उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?

१३ जून २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे.

सध्या चर्चा फक्त एकाच गोष्टीची आहे आणि भितीसुद्धा त्याच एका गोष्टीची आहे ते म्हणजे वायू वादळाचं संकट. उद्या हे वादळ पश्चिम किनारपट्टीवर गुजरातमधे येऊन धडकणार आहे. यामुळे गुजरातमधल्या वलसाड, दीव, पोरबंदर, महुवा इत्यादी ठिकाणी मोठं नुकसान होऊ शकत, असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. 

या वादळाचा हल्ला उद्या १३ जूनला सकाळी होण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी १४० ते १७० किमीने वारा वाहणार आहे. ११, १२ जूनला ताशी ४० ते १०० किमीने वारा गोवा, कोकण आणि मुंबईत वाहत होता. एकूण दक्षिण पश्चिमेतल्या ४७० किमी परिसरात हे वादळ पसरलंय. यामुळे गुजरातमधल्या १० जिल्ह्यांमधल्या ४०८ गावं आणि ६० लाख लोकांना नुकसान होऊ शकतं, असं गुजरात सरकारने सांगितलंय. पण हे वादळ भारतात सोमालियावरुन आलंय.

आफ्रिकेतल्या वादळाने भारतात पाऊस उशिरा

वायू हे वादळ पूर्व आफ्रिकेत मार्चपासून आहे. ते सोमालियामधे होतं. सोमालिया किनाऱ्याच्या कमी दाबाच्या पट्ट्यात. ६ ते १७ मार्चपर्यंत हे वादळ तिथे होतं. ७ मार्चला हे मोठं वादळ असल्याचं लक्षात आल्यावर सरकारने यासाठी उपाययोजना करायला सुरवात केली. त्यावेळी तिथल्या हवामान खात्यानं या वादळाचं नाव वायू असल्याचं घोषित केलं, असं फॅनडॉम या न्यूज एंटरटेन्मेंट वेबसाईटवर लिहिलं आहे.

या वादळाच्या तीव्रता ताशी ३०० ते ४०० किमी एवढी होती. यादरम्यान साधारण २०० लोकांचा मृत्यू झाला, कोट्यावधीचं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. पुढे हे वादळ भारताकडे सरकलं. 

या वादळामुळे आधीच दक्षिणेत पावसाला एक आठवडा उशिरा सुरवात झाली. पण हे वादळ पश्चिम किनाऱ्यावर येत असल्यामुळे भारतातल्या इतर ठिकाणच्या पावसाला उशिरा सुरवात होणार आहे. यामुळे पाकिस्तानात लवकर पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

वादळांची नावं कोण ठरवतं?

वादळांना नावं देण्याची पद्धत १९०० पासून सुरु झाली. वायू हे नाव २००४ साली दिलं होतं. त्यावेळी कोची, तिरुअनंतपुरम, लक्षद्वीपमधे आलेल्या वादळाला वायू नाव देण्यात आलं. वादळाचा प्रकार, तीव्रता यावरुन हवामान विभाग आधी रेकॉर्ड केलेल्या वादळाशी तुलना करून घोषित केलं जातं की हे वादळ कोणतं आहे. त्यावरुनच सोमालियाच्या वादळाला वायू म्हटलं गेलं.

सध्या जागतिक हवामान विभाग वादळांची नावं ठरवतं आणि ती घोषितही करतं. जागतल्या वादळांचा अभ्यासही करतं. त्यानुसार वादळांचा रेकॉर्ड ठेवतात. या नावांचा फायदा माध्यमांना होत असल्याचंही म्हटलं जातं. कारण तांत्रिक भाषेत नाव देणं. त्याचं स्पष्टीकरण देणं कठीण होतं. आणि वाचक, प्रेक्षकांनाही समजत नाही. त्यामुळे पटकन रिपोर्ट करण्यासाठी आणि लोकांना समजण्यासाठी नैसर्गिक आपत्तींना नाव देणं गरजेचं आहे, असं  डाऊन टू अर्थ या न्यूज अँड फिचर वैबसाईटवर म्हटलंय.

कोणत्या उपाययोजना केल्या?

बांग्लादेशात मे महिन्यात आलेलं वादळ भारताच्या पूर्व किनाऱ्याला म्हणजे ओडिसामधे आलं होतं. त्या वादळाला फणी म्हटलं गेलं होतं. या वादळाचं मोठं स्वरुप म्हणजे वायू. या वादळातून होणारं नुकसान टाळण्यासाठी सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, सीमा सुरक्षा दलाच्या २६ तुकड्या आणि इतर एजन्सीच्या ४५ तुकड्या तैनात केल्यात. लोकांच्या मदतीसाठी सर्विलन्स एयरक्राफ्ट, लक्ष ठेवण्यासाठी वायू सेनेचं हेलि‍कॉप्टर आहेत.

यात मीडियम लिफ्ट हेलिकॉप्टर आणि लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर असणार आहे. तसंच बचावासाठी लागणारं साहित्य असणार आहे. रडार आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टमचा दूरवरच्या गावांमधे संपर्क करण्यासाठी लावण्यात आलं आहे.

हेही वाचा: मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

गुजरातमधे कशा कशाचं नुकसान होईल?

गुजरातमधल्या मासेमाऱ्यांना १५ जूनपर्यंत किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे. तर महाराष्ट्र आणि गोव्यातल्या मासेमाऱ्यांना उद्यापर्यंत किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसंच या पर्यटकांना धोक्याच्या ठिकाणांपासून लांब सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं आहे. त्यासाठी सरकारी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

वादळामुळे शेती, रस्ते, छप्पर असलेल्या घरांचं नुकसान होऊ शकतं. तसंच वीज आणि मोबाईल नेटवर्क सुरु न राहण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे बचावासाठी जोरदार तयारी करण्यात आलीय.

गुजरातच्या मोठ्या शुद्धिकरण कारखाने आणि बंदर या वादळाच्या वाटेत येतात. अडानी पोर्ट, रिलायंसचे शुद्धिकरण कारखाने, रूसची नायरा एनर्जी सारख्या बऱ्याच इंडस्ट्रीज गुजरातच्या समुद्रकिनारी आहेत. यांनाही वायू वादळाचा सामना करावा लागेल.

हेही वाचा: एनईएफटी आणि आरटीजीएसवरचे चार्जेस रद्द नाही होणारायत

भारताची चीनच्या जहाजाला मदत

इंग्लंडच्या हवामान विभागाने सांगितलं की वायू वादळामुळे गुजरातच्या कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर इत्यादी भागांमधे वादळासह मुसळधार पाऊस आणि पूर येण्याची शक्यता आहे. 

गोवा, कोकण आणि मुंबईत वायू वादळानंतरच्या पुढच्या दोन दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलीय. वायू वादळाचा धोका असताना चीनची जहाजं प्रवास करत होती. त्यांना या अलर्टबद्दल समजल. त्यांनी मदत मागितल्यावर रत्नागिरीत वायूच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी त्यांच्या १० जहाजांना आसरा देण्यात आलाय.

हेही वाचा: गिरीश कर्नाड आपल्या आईविषयी भरभरून लिहितात तेव्हा