भारत-चीन सीमेवर महिनाभरापासून तणावाची परिस्थिती आहे. पण चीनी सैन्यासोबतच्या झटपटीत २० भारतीय जवान शहीद झाल्यावर पहिल्यांदा सरकारनं या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. १५ एप्रिलला घडलेल्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत प्रतिक्रिया दिली. पण पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया आणि चीनी सैनिकांसोबतच्या झटपटीनंतरची प्रतिक्रिया दोन्हींमधे खूप मोठा फरक आहे.
मुत्सद्दीपणा आणि रणनीतीची भाषा खूप गुंतागुंतीची असते. याला निवडणुकीच्या भाषेपासून वेगळं ठेवलं पाहिजे. वॉट्सअप युनिवर्सिटीतून आलेल्या मीम्समधून देशाला समजून घेऊ नका. चीनने लडाखमधे प्रत्यक्ष नियंत्रण रेखा म्हणजेच एलएसीवर कब्जा केलाय किंवा नाही, भारतीय सीमेत घुसलेत का, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पंतप्रधानांच्या पहिल्यावहिल्या प्रतिक्रियेत मिळतात का? आधी आपण पंतप्रधानांचं कालचं विधान वाचा आणि मग पुलवामा हल्ल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया बघा.
‘साथियों,
भारत मातेच्या वीर जवानांनी गलवान खोऱ्यात आपल्या मातृभूमीचं संरक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलंय. मी देशाच्या सेवेत दिलेल्या त्यांच्या या बलिदानाला सलाम करतो. त्यांना कृतज्ञपणे श्रद्धांजली वाहतो. दुःखाच्या या कठीण प्रसंगात शहीदांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. आज सारा देश आपल्यासोबत आहे. देशाच्या भावना आपल्यासोबत आहेत. आमच्या या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. मग स्थिती काहीही असो, परिस्थिती काहीही होवो, भारत खंबीरपणे देशाची एक एक इंच जमीन, देशाचा स्वाभिमान यांचं संरक्षण करेल.
हेही वाचा : छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक शांतताप्रिय देश आहे. आमचा इतिहास शांततेचा राहिलाय. भारताचा वैचारिक मंत्रच लोकाः समस्ताः सुखिनों भवन्तु असा आहे. आम्ही प्रत्येक काळात साऱ्या जगाच्या शांतीची, साऱ्या मानवजातीच्या कल्याणाची कामना केलीय. आम्ही नेहमीच आपल्या शेजाऱ्यांसोबत सहकार्याच्या आणि मैत्रीच्या भावनेनं मिळून काम केलंय. नेहमीच त्यांच्या विकास आणि कल्याणाची कामना केलीय.
जिथं कुठं मतभेद होईल, त्यावेळी आम्ही मतभेदातून वाद होऊ नये, डिफरन्सेस डिस्प्युट्समधे बदलू नयेत यासाठी नेहमीच प्रयत्न केलेत. आम्ही कुणालाही स्वतःहून चिथावणी देत नाही. पण देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वा यात कोणती तडजोडही आम्ही करत नाही. गरज पडेल तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व यांच्या संरक्षणासाठी सारी ताकद पणाला लावलीय. आपली ताकद दाखवून दिलीय. त्याग आणि शिक्षण हे आमच्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहेत. त्यासोबतच विक्रम आणि वीरता हेही आमच्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहेत.
मला देशाला विश्वास द्यायचा की, आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. आणि त्यांचं संरक्षण करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. याविषयी कुणाच्याही मनात थोडासुद्धा संभ्रम असण्याची गरज नाही. भारताला शांतता हवीय. पण भारताला चिथावणी देणाऱ्यांना काही झालं तरी सडेतोड उत्तर दिलं जाईल. आमचे सैनिक मारत, मारत मेलेत, याबद्दल देशाला गर्व वाटला पाहिजे. माझा आपल्या सगळ्यांना आग्रह आहे, की आपण दोन मिनिटं मौन पाळून या जवानांना श्रद्धांजली वाहू.’
१४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा इथं दहशतवादी हल्ला झाला होता. पंतप्रधान त्यादिवशीच डिस्कवरी चॅनलसाठी फिल्म शुटिंग करत होते. फिल्म शूटिंग हीसुद्धा जनसेवाच आहे. जनहितच आहे. सर्व घडामोडी समजून घेतल्यावर शेवटी १५ जूनला पंतप्रधानांची पुलवामा हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया आली.
