पाणी लावल्यावर कुराणातली आयात दिसणारी मशीद पाहिलीय?

२५ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आपण अनेक मशिदी पाहतो. त्यांच्या छतावर, भिंतीवर कोरलेल्या नक्षीकामाचं तोंड भरून कौतुक करतो. पण पाणी लावल्यावर भिंतीवरची कुराणामधली आयात वर येते, अशी मशीद आपण पाहिलीय का? खरंतर, अशी मशीद आपल्या अगदी हाताशी म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना या मशिदीचा उल्लेख केला होता.

प्राचीन काळात बांधकाम केलेल्या अद्भूत आणि रहस्यमय अनेक वास्तू महाराष्ट्रात सापडतात. यापैकी ग्रामीण भागात असलेल्या वास्तू अजूनही जगासमोर आलेल्या नाहीत. या वास्तू बघितल्यावर प्राचीन बांधकाम शैली किती प्रगत होती, याची प्रचिती येते.

अशीच एक अद्भूत मशीद बुलडाणा जिल्ह्यातल्या रोहीणखेड या गावात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात रोहीणखेडच्या मशिदीचा उल्लेख केला होता. अशा अनेक वास्तू महाराष्ट्रात असून, त्या जगासमोर यायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा : रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

सोन्याचा धूर निघत होता

बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यातलं रोहीणखेड हे राष्ट्रकुटांच्या राजवटीतलं एक महत्त्वाचं शहर होतं. अजिंठा पर्वतरांगाच्या पश्चिमेला नळगंगा आणि जलगंगा या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलंय. या गावाला राजधानीचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. गावात पावलोपावली प्राचीन वास्तूंचे अवशेष सापडतात. या गावातून सोन्याचा धूर निघत होता, असंही स्थानिक नागरिक सांगतात.

गावात अनेकदा खोदकाम करताना अनेकांना सोनं आणि दागदागिने सापडल्याचं सांगितलं जातं. गावात एक जैन संशोधक आला होता. त्याने गावातलं प्राचीन मंदिर पाहिलं. त्या मंदिरातला शिलालेखही पाहिला. या शिलालेखावर ‘तदन्वये भूपती कूट’ असे संस्कृत शब्द लिहिले होते. यावरून रोहीणखेड हे राष्ट्रकुटांच्या राजवटीत होतं, हे स्पष्ट होतं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

मशिदीतलं विज्ञान अद्भूतच आहे

निजामशाहीत रोहीणखेड हे गाव रोहीणाबाद म्हणून राजधानीचं शहर होतं. तिथं १४३७च्या सुमारास अहमदनगरचा राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानबरोबर युद्ध केलं. त्यानंतर १४८२ मधे या गावात खुदावंत खॉ या निजामशाहीतल्या सरदाराने एक मशीद बांधली. या मशिदीचं बांधकाम अत्यंत सुबकतेनं करण्यात आलंय.

मशिदीच्या मधोमध एक कारंजं आहे. या कारंज्याला पाणी कुठून पुरवलं जात होतं याचीही गोष्ट इथले नागरिक सांगतात. गुरूत्वाकर्षणाद्वारे खापरी नाल्यांच्या माध्यमातून इथं पाणी आणण्यात आलं होतं. मशिदीचं वैशिष्ट असं की या मशिदीत आतल्या भिंतींवर कुराणातल्या आयाती काही विशेष द्रव्याने लिहिण्यात आल्यात. या आयाती भिंतीवर लिहिल्या असल्या तरी त्या दिसत नाहीत. त्यावर पाणी लावलं तरच त्या आयाती निदर्शनास पडतात.

या कोणत्या द्रव्याने लिहिण्यात आल्या आणि केव्हा लिहिल्या याची माहिती अजून स्पष्ट झाली नाही. पण पाणी लावल्यावर आयात दिसणारी ही देशातली एकमेव मशीद असायला हवी. मशिदीवर अरेबिक आणि पारशी भाषेत दोन शिलालेखही लिहिलेत.

हेही वाचा : एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १

महत्त्वाची वास्तू जतन कधी करणार?

या मशिदीच्या आतल्या भागात मागच्या बाजुला दोन खोल्या आहेत. यापैकी एका खोलीत एक भुयार असल्याचं सांगण्यात येतं. मशिदीच्या आवारातल्या भिंतींची आता पडझड सुरू झालीय. तसंच मशिदीच्या प्रवेशद्वारही कधी कोलमडून पडेल ते सांगता येत नाही.

मराठीतले आद्य ग्रंथकार श्रीपती भट हे रोहीणखेडचे रहिवासी होते. त्यांनी ज्योतिष रत्नमाला टीका हा मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला. मुकूंदराज यांनी विवेकसिंधू ग्रंथात वर्णन केलेला राजा जैत्रपल हा याच जिल्ह्यातल्या रोहीणखेड झाडीमंडळाचा राजा होता.

रोहीणखेड गावाला पूर्वी चहुबाजुनं परकोट होता, चार वेशीही होत्या. परकोट आता पूर्णतः ढासळलाय. पण चारपैकी एक वेश अजूनही आहे. तिचीही पडझड सुरू झालीय. गावात एक पाळेश्वराचंही मंदिर आहे. या मंदिराची दुरूस्ती करण्यात आलीय. हे सगळं जतन करण्याची ही वेळ आहे.

हेही वाचा : 

मुस्लिमांना औदार्याची एक संधी चालून आलीय

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

लॉकडाऊनमधे आपण माणुसकीलाच क्वारंटाईन केलंय का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

बेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं

लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

(उद्ध्वस्त वास्तूः समृद्ध इतिहास या पुस्तकातला अंश.)