आज १७ जुलै. वर्ल्ड इमोजी डे. इमोजी म्हणजे आपल्या भावना, आपले हावभावच. पटकन मेसेजवर काही कळवायचं आहे पण दुसऱ्या कामात बिझी असल्यावर इमोजीचा खूपच फायदा होतो. शॉर्टमधे सांगता येतं. पण प्रत्येकाचं एक हमखास वापरलं जाणारं आणि आवडीचं इमोजी असतं. तसंच आज इमोजीपीडीयाकडून जगात सगळ्यात जास्त पॉप्युलर इमोजी कोणता याची घोषणासुद्धा होते.
आपण डिजिटल झालेलो आहोत. आणि अगदी गागावात स्मार्टफोन वापरले जातायत. आता आपण एकमेकांशी चॅटवरचं बोलतो. आता चॅटवर बोलताना आपण खूप टाईप करत बसत नाही. थोडक्यात सष्टीकरण देत असतो. म्हणून मग अशावेळी आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीजची गरज भासते. आणि इमोजीजबरोबर खेळायलासुद्धा मज्जा येते. कोणाला चिडवायचं असेल, सिरीयस मेसेज पाठवायचा असेल, कोणाशी भांडायचं असेल या सगळ्यासाठी वर्च्युअल भावना म्हणजेच इमोजी आपल्यासाठी उपलब्ध आहेत.
इमोजीजमुळे वर्च्युअल संवाद हा जणूकाही जीवंतच होतो. आपल्या लक्षात आहे का? १९९२ साली शॉर्ट मेसेज सर्विस अर्थात एसएमएस हा प्रकार आला होता. पण त्याआधीच इमोजी आलं होतं. पण हे कसं काय? हो, ईमेल करताना आणि नंतर मोबाईलवरुन एसएमएस पाठवताना अक्षर आणि खुणांचा वापर करून इमोजी पाठवत असत. ;) , :( , :) , 8-D , *) या अशा इमोजी तर पूर्वी आपणही खूपदा वापरल्यात.
जपानमधल्या एनटीटी डोकोमो कंपनीत शिगताक कुरिता डिझाइनर म्हणून काम करत होता. त्यांच्या आय मोड इंटरफेस सर्विसमधे वेबवर त्यांनी हवामान दाखवताना तिथे १९९७ ला ढगांचं चिन्ह काढलं. जे खूप आकर्षक होतं. आणि त्याला शब्द वापरण्याची गरज पडली नाही. यातूनच इमोजी म्हणजेच भावना व्यक्त करणारे सिम्बॉल्स डेवल्प करण्याचा विचार आला. मग त्याने १२ पिक्सलचे इमोजी काढले. ज्यात १७६ इमोजींचं चित्र होतं. सध्या २ हजार ६२३ इमोजी आहेत. आणि त्यात सातत्याने भर पडत आहे.
हेही वाचा : आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार
मूळ १७६ इमोजी हे चक्क न्यूयॉर्कच्या म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्टमधे प्रदर्शित केलेत. पण इमोजीज फेमस कधी झाले माहितीय का, २००७ मधे. जेव्हा अॅपलने आपल्या फोनमधे इमोजींना समाविष्ट केलं. पण आपण आता जे इमोजी वापरतो त्यांना स्टँडर्ड इमोजी म्हणतात. कारण त्यापूर्वीच्या इमोजींमधे खूप पिक्सलेटेड चित्र आणि गडद रंग मोबाईलमधे भयावह दिसत होती. सहाजिकच तसुरवातीला काहीतरी वेगळं वाटणारं इमोजी. पुढे लोकांना नकोस वाटू लागलं
२०१० मधे युनिकोड ६.० ने इमोजीना नवं रुप दिलं आणि सगळ्यांपुढे प्रेझेंट केलं. आज आपण युनिकोडने बनवलेले इमोजीज वापरत आहोत. याचा अर्थ युनिकोड फक्त युनिवर्सल कॅरेक्टर एनकोड करत नाही तर इमोजीसुद्धा बनवतं. पण हे इमोजी २०१५ मधे वर्ड ऑफ द इयर ठरलं. हा शब्द सगळ्यात जास्त वापरला गेल्याची ऑक्सफोर्डने घोषणा केली होती. तसंच त्यांनी इमोजी हा शब्द डिक्शनरीतही सामावून घेतला.