‘सगळ्यात आधी मी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातल्या शहीद जवानांनी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. त्यांनी देशाची सेवा करताना आपला प्राण दिलाय. दुःखाच्या या प्रसंगात मी आणि प्रत्येक भारतीय त्यांच्या परिवारासोबत आहोत. या हल्ल्यामुळे देशात संताप व्यक्त होतोय. लोकांचं रक्त खवळतंय, याची मला नीट जाणीव आहे. काहीतरी केलं पाहिजे, ही सध्या देशाची जी भावना आहे, ती स्वाभिवकच आहे. आपल्या संरक्षण यंत्रणांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलंय. आम्हाला आपल्या सैनिकांच्या शौर्यावर, त्यांच्या धाडसावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे, की दहशतवाद्यांना ठेचून काढण्याच्या आमच्या लढाईला आणखी वेग येण्यासाठी देशभक्तीच्या रंगात मिसळून गेलेले लोक आपल्या यंत्रणेला योग्य माहिती पुरवतील. मी दहशतवादी संघटना आणि त्यांच्या सुत्रधारांना एक गोष्ट सांगू इच्छितो, की त्यांनी खूप मोठी चूक केलीय आणि त्यांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.’
हे कोरोना स्पेशलही वाचाः
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
मी देशाला विश्वास देतो, की हल्ल्यामागं ज्या कुठल्या शक्ती आहेत, जे कुणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळेल. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या भावनांचाही मी आदर करतो. त्यांच्या भावना मी समजू शकतो आणि टीका करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण माझी सर्वांनाच एक विनंती आहे, की हा क्षण खूप संवेदनशील आणि भावनिक आहे. पक्ष-विपक्ष या राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. या हल्ल्याचा देश एकजूट होऊन सामना करतोय. देश एक साथ आहे, देशाचा आवाज एक आहे आणि हाच आवाज साऱ्या जगात गेला पाहिजे. कारण आम्ही लढाई जिंकण्यासाठी लढतोय.
साऱ्या जगात वेगळं पडलेल्या आमच्या शेजारी देशाला असं वाटत असेल की, आपल्या कृत्यानं, कटानं भारतात अस्थैर्य निर्माण करण्यात यश येईल. पण त्यांनी अशी स्वप्नं बघणं नेहमीसाठीच सोडून दिलं पाहिजे. ते कधीच असं करू शकत नाहीत आणि असं होणारही नाही. सध्या आर्थिक तंगीतून जाणाऱ्या आमच्या शेजारी देशाला असं वाटतंय, की असं काही करून भारताला संकटात ढकलता येईल. पण त्यांचे हे मनसुबे कधीच खरे होणार नाहीत. काळानंच सिद्ध केलंय, की ते ज्या रस्त्यानं चाललेत तो विध्वंसाचा आहे आणि आम्ही जो रस्ता निवडलाय, तो प्रगतीचा हमरस्ता आहे.
१३० कोटी भारतीय अशा प्रत्येक कटाला, अशा हल्ल्याला जशास तसं प्रत्यूत्तर देतील. अनेक मोठ्या देशांनी या दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केलीय. तसंच भारतासोबत उभं राहत भारताला पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केलीय. मी त्या सर्व देशांचा आभारी आहे. सर्वांना आवाहन करतो, की दहशतवादाविरोधात सर्वच मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन लढावं लागेल. दहशतवादाला संपवावं लागेल. दहशतवादविरुद्ध लढण्यासाठी सर्वच देशांनी एकमत, एक स्वर, एका दिशेने पावलं टाकली तर दहशतवाद काही क्षणही टिकाव धरू शकणार नाही.
पुलवामा हल्ल्यानंतर देशात दुःख आणि आक्रोशाची भावना पसरलीय. अशा हल्ल्यांचा देश धाडसानं सामना करेल. हा थांबणारा देश नाही. आपल्या शहिदांनी प्राणांची आहुती दिलीय. आणि देशासाठी जीव देणारा प्रत्येक शहीद दोनच स्वप्नं बघतो. एक, देशाची सुरक्षा आणि दुसरं म्हणजे देशाचं समृद्ध भविष्य. सगळ्या शहिदांना, त्यांच्या आत्म्याला नमन करून पुन्हा एकदा हा विश्वास देतो, की ज्या दोन स्वप्नांसाठी त्यांनी आयुष्याची आहुती दिलीय, त्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी आम्ही क्षण न क्षण कारणी लावू. प्रगतीच्या मार्गाला अधिक गती देऊन विकासाच्या वाटेवर अजून जोमात चालू लागू. या प्रवासात वीरांच्या आहुतीचं मोल सतत जागवत राहू. त्याचाच भाग म्हणून मी 'वंदे भारत एक्सप्रेस'ची संकल्पना आणि डिजाईनसह तिला प्रत्यक्षात धावायला मदत करणारे इंजिनियर, कामगार या सगळ्यांचे आभार मानतो.’
हेही वाचा :
चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे
लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?
पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज