कोरोना म्हटलं की आपल्या काळजात धडकीच भरते. आपलं मन देवाचा धावा करू लागतं. आपण देवाची प्रार्थना करू लागतो. आता या देवाचं नावंही कोरोनाच असेल तर? कोरोना वायरसची साथ पसरल्यापासून ख्रिश्चन धर्मात इसवीसनानंतर दुसऱ्या दशकात होऊन गेलेल्या संत कोरोना यांचा फोटो आणि सोबत साथरोगापासून संरक्षण कर अशी प्रार्थना सोशल मीडियावर वायरल होतेय.
कोरोना वायरसचा प्रसार थांबावा यासाठी जगभरातली सरकारं, आरोग्य अधिकारी, शास्ज्ञज्ञ, नर्सेस, डॉक्टर असे सगळे जण प्रयत्न करताहेत. पण कोरोना काही थांबायचं नाव घेईना. आता एवढं करूनही यश हाती येत नाही हे पाहून सामान्य नागरिक आपापल्या देवाची आराधना करू लागलेत. आता देवच यातून मार्ग काढेल अशी श्रद्धा त्यांना वाटतेय.
केरळमधल्या अनेक कॅथलिक चर्चमधेही अशी आराधना सुरू झालीय. त्यांच्या एका देवाचा एक फोटो आणि त्याखाली मल्याळम भाषेतली प्रार्थना सध्या वॉट्सअप आणि सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतेय. पण हा फोटो येशू ख्रिस्ताचा नाही. तर कोरोना नावाच्या एका ख्रिश्चन संताचा आहे. त्याखाली लिहिलेल्या मल्याळम प्रार्थनेचा मराठीत अर्थ होतो, ‘हे संत कोरोना, कोरोना वायरसपासून आमचं संरक्षण कर.’
कोरोना वायरसला कोरोना हे नाव शास्त्रज्ञ जून अल्मेडा यांनी १९६४ दिलं. त्याच्या जवळपास हजार दीड हजार वर्षापूर्वी संत कोरोना होऊन गेल्यात.
हेही वाचा : ५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट
संत कोरोना. आजपासून जवळपास १८०० वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसनानंतरच्या पहिल्या शतकात रोमन शासकांच्या काळात संत कोरोना राहत होत्या. कोरोना या त्यांच्या नावाचा अर्थ ‘मुकूट’ असा होतो. द रिकॅथेलिक या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीतल्या बवेरिया आणि ऑस्ट्रियाच्या काही भागात या संत कोरोना यांना संरक्षण करणारी देवता म्हणून मान्यता आहे. खासकरून जुगार खेळणारे, खजिना शोधायच्या नादाला लागलेले आणि खाटीक लोक या संत कोरोना यांची प्रार्थना करत असत.
येशू ख्रिस्तांनी जगाला ख्रिश्चन धर्म सांगितला आणि त्यानंतर हळूहळू लोक या धर्माचं पालन करू लागले. त्यांच्या जन्मानंतर साधारण दोनशे वर्षांनी संत कोरोना जन्माला आल्या असाव्यात. त्यावेळी संपूर्ण युरोपवर रोमन साम्राज्य होतं. या रोमन काळात ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांना अतिशय छळ करून मारलं जात होतं. द रोमन मार्टिओलॉजी या पुस्तकाच्या १९ साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या आवृत्तीत हा सगळा इतिहास लिहिलाय. या पुस्तकात संत कोरोना यांचाही उल्लेख येतो.
संत कोरोना यांचे पती संत विक्टर हे आत्ताच्या सिरीया भागात सैनिक म्हणून काम करत होते. हे दाम्पत्य ख्रिश्नच धर्मावर विश्वास ठेवत. मार्कस औरेलियस या रोमन राजाच्या राज्यांत या दोघांवर खूप अत्याचार केले गेले. आधी संत कोरोना यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या नवऱ्याचा निर्घुण खून करण्यात आला. त्यानंतर संत कोरोना यांना झाडाला बांधून मारून टाकण्यात आलं. त्या तेव्हा फक्त १६ वर्षांच्या होत्या. तेव्हापासून कुणी झाडं कापत असेल तर त्या झाडांचं रक्षण त्या करतात अशी श्रद्धा पुढे आली.
डीडब्लू न्यूजवर प्रसिद्ध झालेल्या एका स्टोरीनुसार, जर्मनीमधल्या आखेन नावाच्या शहरातल्या प्राचीन कॅथेड्रल चर्चने अलिकडेच त्यांच्या संग्रहालयात एक भव्य पेटीचं प्रदर्शन ठेवलंय. या पेटीत संत कोरोना यांचे अवशेष असल्याचं म्हटलं जातं. कोरोनाची साथ येण्याआधीच यंदा संत कोरोनाशी संबंधित गोष्टींचं प्रदर्शन भरवायचं, असं नियोजन होतं. संत कोरोना यांचे अवशेष असलेली कांस्य आणि हत्तीच्या दातांपासून बनलेली, सुंदर नक्षीकाम असलेली पेटीही प्रदर्शनात असणार होती.
