१०० वर्षापूर्वीही केला स्पॅनिश फ्लूचा सामना

०७ जुलै २०२०

वाचन वेळ : devil"> मिनिटं


पहिलं महायुद्ध संपायला आलं आणि सर्दी, ताप खोकल्याच्या साथरोगाची एक लाटच सगळ्या जगावर आली. या नव्या साथरोगाला स्पॅनिश फ्लू असं नाव मिळालं. पहिली लाट खूप लवकर आणि सहज ओसरली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने सगळ्या जगाला आपल्या जबड्यात ओढलं. आजपासून १०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग मोठ्या हिमतीने या साथरोगाचा सामना करत होतं.

इतिहास स्वतःचीच पुनरावृत्ती करत असतो असं म्हटलं जातं. आज आपण सगळे कोविड १९ नावाच्या साथरोगाशी लढतो आहोत. १०० वर्षांपूर्वीही जगातला प्रत्येक माणूस अशाच एका साथरोगाशी दोन हात करत होता. आजच्या प्रमाणेच लॉकडाऊन, क्वारंटाईन, मास्क अशा अनेक गोष्टींची चर्चा त्याकाळी होत होती.

पहिलं महायुद्ध संपायला आलं होतं तेव्हाची ही गोष्ट. जगातल्या सगळ्या देशांमधे तणावाचं वातावरण होतं. अशातच ताप, सर्दी, खोकल्याची एक नवी साथ आली होती. १९१८ च्या सुरवातीला युरोपातल्या अनेक लोकांना सलग चार पाच दिवस थंडी वाजून ताप भरत होता. पण त्यानंतर लगेचच बरंही वाटत होतं. या वायरल इन्फेक्शनमुळे तेव्हा मृत्यू होणाचं प्रमाण जवळजवळ नव्हतंच. त्यामुळेच या साथीची पहिली लाट कधी ओसरली कुणालाही कळलंच नाही.

हेही वाचा : कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

मुंबई कोल्हापूरातही थैमान

पण १९१८ च्या शेवटाला या फ्लूची दुसरी भयानक लाट आली. त्यात लक्षणं दिसल्यानंतर काही तासांत किंवा एखादं दोन दिवसांत पेशंटचा मृत्यू होऊ लागला. या नव्या साथरोगाचे वायरस अमेरिकेतल्या कन्सासमधे तयार झाल्याचं म्हटलं जातं. पण महायुद्धामुळे मीडियावर लादलेल्या बंदीचा फायदा अनेक देशांनी या फ्लूचे आकडे लपवण्यासाठी करून घेतला. स्पेन हा देश मात्र महायुद्धात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे तिथली माध्यमं आजच्यासारखंच रोजच्या रोज साथरोगाच्या बातम्या देत होती. परिणामी, हा फ्लू स्पेनमधेच जास्त पसरलाय असा अनेकांचा समज झाला आणि त्यावरून त्याला स्पॅनिश फ्लू असं म्हटलं जाऊ लागलं. एच१एन१ इन्फ्लुएन्झा वायरल ए या वायरसमुळे हा साथरोग होत असे. त्यामुळे अनेक जण याला इन्फ्लुएन्झा फ्लू असंही म्हणू लागले.

मानवी इतिहासातील सर्वात जीवघेणा वायरस म्हणून याकडे बघितलं जातं. १९१८ लासुरू झालेला या वायरसने १९२० मधे उसंत घेतली. तोपर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश म्हणजे जवळपास ५० कोटी लोकांना या वायरसची लागण झाली होती, अशी माहिती हिस्ट्री डॉट कॉम या वेबसाईटवर देण्यात आलीय. त्यात जवळपास ५ कोटी लोकांच्या मृत्यूही झाला. अमेरिकेत तयार झालेला वायरस युरोप ओलांडून आशिया, भारत आणि अगदी आपल्या मुंबई कोल्हापूरातंही येऊन पोचला होता. आणि प्रत्येक देश आपापल्या पातळीवर या साथरोगाशी दोन हात करत होता.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

