कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर.
भारतातल्या कोरोना बाधितांची संख्या ४ मे २०२० ला सकाळी अकरापर्यंत ४२,५३३ वर पोचलीय. सलग चौथ्या दिवशी दिवसभरात दोन हजाराहून जास्त पेशंट सापडलेत. तर आज सोमवारी गेल्या चोवीस तासांत २५५३ पेशंट आढळलेत. आतापर्यंत १,३७३ जणांचा बळी गेलाय. तर गेल्या २४ तासांत ७२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच रविवारी ३ मेला देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता म्हणून सैन्य दलानं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. कोरोनामुळे इतकी माणसांचे रोज जीव जातायत, मजूर चालत चालत घरी जातायत, त्यातल्या कित्येक लोकांचा मृत्यू होतोय. या सगळ्यांची मदत करण्याऐवजी हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी करण्यावर पैसा का खर्च केला जातोय, असा सूर सोशल मीडियावर उमटलेला दिसतो.
एनडीटीवीचे व्यवस्थापकीय संपादक आणि रॅमन मॅगसेसे विजेते पत्रकार रवीश कुमार यांनीही सरकारला हाच प्रश्न विचारलाय. ३ मे २०२० लिहिलेल्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा सदानंद घायाळ यांनी केलेला अनुवाद इथे देत आहोत.
हेही वाचा : ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र
कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ८३ लोकांचा मृत्यू झालाय. याआधीच्या २४ तासांतही कधीच एवढे मृत्यू झाले नाहीत. कोरोनाच्या संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १३०० हून अधिक झालीय. मग ही वेळ आनंदाची, जल्लोषाची आहे का? आणि तेही सैन्यदलाला पुढं करून. कारण सैन्याच्या नावावर प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जाईल.
लॉकडाऊनच्या काळात आम्ही असं काय कमावलंय की ज्यासाठी आम्ही पुष्पवृष्टी करतोय? कोरोनाबाधितांची संख्या मंदगतीनं वाढतेय, पण संख्या वाढू तर लागलीय ना. पण खरंच हा वेग पुष्पवृष्टी करण्याएवढा कमी झालाय का?
३ मेला सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९,९८० झालीय. २४ तासांत २६४४ नव्या केसेस समोर आल्यात. सध्याच्या वेगानुसार, संध्याकाळपर्यंत ही संख्या ४० हजार पार करेल. येत्या दहा दिवसांत दुपटीने वाढण्याच्या सध्या सरासरीकडे बघितलं तरी येत्या १३ मेपर्यंत आपल्याकडे कोरोनाबाधितांची संख्या ८० हजाराच्या घरात जाईल. मग हे आपण याला यश म्हणायचं का?
दरवेळी डॉक्टर आणि आरोग्य कार्यकर्ते यांच्या नावावर हा सारा प्रकार केला जातोय. मात्र आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून देता आल्या नाहीत. एवढंच नाही तर देशभरात किती आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, हेही सांगितलं जात नाही. ज्या हॉस्पिटलवर फुलं वाहण्यात आली, तिथल्या डॉक्टर किंवा नर्स यांना हे सत्य दिसणार नाही का?
आयटी सेलच्या जोरावर प्रत्येक प्रश्नाला बाजूला सारल्यानं तो प्रश्न काही मरून जात नाही. खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हाही प्रश्नच आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असं अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोधाची गोष्ट नाही. सैन्यदलकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तेही पूर्ण विजय मिळाल्यावर.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
आपण माझा हा प्रश्न अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बघा. छोट्या दुकानदारांपासून ते मध्यमवर्गापर्यंत सारे लोक परेशान आहेत. कुणाचा धंदा बसलाय तर कुणाची नोकरी गेलीय. कुणाचा पगार कापण्यात आलाय. सरकारी कर्मचाऱ्यांकडून नव्यानं अस्तित्वात आलेल्या पीएम केअर फंडसाठी पैसे घेतले जाताहेत. खासदारांचा पगार कापण्यात आलाय. आणि हा सारा पैसा कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी पाहिजे, असं नाही. मग लढाई अर्ध्यात असतानाच फुलं वाहण्यासाठी पैसा खर्च करण्याचा अर्थ काय?
सैन्य दलाची मदत घ्यायचीच होती आणि ही विमानं आकाशात झेपावलीच होती तर यामधून काही मजुरांना त्यांच्या जिल्ह्यांपर्यंत पोचवता आलं असतं. पण फक्त फुलं वाहण्यात आली. कारण न्यूज चॅनलला दर रविवारी नवी प्रोपगेंडा सामग्री मिळेल. आणि प्रश्न विचारणाऱ्यांना सैन्यविरोधी ठरवून साऱ्या चर्चेला नवं वळण देता येईल. सरकारला जबाबदारीपासून वाचवता येईल. पण मोदी समर्थकांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, हे करून खरंच काय मिळालं?
शुक्रवारी दिल्लीत एका चर्चा होती, की खूप मोठी बातमी ब्रेक होणार आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत एक प्रेस कॉन्फरन्स करतील. आणि प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा पुष्पवृष्टी योजनेबद्दल माहिती देण्यात आली. आपल्याला ही माहिती एका ट्विटनं किवां एखाद्या राज्यमंत्र्यांकडून दिली जाऊ शकली नसती? सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत चीफ ऑफ डिसेन्स स्टाफ यांनी एक प्रेस कॉन्फरन्स बोलावून माहिती देण्याएवढी ही मोठी बातमी होती का?
हेही वाचा : राहुल कुलकर्णींना कोर्टानं वांद्रे गोंधळासाठी जबाबदार का धरलं?
ऑगस्ट २०१८ मधे मेरठ इथं कावड घेऊन जाणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. मेरठ झोनचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांनी ही पुष्पवृष्टी केली. त्यावेळी हिंदुस्तान टाईम्समधे एक बातमी आली होती. हीच बातमी इतरत्रही आली. उत्तर प्रदेश सरकारनं कावड घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या दोन मार्गांवर पुष्पवृष्टी केली. यासाठी १४ लाखाहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
यावरून आता आपण एक हिशोब लावू शकतो. तो म्हणजे, देशभर आज फुलं वाहण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला त्यासाठी किती खर्च आला असेल. आणि पैशाची काही चणचण नाही तर मग लोकांना नोकऱ्यांवरून का काढून टाकलं जातंय? पगार कपात का केली जातेय? आणि लोक इएमआय का भरू शकत नाहीत?
हेही वाचा :
ऋषी कपूर : ‘ढाई किलो’च्या हाताखाली दबला गेलेला हिरो
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन
चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया
कोरोनाला आपल्याला अंगाला न खेटू देता सुरक्षित शॉपिंग कसं करायचं?
गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा
यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्रः नवं राज्य जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठीच