अँग्री बर्ड्स मोबाईलवरच नाही, तर मोठ्या पडद्यावरही सुपरहिट

२७ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


द अँग्री बर्ड्स सिनेमाचा सिक्वेल भारतात शुक्रवारी २३ ऑगस्टला रिलिज झाला. याच महिन्यात तो युरोप अमेरिकेसह जगभर रिलिज झालाय. आणि एक महिना संपायच्या आतच त्याने जगभरातून साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा म्हणजे रुपयांच्या भाषेत ५४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावलेत.

कँडी क्रश, काऊंटर स्ट्राईक, टेम्पल रन, पब्जी, पोकेमॉन यांच्याबरोबरच अँग्री बर्ड्स आपला फेवरेट वीडिओ गेम आहे. आपल्याला वेळ मिळाल्यावर म्हणजे अभ्यासातून ब्रेक घेतल्यावर, लोकल किंवा बसमधून घरी जाताना. तसंच सुट्टीच्या दिवशी किंवा कधीही टाईमपास करायचा असल्यावर आपोआप आपले हात मोबाईलमधल्या गेम सेक्शनकडे वळतात.

वीडियो गेम डेवलपिंगची स्पर्धा जिंकली आणि

आता जशी पब्जीची चर्चा सुरू आहे, तशीच काही वर्षांपूर्वी अँग्री बर्ड्स गेमची चर्चाच चर्चा होती. गेल्याच आठवड्यात या गेमवरचा सिनेमा भारतात रीलिज झालाय. यापूर्वी मे २०१६ ला द अँग्री बर्ड्स सिनेमा रिलिज झाला. आणि त्यानंतर आता तीन वर्षांनी याचा दुसरा भाग आलाय.

अँग्री बर्ड्स हा लोकप्रिय गेम २००९ ला रीलिज झाला. हा गेम रोविओ एंटरटेन्मेंट कंपनीने डेवलप केला. ही कंपनी तीन मित्रांनी सुरू केली. निकोलस हेड, जार्नो वाकेविनेन आणि किम डिकर्ट यांनी २००३ मधे कंपनी स्थापन केली. हे तिघे फिनलँडच्या हेलसिंकी युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीत शिकत होते.

शिकत असतानाच या तिघांनी वीडियो गेम बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. एक मल्टीप्लेअर गेम बनवला. त्याचं नाव किंग ऑफ कॅबेज असं होतं. ही स्पर्धा ते जिंकले. या विजयानंतर त्यांना गेम डेवलपिंगच्या भरपूर ऑफर्स येऊ लागल्या. आणि मग त्यांनी थेट आपली कंपनीच सुरू केली.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?

वीडियो गेम इंडस्ट्रीचा चढता आलेख

२००३मधे अँग्री बर्ड्स गेम बनवणाऱ्या कंपनीचं नाव रोविओ एंटरटेन्मेंट नव्हतं. त्यावेळी या कंपनीचं वॉल रिल्युडे होतं. मग त्यांनी नाव बदलून २००५ ला रोविओ मोबाईल केलं. आणि २०११ ला मोबाईल काढून रोविओ एंटरटेन्मेंट असं नामकरण केलं. अँग्री बर्ड्स हा पझल गेम आहे.

जगात पहिल्यांदा वीडियो गेम फ्रान्समधे बनला. १९७७ ला अटारी कंपनीने अटारी पझल गेम काढला. १९८० नंतर डिजिटल तंत्र बदललं आणि गेमही अपग्रेड झाले, अशी माहिती अकॅडमी गेम या वेबसाईटवर सापडते. आज वीडियो गेमिंग इंडस्ट्रीला जगभरात चांगले दिवस आलेत.

वीडियो गेमिंग इंडस्ट्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय. २०१८मधे जगातल्या वीडियो गेमिंग इंडस्ट्रीत १०.९ टक्क्यांनी वाढ झाली. २०२५ पर्यंत ही इंडस्ट्री तीन हजार कोटींची होईल, असं जर्मनच्या मार्केट रिसर्च कंपनी स्टॅटेस्टिक्सने २०१८ च्या अहवालात लिहिलंय.

हेही वाचा: 'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

एवढं भरभरून यश कशामुळे मिळालं?

रोविओ एंटरटेन्मेंट ही ४ कोटींची कंपनी आहे. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे ही काही वीडियो गेमिंगमधली टॉप प्रोफेशनल कंपनी नाही. पण त्यांचं काम मोठं आहे. ही या कंपनीने साधारण ५० ओरिजिनल वीडियो गेम बनवलेत. आणि त्या गेमच्या भरपूर सीरिजही बनवल्यात. पण त्यांचा अँग्री बर्ड्स हाच गेम सगळ्यात लोकप्रिय ठरला. जगभरातल्या लोकांनी या गेमला डोक्यावर घेतलं.

पहिल्यांदा हा गेम २००९मधे रीलिज झाला. त्यानंतर २०१९पर्यंत याचे २० भाग आलेत. या जवळपास सगळ्याच भागाला लोकप्रियता मिळालीय. हा गेम एवढा लोकप्रिय का झाला यावर गेट सोशल कंपनीने अभ्यास अहवाल रिलिज केलाय. ही नेदरलँडमधली कंपनी मोबाईल एम्पावरिंग आणि डिजिटल मार्केट रिसर्चचं काम करते. त्यांच्या मते, या गेमने बदलत्या जगानुसार बदल स्वीकारला.

गेमचं ऍनिमेशन, आवाज, गेमचा प्रोग्रेस, गेममधल्या कॅरेक्टरचं डेवलपमेंट, प्लेईंग टूल इत्यादी सर्व गोष्टी बदलत गेल्या. त्यामुळे लोकांनाही हा खेळ जास्तच आवडू लागला. तसंच जर प्लेयरने ठराविक वेळा खेळ खेळला तर त्याला बोनस मिळतो. आणि त्या पुढच्यावेळी खेळताना खेळाची वेळ अर्ध्या तासाने वाढवता येते. अशा सर्व आयडिया वापरल्याने हा गेम यशस्वी झाला.

हेही वाचा: अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली

अँग्री बर्ड्स २ सिनेमा भारतात चालेल?

अँग्री बर्ड्स गेमच्या लोकप्रियतेमुळे त्या बर्डचं टीशर्ट, राखी, हातातले बँड, केसाचे चाप, छोटी पाकिटं, खेळणी, गळ्यातलं, कानातलं, बॅग, टॅटू आणि बॅगेचा बॅच इत्यादी गोष्टी बाजारात आल्या. तसंच या गेमवरच्या ६ टीवी ऍनिमेशन मालिकासुद्धा येऊन गेल्यात. या प्रत्येक मालिकांचे शंभरहून अधिक एपिसोड झालेत. ही मालिका टेले टून या टीवी चॅनलवर दिसायची. २०१३ ते २०१८ पर्यंत या मालिका सुरू होत्या.

अँग्री बर्ड्सची मालिकासुद्धा सुपरहिट झाली. मग सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. सिनेमावरुन गेम बनतात हे आपल्याला माहिती आहे. पण वीडिओ गेमवरुन सिनेमा? पण वीडिओ गेमवरचा हा काही पहिलाच सिनेमा नाही. साधारण चाळीसहून अधिक सिनेमे वीडिओ गेमवरुन आलेत. द अँग्री बर्ड्सचा पहिला भाग २०१६ मधे रिलिज झाला. सिनेमा हिट झाला. पण विशेष कमाल दाखवू शकला नाही.

द अँग्री बर्ड्स २ अंडर प्रेशर असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. तो इंग्लंडमधे २ ऑगस्टला रीलिज झाला. अमेरिकेत १३ ऑगस्टला तर भारतात २३ ऑगस्टला रीलिज झाला. त्याने आजपर्यंत साडेसात कोटी अमेरिकन डॉलर्सचा धंदा केलाय. रुपयांच्या भाषेत ती रक्कम ५४० कोटींइतकी होते. 

भारतीय मीडियात सिनेमाचे रिव्यूज खूप चांगले येताहेत. या सिनेमाला भारतातही ७० टक्के ओपनिंग मिळालंय. तसंच समीक्षकांकडूनही या सिनेमाच्या कथेचं कौतुक होतंय. या सिनेमाला सर्वच मीडियाने सरासरी तीन स्टार दिलेत. तर प्रेक्षकांनी फोर स्टार दिलेत. त्यामुळे मोबाईलवर अँग्री बर्डचे फॅन असाल तर मोठ्या पडद्याकडे मोर्चा हलवायला हरकत नाही. 

हेही वाचा: 

मंदीतही पॅथॉलॉजीच्या धंद्यात खुणावतेय संधी

अरुण जेटलींना पत्रकार ब्यूरो चीफ म्हणायचे!

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?