अयोध्येमधे बांधण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराचं उद्या भूमीपुजन आहे. सुप्रीम कोर्टात मंदीराच्या बाजुने निकाल लागलाय. त्या निर्णायचं स्वागत आहेच. पण त्यासोबत प्राध्यापक फैझान मुस्तफा यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरच्या वीडियोत सांगितलेल्या तथ्यांकडेही लक्षं द्यायला हवं.
भारतीय संस्कृतीत जमिनीवरून भावा-भावांचे वाद होणं ही फारच सवयीची गोष्ट आहे. जवळपास सगळ्याच जुन्या मराठी सिनेमांत हे वादच हिरो-हिरॉईनच्या दुःखामागचं कारण असायचे. साधारण पावणेतीन एकर इतक्या जमिनीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या दोन भावंडातही कडाक्याचं भांडणं सुरू आहे.
वादग्रस्त असलेली पावणे तीन एकर जमीन आता काही निव्वळ जमिनीचा एक तुकडा राहिलेली नाही. राजकीय आणि धार्मिक अस्मितांच्या अदृश्य आणि बिनगरजेच्या गवतानं ही जमीन व्यापलीय. दिवसेंदिवस हे गवत वाढतंय आणि त्यामुळे इथं उगवू शकणाऱ्या प्रेमाच्या नव्या पालवीची वाढ खुंटलीय.
अयोध्येच्या या जमिनीशी हिंदू आणि मुस्लिमांच्या श्रद्धा जोडल्या गेल्यात. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात गेल्या महिनाभरापासून दररोज सुनावणी चालू होती. १६ तारखेला ही सुनावणी संपली आणि अयोध्येत कलम १४४ म्हणजेच कर्फ्यु लागू केला.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वात पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन करण्यात आलंय. गोगाई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होतील. त्यांच्या निवृत्तीआधी राम जन्मभूमीच्या खटल्याचा निर्णय देऊन हे प्रकरण संपवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जातेय.
हे सगळं प्रकरण १३३ वर्षांपासून कोर्टात चालू आहे. त्यात अगदी पहिल्या वर्षापासून केस लढणारी एक पार्टी म्हणजे निर्मोही आखाडा. दुसरी पार्टी हिंदू महासभा गेल्या ६८ वर्षांपासून या केसमधे आहे तर सुन्नी वफ्क बोर्ड ५७ वर्षांपासून ही केस लढतोय.
हेही वाचा : आपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे?
या पावणे तीन एकरच्या जमिनीवर फार पूर्वी राम मंदिर होतं. भगवान राम इथं जन्मले होते. पण १६ व्या शतकातल्या बाबर या मुस्लिम राजानं ते मंदिर पाडलं आणि तिथे मशीद बांधली असं या सगळ्या वादाचं कथानक सांगितलं जातं.
पण हे प्रकरण व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेबसाइट्सवरच्या बातम्या, लेख वाचतो तेव्हा हा सगळा वाद १८५५ सालापासून रघुवरदास महंत या ऋषींपासून सुरू झाल्याचं आपल्याला कळतं.
हे सगळं प्रकरण काय होतं, इतिहास काय चालतो, यासंदर्भात म्हणजे १८५५ सालापासून किती आणि कोणते कोणते खटले चालले, त्याचा निकाल काय होता या सगळ्यांवर कायद्याचे प्राध्यापक फैझन मुस्तफा यांनी एका युट्यूब सिरीजमधून प्रकाश टाकलाय. मुस्तफा सध्या कायदा अभ्यास आणि संशोधन या हैदराबादमधल्या राष्ट्रीय अकादमीचे कुलगुरू म्हणुन काम बघतात. ते इंडियन एक्सप्रेस, एनडीटीवी यासारख्या मीडियातून कायदेशीर पेचप्रसंगांवर मतं मांडतात.
या विडिओ सिरीजमधे प्रोफेसर मुस्तफा बाबरी मशीद-राम जन्मभूमी खटल्यातली कायद्याची अवघड भाषा अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितलीय. १९ व्या शतकापासून ते आजपर्यंत या प्रकरणात काय, काय झालं या सगळ्यांचा पट त्यांनी या विडिओ सिरिजमधे विस्तृतपणे मांडलाय.
या सिरिजमधे आतापर्यंत सात विडिओ पब्लिश झालेत. मुस्तफा यांनी पहिल्या विडिओत या सगळ्या प्रकरणाची तोंडओळख करून दिलीय. या केसमुळे भारतीय न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतीपणाचा आणि विश्वासार्हतेचा कस लागेल, असं प्रोफेसर म्हणतात. भारतात राहणाऱ्या दोन मोठ्या समाजांच्या श्रद्धा ज्या प्रकरणाशी जोडल्या गेल्यात ते प्रकरण कोर्टाच्या पातळीवर सुटू शकेल का हा या सगळ्या प्रकरणातला मुख्य मुद्दा आहे.
याविषयी बोलताना मुस्तफा दोन मोठ्या नेत्यांची विधानं सांगतात. त्यातलं पहिलं विधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २३ सप्टेंबर १९९० ला केलं होतं. ‘कोणतंही न्यायालय या प्रकरणाबाबत स्पष्ट निकाल देऊ शकणार नाही आणि कधी स्पष्टपणे निकाल दिलाच तरीसुद्धा कोणतंही सरकार त्याची अमंलबजावणी करू शकणार नाही.’ असं वाजपेयी म्हणाले होते.
यासोबतच हे विधान वाजपेयींनी २३ सप्टेंबर म्हणजेच त्यांची रथयात्रा सुरू होण्याच्या एक दिवस आधी केलं होतं. रथयात्रेचा परिणाम म्हणून संपूर्ण देश दोन प्रकारांच्या विचारसरणीत विभागला गेला याची आठवण प्रोफेसर मुस्तफा आपल्याला करून देतात.
तर दुसरीकडे ‘मंदिरासाठी केलेली चळवळ ही पूर्णतः राजकीय कारणासाठी केली होती आणि त्याचा धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नव्हता,’ असं भाजपच्या आघाडीच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज १४ एप्रिल २००० ला म्हणाल्या होत्या.
म्हणजेच एकाच राजकीय पक्षाचे दोन मोठे नेते एकाच प्रकरणाबद्दल दोन वेगवेगळी मतं मांडतात हे मुस्तफा यांनी अधोरेखित केलं.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
१५२८ मधे मीर बाकय़ी यांनी बाबराच्या सांगण्यावरून बाबरी मशीद बांधली आणि तिथं असलेलं रामाचं मंदिर पाडून ती मशीद बांधली असं सांगितलं जातं. याविषयी प्रो. मुस्तफा सांगतात, १५२८ नंतर फक्त ४६ वर्षांनी संत तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला. संत तुलसीदास हे रामाचे फार मोठे भक्त होते. पण त्यांच्या या ग्रंथात त्यांनी कुठेही एखादं मोठं राम मंदिर पाडून तिथं मशीद उभारल्याचा साधा उल्लेखही केलेला नाही.
विशेष म्हणजे ज्या बाबराच्या सत्ता काळात ही मशीद बांधली गेली त्या बाबरनामा या ग्रंथातही मंदिर पाडून मशीद बांधल्याचा उल्लेख दिसत नाही. बाबराचा मुलगा हुमायून. त्याच्या काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्याच ग्रंथात मंदिर पाडून मशीद पाडल्याचा उल्लेख सापडत नाही.
अकबराच्या दरबारातले प्रसिद्ध कवी फैजी यांनीही त्यांच्या कुठल्याही कवितेत, ग्रंथात, साहित्यात बाबरी मशिदीचा उल्लेख केलेला नाही. अकबराच्याच दरबारात मुल्ला अब्दुल कादिर बदारयुनी हे फार मोठे आणि उजव्या विचारसरणीचे इतिहासकार होते. हल्दी घाटीचं त्यांनी फार एकांगी कथन केलं होतं. पण त्यांच्याही लिखाणात कधीही मंदिर पाडून मशीद बांधल्याचा उल्लेख सापडत नाही.
इतकंच काय, क्रुरकर्मा म्हणून ज्याची छबी प्रत्येक हिंदू माणसाच्या मनावर आहे अशा औरंगजेबानेही कधी बाबरी मशीद मंदिर पाडून बनवली असल्याचा उल्लेख केलेला नाही. मंदिर पाडून मशीद बांधणं ही या सगळ्या राज्यांसाठी अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे होती. पण त्यातला एकही जण स्वतःची बढाई करायलाही मंदिर पाडल्याच्या घटनेचा उल्लेख करत नाही.
प्रसिद्ध इतिहासकार आर. एस. शर्मा यांनी आपल्या पुस्तकात अयोध्येतल्या मंदिरांविषयी एक गोष्ट नोंदवलीय. ते लिहितात, अयोध्येमधल्या कोणत्याही मंदिरात गेलं की हेच मंदिर कसं रामाच्या जन्माचं खरं स्थान आहे असं तिथले पुजारी समोरच्याला पटवून देत असतात.
इतकंच नाही, तर रामाचं भव्य मंदिर पाडून तिथं बाबरनं मशीद बांधलीय ही गोष्ट १७ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कधी हिंदूंच्या जाणीवेतही नव्हती, असंही शर्मा यांनी लिहिलंय.
सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यावरून भारतीय पुरातत्त्व विभागानं बाबरी मशीद होती त्या ठिकाणी खोदकाम केलं. या खोदकामातही त्यांना दशरथ, सीत, लक्ष्मण, राम यांच्या कसल्याच मुर्त्या सापडल्या नाहीत.
उलट खोदकाम करून सापडलेल्या गोष्टींवरून इथं मांसाहार करणारे लोक राहत असावीत असा निष्कर्ष पुरातत्त्व विभागाने काढला. मंदिरासारखा ढाचा असलेली काहीतरी वास्तू होती एवढंच या खोदकामातून समोर आलं. मग, मंदिर पाडून मशीद बांधलं हे इथल्या जनमानसात रूजलं कसं?
हेही वाचा : या तीन लेखिका जग गाजवत आहेत
याचं उत्तर देताना प्रोफेसर मुस्तफा रघुवरदास महंत या ऋषींचा संदर्भ सांगतात. १८ जानेवारी १८८५ ला महंत रघुवरदास यांनी त्यावेळच्या कोर्टात एक केस दाखल केली. बाबरी मशीदीबाहेर असलेल्या राम चबुतऱ्यावर एक मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर २६ मार्च १८८६ ला कोर्टानं आपल्या निकालात या चबुतऱ्याला रामजन्माचं प्रतिकात्मक ठिकाण म्हटलं. इथं प्रतिकात्मक हा शब्द फार महत्वाचा आहे, असं मुस्तफा म्हणतात. प्रतिकात्मक याचा अर्थ हीच ती जागा असं आपण सांगू शकत नाही असाच होतो.
मुस्तफा पुढे सांगतात, १७ मे १९८९ ला वाजपेयीसुद्धा असंच म्हणाले होते. त्यांचे शब्द होते, ‘हजारो वर्षांपूर्वी राम नेमका कुठं जन्मला हे बोट ठेवून खात्रीशीर दाखवता येणं अशक्य आहे.’ पण २३ सप्टेंबरला रथयात्रा निघण्याआधी त्यांनी आपलं हे विधान बदललं आणि ‘रामाचा जन्म झाला अशी एकच जागा आहे’ अशी घोषणा वाजपेयींनी केली.
१ ऑक्टोबर १९९० लासुद्धा लालकृष्ण अडवाणी यांनी असंच एक विधान केलं होतं. ‘रामाचा जन्म बाबरी मशीद होती त्या ठिकाणीच झाला हे कुणीही सिद्ध करू शकत नाही. पण ही आमची श्रद्धा आहे ज्याकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये,’ असं अडवाणी म्हणाले होते.
आणि तरीही ६ डिसेंबर १९९२ चा दिवस इतिहासजमा करण्याची कामगिरी मोठ्या नेत्यांच्या देखरेखीखाली झालीच. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पेपरमधे मशीद पाडण्यासंदर्भातलं विश्लेषण फार भारी आहे. मशीद नाही तर भारतीय संविधान उद्ध्वस्त झालंय, असं वेगवेगळ्या पेपरमधे आलेल्या विश्लेषणांत म्हटलं गेलं.
मशीद पाडल्याबद्दल आजपर्यंत कुणालाही शिक्षा झालेली नाही. मुस्तफा म्हणतात, की कल्याण सिंग यांनी दिलेल्या विनंती अर्जानंतर खरंतर कोर्टाला हे माहीत होतं की एवढा मोठा जनसमुदाय तिकडे जाणार आहे, त्यांच्याकडे हत्यारं असणारच. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं.
अजूनही बाबरी मशीदची केस चालू आहे. २०१० मधे अलाहबाद हायकोर्टाने या पावणे तीन एकर जमिनीचे तीन भाग केले. त्यातून केस लढणाऱ्या तीन पार्ट्यांच्या नावे करण्याचा प्रस्ताव पुढे आला. पण तो तिन्ही पाट्यांनी नाकारला.
आता या तीन पार्ट्या कोणत्या, त्यांच्या मागण्या काय आहेत, एका रात्रीत मशिदीची कुलुपं तोडून अचानक तिथं रामाची मूर्ती कशी प्रकटली, १८५५ पासून आजपर्यंत हे प्रकरण काय आहे या सगळ्यांविषयीची माहिती मुस्तफा यांनी आपल्या पुढच्या विडिओंमधे दिलीय.
आता या वादग्रस्त जमिनीच्या भांडणांमधे कुणी एक भाऊ जिंकला आणि मंदिर किंवा मशीद इथे बांधली गेली तर या धर्मस्थळाला किती प्रमाणात दान मिळेल या मुस्तफा यांनी विचारलेल्या प्रश्नासोबत आपण थांबूया.
हेही वाचा :
हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव
आवश्यक वस्तू कायद्याचा शेतकऱ्यांना गळफास
कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण
कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस
एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?