पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

२० एप्रिल २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


पालघरमधे कल्पवृक्षगिरी महाराजांसह इतर दोघांची एका झुंडीनं हत्या केली. मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.

पालघरच्या मॉब लिंचिंग प्रकरणानं देशात खळबळ उडवून दिलीय. गुरुवारी १६ एप्रिलला घडलेली ही घटना रविवारी सोशल मीडियाच्या हॅशटॅगमधे आला. सोशल मीडियातून राज्य सरकारवर खूप टीका झाली. सगळ्या घटनाक्रमाला धार्मिक अँगलही देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालघरचा घटनाक्रम आणि मॉब लिंचिंगबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते पत्रकार रवीश कुमार यांनी सविस्तर मत मांडलंय.

रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे ही घटना शनिवारी घडल्याचं म्हटलंय. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघरची घटना १६ एप्रिलला गुरुवारी घडल्याचं म्हटलंय. लेखामधे ही फॅक्ट दुरुस्त केलीय. त्यांच्या लेखवजा फेसबूक पोस्टचा अनुवाद इथे देतोय.

 

नेमका घटनाक्रम काय?

मुंबईपासून सव्वाशे किलोमीटरवर पालघरमधे एक भयंकर घटना घडली. गडचिंचले गावाजवळ एका खुनी झुंडीनं दोन महाराज आणि एका कारचालकाला गाडीतून ओढून जीवानिशी मारलं. यात ७० वर्षांचे कल्पवृक्षगिरी महाराजही होते. तसंच त्यांचे सहकारी सुशील गिरी महाराज आणि ड्रायवर निलेश तेलंगे हेही झुंडीच्या कचाट्यात सापडले. तिघंही आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सूरतला जात होते.

घटनास्थळावर पोलिसही होते. पोलिसांनी झुंडीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या झुंडीनं थेट पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस पीडितांना हॉस्पिटलमधे नेणार होते, पण या झुंडीनं आणखी उग्र रूप धारण केलं. पोलिसांची गाडीही फोडली. पोलिस कर्मचारीही जखमी झाले. कसंबसं जखमींना हॉस्पिटलमधे आणण्यात आलं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

हेही वाचाः बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

पोलिस काय करत होते?

महाराष्ट्र पोलिसांनी हत्या प्रकरणात ११० लोकांना अटक केलीय. जंगलात लपून बसलेले आणखी काही जणांचा पोलिस शोध घेत आहेत. वॉट्सअपवरून पसरलेल्या अफवेवरून एक अफवा पसरलीय. मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय झाल्याचं ही ती अफवा असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. पोलिस अफवा कशी पसरली आणि हत्येमागं दुसरीही काही कारणं आहेत का याचा शोध घेत आहेत. आता पोलिसांनी एका गोष्टीचं उत्तर द्यायला पाहिजे. एवढे दिवस अफवा पसरत होती, तर तेव्हा पोलिस काय करत होते?

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलंय. ‘हल्ला करणारे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात सोशल मीडियावरून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस आणि सायबर पोलिस यांना कठोर कारवाईचे आदेश दिलेत.’

पण माझी भूमिका खुनी झुंड दुसऱ्या कुठल्या धर्माची असती तरीही अशीच असती. हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करताना कोणतीही हयगय नको आणि हिंसा करणाऱ्यांच्या बाजूनही उभं राहायला नको. आपण हिंसा करणाऱ्यांचं समर्थन करू लागलो तर अशा मानसिकता घरांमधे लोकांना खुनी तयार करेल. जसं हिंदू-मुस्लिम करणाऱ्या आयटी सेलची टोळी करते. ही घटना गुरुवारची आहे. त्यादिवशी मला कुणीच काही म्हटलं नाही. अचानक रविवारी संध्याकाळी ही टोळी मला शिव्याशाप देऊ लागली. तोपर्यंत मला तर या घटनेबद्दल काही माहीतही नव्हतं.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

म्हणून कॅम्पेन का चालवत नाहीत?

मी गप्प का, असं विचारत मला शिवागाळ करणं सुरू झालं. अखलाकचा उल्लेख करू लागले. मला शिव्या देणारे हे लोक अखलाकच्या हत्येचा निषेध करता किंवा नाही याविषयी काही सांगत नाहीत. पण त्यांना मी निषेध करून खूप मोठा गुन्हा केलाय, असं वाटतं. याबद्दल त्यांच्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे. मी तर सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येचाही निषेध केला होता. हीच आयटी सेलची टोळी पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांना न्याय मिळावा म्हणून कॅम्पेन का चालवत नाहीत?

मला वाटतं, आयटी सेलची हिंदु-मुस्लिम करणारी सांप्रदायिक टोळी राजस्थानच्या कोटामधे अडकलेल्या बिहारच्या विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवत असतील. बिहारमधे एका भाजप आमदारानं आपल्या पोराला तिथून आणलं. पण मुख्यमंत्री नितीशकुमार हे उर्वरित विद्यार्थ्यांना राज्यात येऊ देत नाहीत. यासाठी ते लॉकडाऊनच्या नियमांकडे बोट दाखवतात. आपल्या मित्रपक्षाच्या आमदाराला मुख्यमंत्री काही नीतिच्या गोष्टी सांगणार का? कुठल्या आयटी सेलवाल्यानं मला यावर लिहायचं आव्हान का दिलं नाही?

कुठं काही घटना घडली की मला शिवागाळ का करू लागतात? मी थोडीच पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आहे? आणि घटना घडलेली नसली तरी आयटी सेलच्या फॅक्टरीतून माझ्यावर शिवागाळ केली जाते. हीसुद्धा एक प्रकारची मॉब लिंचिंगच आहे. मी तर अनेक गोष्टींवर लिहीत नाही. आणि जेव्हा खरी गोष्ट सांगू पाहतो तेव्हाही हे लोक मला शिव्या द्यायला येतात. यांची फॅक्टरीच माझ्या नावानं चालते. आपल्या सरकारच्या खोटारडेपणावर पडदा टाकण्यासाठी हे लोक हरेक क्षण हिंदू-मुस्लिम मुद्द्याच्या शोधात असतात.

हेही वाचाः लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

आत्ता साधूसंतही सुरक्षित राहिले नाहीत

झुंड तयार करण्याची प्रक्रिया एकसारखी आहे. नेहमीच झुंडीतून एक जमाव बनतो आणि तिथून आगीचा भडका होतो. आता ही प्रक्रिया आपल्याला समाजाचा एक अविभाज्य भाग बनत चाललीय. महाराष्ट्रात अगोदरही वॉट्सअपवरून मुलं चोरी करणाऱ्या टोळीबद्दलच्या अफवा पसरल्यात. झुंडीनं अनेकांच्या हत्याही केल्यात. समाजातल्या अमानवीपणामुळेच आज कल्पवृक्षगिरी महाराजांसारख्या निष्पाप व्यक्तीची निघृण हत्या झाली, ही खूप खेदाची बाब आहे.

मॉब लिंचिंग करणाऱ्या समाजात आत्ता साधुसंतही सुरक्षित राहिले नाहीत. विश्वास एवढा गमावून बसलोय की जमावाचं टाळकं सरकून जातं. ते समोर कोण आहे हे साधं बघतही नाहीत. त्यांना एवढंच माहीत असतं की आपण आत्ता हत्येच्या कर्मात सामील आहोत. कारण आपल्या आजूबाजूचा लोकही या कर्मात सामील आहेत.

हेही वाचाः 

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव

नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त