लागेल.

हेही वाचा : अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

नेपोटिझमने मंदावली तपासाची गती

नेपोटिझमचा आरोप हिंदी फिल्म इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. कोट्यावधींची उलाढाल असूनही हा उद्योग काही भाषिक समाजांच्या धनाढ्य परिवारांनी अगदी पेढी चालवतात तसा चालवला. अशा परिस्थितीतही गेली काही वर्षं ओटीटीमुळे म्हणा किंवा या उद्योगाचा व्याप वाढल्यामुळे म्हणा अनेक छोट्या शहरातल्या तरुणांनी आपलं नाव सिनेउद्योगात कमावलं आणि मोठे झाले.

सुशांतच्या केसनंतर अनेकांनी नेपोटिझमबद्दल आपलं रडगाणं गायला. यात अगदी ए. आर. रेहमानपासून ते सोनू निगमसारख्या प्रथितयश लोकांचाही समावेश होता. त्यांच्यापैकी प्रत्येकाने केलेली तक्रार त्यांच्या त्यांच्या जागी योग्य असूनही या केसशी त्याचा तसा संबंध नव्हता. पण बॉलिवूडमधल्या मोठ्या मंडळींनाही नेपोटिझमची झळ सोसावी लागत असेल तर सुशांत तरी त्यापासून कसा वाचेल अशी धारणा प्रबळ झाली. 

इतकंच नाही तर त्यामुळेच सुशांतने आत्महत्या केली किंवा त्याची हत्या केली गेली, असं प्रत्येकाच्याच मनात रूजलं. नेपोटिझमची गोष्ट खरंतर अत्यंत व्यक्तीसापेक्ष आहे. कायदेशीर प्रक्रिया ही पुराव्यांनी चालत असते. त्यामुळे या चर्चांनी टीवी कार्यक्रमांची रंगत वाढवली असली तरी तपासाची गती नक्कीच मंदावली.

सूडबुद्धीने ग्रासलेला विरोधी पक्ष

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आलं याची खदखद आणि त्याचा राग विरोधी पक्षात अजूनही आहे. त्यामुळे पालघरची स्थानिक घटना असू दे किंवा सुशांतच्या मृत्यूची राष्ट्रीय घटना असू दे, प्रत्येक घटनेतून सरकारचं अपयश दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न सध्या सुरू आहे. मुंबईत कमी झालेल्या कोरोनाच्या केस, धारावीसारख्या ठिकाणी आटोक्यात आलेलं कोरोनाचं तांडव आणि एकंदर राज्य सरकारचं यश झाकोळून टाकण्यासाठी सुशांत सिंगच्या केसचा सर्रास वापर होताना दिसतोय. 

ज्या मुंबई पोलिसांच्या बळावर पाच वर्षं राज्य केलं त्याच मुंबई पोलिसांना अकार्यक्षम आणि अपयशी दाखवण्याचा एक क्रम चालू आहे. सीबीआयला सुप्रीम कोर्टाने पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पोपट अशी उपमा दिली होती. आता त्याच सीबीआयच्या हातात ही केस द्या अथवा आरोपी तावडीतून सुटतील, असं सांगण्यात येतंय.

 

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

बिहारच्या निवडणुकीतली राजकीय पळवाट

एका केसचा तपास दोन वेगवेगळ्या राज्यातल्या पोलिसांनी करायची ही पहिली वेळ नाही. अशी केस असेल तर साधारणपणे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे, त्या केसशी निगडीत बाबींचा तपास दोन्ही राज्यातले पोलिस समन्वयाने आणि समजूतदारपणे करतात. नाहीतर, परस्पर संमंतीनं एफआयआर होत नाही आणि ज्या राज्यात गुन्हा घडला आहे त्या राज्याच्या पोलिसांकडे ती केस सुपूर्त केली जाते. पण एखाद्या केसच्या तळाशी राजकीय लागेबंधे असतील तर त्यात समन्वयाची आशा करणं दुरापास्तच म्हणावं लागेल.

बिहारमधे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वाईट बातम्या येतायत. बिहारमधे आलेल्या पुरात ११पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला तर ३८ लाख लोकांना पुराचा फटका बसला. कोरोनाच्या ५०,९८७ पेशंटपैकी ३३६५० बरे झालेत. तर जवळपास ३०० लोकांचा जीव गेला. मुंबईहून परत आपल्या गावी आलेल्या मजुरांचा प्रश्न अजुनही आ वासून उभा आहे. अशा परिस्थितीत बिहारचे मुख्यमंत्री सुशासन बाबू यांना हवी असणारी राजकीय पळवाट सुशांत सिंगच्या प्रश्नाने मिळाली. 

भुताटकीचे रंजक निष्कर्ष

या सगळ्यात मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव आलाय. पत्रकारितेच्या काही मुलभूत ठोकताळ्यांची पायमल्ली होताना दिसतेय. एखादी संशयास्पद मृत्यूची बातमी कशी लिहावी, कोणाशी बोलावं, सर्व बाजूंचा विचार कसा करावा याची जागा फक्त आपल्या चॅनेलच्या किंवा पेपरांच्या मालकांना काय आवडेल याने घेतलीय. रियाची काळी जादू, बंगाली स्त्रिया नव-याला फसवतात इथंपासून ते भुताटकी असलेल्या घरापर्यंत अनेक रंजक निष्कर्ष काढले जातायत.
 
सुशांतची अखेर करुण होती. पण त्याहीपेक्षा विदारक आहेत त्यातून उन्मत झालेल्या या गिधाडांचं घोंघावणं. या गोंगाटतून सुरेल धून तेव्हाच निघेल जेव्हा लवकरात लवकर या केसची शहानिशा होईल आणि दोषींना शिक्षा मिळेल. राजकारणाने राजकारण वाढतं पण समन्वयाने समस्या सुटतात.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

२६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाण

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज