आपण आपले म्युच्युअल फंड्स कधी विकले पाहिजेत?

१८ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


सध्याची आर्थिक स्थिती गुंतागुंतीची झालीय. त्यामुळे पैसे कुठे गुंतवू किंवा गुंतवलेले पैसे काढू का? अशा गोंधळात आपण आहोत. या काळात म्युच्युअल फंड विकण्यासाठी लोक सरसावतात. पण म्युच्युअल फंड का विकताय हे कारण खरंच पटतंय का हे चाचपडून बघायला हवं.

देशाचं अर्थकारण सध्या अनस्टेबल झालंय. त्यामुळे बाजाराच्या स्थितीचं नेमकं विश्लेषणही करता येत नाहीय. म्हणूनच सर्व गुंतवणूकदारांचा कठीण काळ सुरू आहे. आणि याच काळात आपल्याकडून भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आपलं आर्थिक ध्येय काय आहे हे प्रत्येक व्यवहार करताना लक्षात ठेवलं पाहिजे.

वर्ल्ड पोकर स्पर्धेत भाग घेतला

जिथे खरंच गरज आहे तिथे फंड नक्की विकावेत. ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीचे अर्थतज्ज्ञ टिम हरफोर्ड. ते इंग्लंडमधल्या फायनॅनशिअल टाईम्स वर्तमानपत्रात स्तंभलेखनही करतात. त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या अर्थशास्त्रावरली पुस्तकांपैकी ‘अंडरकवर इकॉनॉमिस्ट’ हे पुस्तक सगळ्यात जास्त गाजलं आणि बेस्ट सेलरही ठरलं.

याच पुस्तकातून एक उदाहरण घेता येईल. त्यात म्हटलं आहे की, गुंतवणूकदार नुकसान आणि फायद्यावर कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात हे सांगितलंय. ही गोष्ट जाणून घेण्यासाठी हारफोर्ड यांनी खूप काळ अभ्यास केला.

त्यांनी जगभरातल्या जुगार बाजारांचा अड्डा समजल्या जाणाऱ्या लास वेगसला गेले. तिथे वर्ल्ड सिरिज ऑफ पोकरसारख्या स्पर्धेत भाग घेतला. आणि त्या लोकांच्या प्रतिक्रियांचं आकलन केलं.यात एक खेळाडू ख्रिस फर्ग्युसन हा डॉक्टरेट होता, तर त्यावेळी तो वर्ल्ड चॅम्पियन झाला.

हेही वाचा: लोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?

पोकर खेळातून काय समजलं?

कोणत्याही खेळाडूप्रमाणे पोकरचे विश्लेषण हे तार्किक मुद्द्यांवर करता येतं. मात्र खेळात भावना आणि मानसिक स्थितीची मोठी भूमिका असते. एक वेळ अशी येते की, तिथे भावनेवर नियंत्रण ठेवणं कठीण होत जातं. जर काही गडबड झाली तर मोठी चूक होते. आणि ही स्थिती मोठ्या पराभवानंतर येऊ शकते.

त्या परिस्थितीत ते कोणताही विचार न करता आक्रमक पद्धतीने बाजी लावण्यासाठी काही खेळाडू आतुर होतात. यावेळी चूक होण्याची शक्यता वाढते. ही मंडळी काहीतरी मिळवण्यासाठी जोखीम उचलतात. अर्थात आपल्या चुका शोधणं आणि भविष्यात पुन्हा चूक घडू नये याची खबरदारी घेणं गरजेचं असतं.

हेही वाचा: लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?

अनुभवी लोकसुद्धा गोंधळतात

इक्विटी फंडमधून पैसा कधी काढावा यावरूनह अनुभवी गुंतवणूकदारसुद्धा गोंधळात पडतात. बाजाराच्या पडत्या काळात त्यांची द्विधा मनस्थिती दिसून येते. त्यामुळे गुंतवणूक सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावं की नाही यावरही ते ठाम राहत नसतात.

अशावेळी भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जातो. आणि पुढे पश्चातापाची वेळ येऊ शकते. प्रत्यक्षात अनुभवी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार बाजाराच्या सिथ्तीचं चुकीचं आकलन करून. तोच मुद्दा गृहीत धरून फंड विक्री करतात. म्हणूनच विक्री करताना अनुभवी लोकही खूपदा गोंधळू जातात.

खरंतर आपल्याकडे ज्या प्रमाणात गुंतवणुकीची चर्चा होते. त्या प्रमाणात विक्रीबद्दल चर्चाच होत नाही.

हेही वाचा: एफडी : रिस्क फ्री गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय

आर्थिक ध्येय विक्रीने साध्य होतं

फंड विकण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र फंडशी कायम ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. कोणत्याही फंडची विक्री करणारे गुंतवणूकदार हे तीन कारणं सांगतात. पहिलं म्हणजे मिळणारा फायदा, दुसरं नुकसान आणि तिसरं म्हणजे नुकसानही होत नाही आणि फायदाही होत नाही.

काहींच्या मते, जर गुंतवणुकीचं मूल्य वाढलं तर मी नफेखोरी का करू नये किंवा एखाद्या फंडचं मूल्य घसरलं तर मी बाहेर का पडू नये. तसं बघितलं तर फंड विकण्यासाठी कोणतंच युक्तिवाद योग्य नाही.

गुंतवणूकदारांनी फंड कधी विकावा हा एक गहन प्रश्न आहे. आपल्या आर्थिक ध्येयानुसार फंड विक्रीचा निर्णय घ्यायला हवा. जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा फंडची विक्री करावी. गुंकवणूकीचं मुख्य ध्येय हे गुंतवणूक करून नाही तर विक्रीने साध्य होतं. तरंच आपण ध्येयापर्यंत पोचू शकतो.

हेही वाचा: 

सोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत?

पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार

अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

पाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा देशद्रोहच

(दैनिक पुढारीच्या अर्थभान पानावरील ‘म्युच्युअल फंडमधून पैसे काढताना’ या लेखाचा हा संपादित अंश.)