आजच्याच दिवशी इमोजीपीडीया वेबसाईटवर इमोजी अवॉर्डची २०१६ पासून घोषणा करतायत. यावरुनच हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा होतो. त्यांनी आजचा निकाल ट्विटरवर शेअर केलाय. त्यानुसार लाफिंग फेस विद हार्ट्स या इमोजीला मोस्ट पॉप्युलर इमोजी म्हणून घोषित केलंय. जगात कोणत्या इमोजीज लोकांना आवडतायंत, कशाप्रकारे वापर होतोय याचं सतत मॉनिटरींग करून, लोकांचे वोट्स घेऊन हे ठरवलं जातं.
हेही वाचा :
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?
हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?
आता प्रत्येक सोशल मीडिया, मोबाईल अॅप, वेबपेजवर इमोजी दिसतात. आणि आपण त्याचा वापरही करतो. इमोजी ट्रॅकर हे सातत्याने कोणत्या इमोजी किती वापरल्या जातात याचा रिपोर्ट देतात. त्यानुसार आपण जाणून घेऊया की, सध्याच्या जगातल्या टॉप ५ इमोजी कोणत्या आहेत.
१. आपण ५ नंबरवरच्या इमोजीपासून सुरवात करूया. तर हे इमोजी दु:खाचं आहे. ते दु:ख व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं. जोरजारात रडणं असं याचं नाव आहे आणि तसंच ते दिसतंही. तसंच हे इमोजी ड्रामा करण्यासाठीसुद्धा वापरलं जातं.
२. आता ४ नंबरवर आहे, बदामाचे डोळे आणि चेहऱ्यावर हसू. एकतर हे इमोजी प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं. माझे डोळ्यात फक्त तुझ्यासाठी प्रेम आहे किंवा मस्ती करण्यासाठी याचा भरपूर वापर होतो. तसंच कित्येकदा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी म्हणजे काही प्लेझेंट सर्पाइज वगैरे असेल तर हमखास वापरलं जातं.
३. पुढे ३ नंबरवर पर्यावरणाशी संबंधित इमोजी आहे. ते म्हणजे रिसायकलिंग. यात तीन बाणांची विशिष्ट प्रकारे रचना केलीय. हे एक जगात सगळीकडे वापरलं जाणारं इमोजी आहे. सध्या रिसायकलिंगच्या सगळ्याच प्रोजेक्टमधे हा लोगो आपल्याला दिसत असेल पण मूळात हे इमोजी आहे.
४. सगळ्यांना आवडणारं हेवी हार्ट हे इमोजी दुसऱ्या नंबरवर आहे. याला क्लासिक हार्टसुद्धा म्हणतात. लाल रंगातला बदाम जो एकच पाठवला की मोठा होतो. आणि जसं दिल की धडकन असल्यासारखं पॉप अप होतो. हे इमोजी जवळच्या मित्र मैत्रिणींना किंवा प्रेम उघडपणे सांगण्यासाठी वापर होतो. हे इमोजी एक्स्ट्रोवर्ट लोकांसाठी असल्याचही म्हटलं जातं.
५. आपण सोशल मीडिया किंवा व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुपमधले मेसेज वाचून अर्धावेळ हसतच असतो. आणि हसण्याचंच इमोजी पाठवत असतो. हो, हेच आहे पहिल्या नंबरचं इमोजी ज्यात आपल्याला हसून हसून डोळ्यातून पाणी येतं. लाफ विद टिअर्स ऑफ जॉय असं या इमोजीचं नाव आहे.
हे इमोजीज खरंतर एवढे फेमस झालेत. की आता आपल्याल पर्स, पाऊच, बॅग, टॅगपासून केसाचे चाप, कानातलंही बाजारात आलेत. त्याचबरोबर खेळणी, उशांचे आब्रे, बेडशीट आणि गिफ्ट आर्टिकल्समधेसुद्धा यांचीच चलती दिसतेय. पण बीबीसीने २०१८ मधे इमोजीवर एक बातमी पब्लिश केली होती. त्यात म्हटलं होतं की, इमोजीचा वाढता वापर आणि येत असलेले नवनवीन इमोजी हे संभाषणात असलेलं भाषेचं प्रभूत्व कमी करतील. त्यामुळे जग अधिक जवळ येईल आणि भाषेची कोणतीही अडचण वाटणार नाही.
हेही वाचा :
अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू
हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका
खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?