५ डॉलरचा दंड

आजच्या कोरोना वायरसप्रमाणेच श्वसनसंस्थेमार्फत या साथरोगाचे वायरस पसरत होते. कोविड १९ सारखीच या स्पॅनिश फ्लूचीही लक्षणं होती. पण आजच्या सारखं ती लक्षणं शोधून काढणं, वायरस शोधून काढणं, त्यावर कोणते उपचार काम करतात याचा तपास करणं यासाठी लागणारं प्रगत तंत्रज्ञान त्याकाळी डॉक्टर आणि शास्त्रज्ञांकडे उपलब्ध नव्हतं. फ्लूविरोधातली वॅक्सीन तर सोडाच पण पेशंटना वायरसशी लढायला मदत करणारी अँटीवायरल औषधंही उपलब्ध नव्हती. 

भरीस भर म्हणजे नुकत्याच झालेल्या पहिल्या महायुद्धामुळे अनेक देशात डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची चणचणही भासू लागली होती. उपलब्ध असलेल्यांपैकी अनेक डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी स्वतःच फ्लूने आजारी पडले होते. युरोपात तर स्पॅनिश फ्लूच्या पेशंटने हॉस्पिटल इतकी भरून गेली की शाळा, लोकांची घरं आणि संपूर्ण इमारतच मोकळी करून त्याचं हॉस्पिटलमधे रूपांतर करणं सुरू होतं. डॉक्टर नव्हते तिथे वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलं उपचार करत होती.

आजच्या प्रमाणेच तेव्हाही लोकांवर क्वारंटाईन होण्याची, मास्क घालण्याची सक्ती केली गेली होती. शाळा, थेटर, चर्च, मंदीरं बंद केली गेली. लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं गेलं होतं. एकमेकांना भेटलात तरी हातात हात देऊन शेकहॅण्ड करू नका, एकमेकांपासून अंतर ठेवा अशा सुचना दिल्या जात होत्या. महत्त्वाचं म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली होती. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरात तर मास्क न घालण्याऱ्या माणसाकडून ५ डॉलरचा दंड वसूल करण्यात येत होता. तसंच, साथरोगाचा प्रसार करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हासुद्धा दाखल होत होता.

हेही वाचा : कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

रोगप्रतिकारकशक्ती कमावली

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजुने लढण्यासाठी युरोपात गेलेले भारतीय सैनिक बोटींनी परतत होते. त्यांच्यामार्फत हा फ्लू मुंबईच्या किनाऱ्यावर धडकला आणि तिथल्या दाटीवाटीच्या वस्तीत याचा फार झपाट्याने प्रसार झाला. म्हणूनच मुंबईच्या नावावरून या फ्लूला भारतात बॉम्बे इन्फ्लुएन्झा किंवा बॉम्बे फीवर असं नाव मिळालं. भारतातच या फ्लूने जवळपास १ कोटी लोकांचे जीव घेतले होते.

युद्धावरून परतलेल्या आणि स्पॅनिश फ्लूची लागण झालेल्या सैनिकांसाठी तर शाहू महाराजांनी कोल्हापूरात एका शाळेत हॉस्पिटलच उभारलं होतं. त्यांच्या राजवाड्यात येणारं दूध या पेशंटना देण्यापासून ते रोज स्वतः सगळ्या गावाची चौकशी करण्यापर्यंत सगळे प्रयत्न शाहू महाराजांनी केले होते.

स्पॅनिश फ्लूची दुसरी लाट डिसेंबर १९१८ मधे ओसरत होती. पण जानेवारी १९१९ मधे ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेनं अमेरिकेत आणि युरोपातही अनेकांचे जीव घेतले. ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा थोडी सौम्य होती. त्यानंतर १९२० मधे या साथरोगाची चौथी लाट आली. पण तोपर्यंत हा वायरस अतिशय सौम्य झाला होता. वायरसची लागण झालेले बहुतांश पेशंट मृत्यूमुखी पडले होते. आणि उरेलल्या अनेकांनी वायरसविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती कमावली होती. दोन वर्ष हा साथरोग जगात वावरत होता. त्यानंतर लस नसली तरी लॉकडाऊन, मास्क आणि शारीरिक अंतर याने स्पॅनिश फ्लू संपवला.

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार आहे?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?