‘९ व्या शतकात रोमन सम्राट शार्लेमाग्ने यांच्या निधनानंतर त्यांच्या समाधीवर जर्मनीतलं हे प्रसिद्ध कॅथेड्रल चर्च उभारण्यात आलं होतं. त्यानंतर सगळ्या राजांचा राज्याभिषेक या चर्चमधे करण्याची प्रथा पडली. आजही हे चर्च एक प्राचीन तीर्थस्थळ म्हणून ओळखलं जातं,’ असं या कॅथेड्रल चर्चमधे काम करणाऱ्या डॅनिअला लोएवेनिश यांनी डीडब्लूशी बोलताना सांगितलं. त्यानंतर १० व्या शतकात इसवीसन ९९७ मधे राजा तिसरा ओटो याने संत कोरोनाचे अवशेष या कॅथेड्रल चर्चमधे आणले.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण
कोरोना साथरोगाचा प्रसार झाल्यापासून संपूर्ण जगात या संत कोरोना साथरोगाची देवता म्हणून प्रसिद्ध होतायत. पण खरंतर, जर्मनीमधे किंवा जगात इतर कुठेही यापूर्वी कधीही संत कोरोना यांचा साथरोगाशी संबंध लावलेला नव्हता. फक्त ऑस्ट्रियाच्या काही भागात आणि ऑस्ट्रियाच्या शेजारी असणाऱ्या बावरीया या जर्मन राज्यात संत कोरोना यांना साथरोगाची देवता म्हटलं जातं.
लोएविनिश सांगतात, ‘पाळीव प्राण्यांमधे एखादी साथ आली तर त्यांना त्याच्यापासून वाचवण्यासाठी किंवा त्याप्रकारचं काही संकट आली तर ऑस्ट्रियामधले लोक संत कोरोना यांची प्रार्थना करत असतं.’ आपल्याकडे ग्रामदैवत असतं तसंच संत कोरोना ऑस्ट्रियामधल्या काही भागातल्या स्थानिक देवता होत्या. त्यांच्या आणि कोरोना वायरसच्या नावाच्या साधर्म्यामुळे या साथरोग आल्यानंतर जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.
दरिनकॅथलिक या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखातून वेगळीच माहिती समोर येते. मार्चच्या सुरवातीला संत कोरोना यांच्याबद्दल ऐकलं, वाचलं आहे असा एकही कॅथलिक माणूस सापडला नसता. पण कोविड १९ या साथरोगाचा प्रसार झाल्यापासून सगळे संत कोरोना यांची पुजा करू लागलेत, असं या लेखात लिहिलंय.
‘कोरोना वायरस आणि संत कोरोना यांचा एकमेकांशी संबंध काय ही गोष्ट अत्यंत गोंधळात टाकणारी आहे,’ असं या लेखात एलिझाबेथ हार्पर म्हणतात. साऊदर्न कॅलिफोर्निया युनिवर्सिटीत हार्पर प्राध्यापक म्हणून काम करतात आणि ख्रिश्चन धर्मातल्या संतांवर त्यांनी एक चरित्रपर पुस्तक लिहिलंय.
संत कोरोना यांच्याबद्दलची अधिकृत माहिती फार थोडी किंवा जवळजवळ नाहीच. त्यांचं नाव आणि त्यांना का मारलं हे सोडलं तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यांना ज्या प्रकारे मारलं गेलं, तो क्रूरपणाचा कळस होता. म्हणूनच कोरोना म्हणजे हौतात्म्याचा मुकूट चढवणारं नाव त्यांना दिलं गेलं. कोरोना वायरसलाही त्याच्याभोवती असणाऱ्या काट्या काट्यांच्या मुकूटामुळे कोरोना नाव मिळालंय. मात्र, दोन नावांमधलं साधर्म्य पाहून संत कोरोना आणि साथरोगाचा एकमेकांशी संबंध जोडला जातोय.
हेही वाचा : एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय
हार्पर यांच्या म्हणण्यानुसार, हा अपप्रचार खरंतर ग्लोरिया डॉट टीवी या जर्मन वेबसाईटनं सुरू केला. आता यालाच तथ्य समजलं जातंय. जर्मन बिशपच्या परिषदेत या वेबसाईटचा निषेध करण्यात आला असला तरीही कॅथलिक बातम्या पुरवणारी अधिकृत वेबसाईट म्हणून याची जाहिरात होत असते.
मात्र, कॅथलिक समाजाच्या बातम्यांच्या पडद्यामागे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या बाबतीत्या खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवण्याचं काम या वेबसाईटवर होत असतो, असं हार्पर म्हणतात. संतचरित्र लिहिणाऱ्या अनेक तज्ञांकडूनही हा दावा खोटा ठरवण्यात आलाय.
असं असलं तरी आता संत कोरोना यांची पुजा करणं लोकांनी चालू केलंय. या साथरोगापासून आम्हाला वाचव म्हणून आत्ता संत कोरोना यांची पुजा करणं चालू आहे. उद्या लोकांच्या नोकऱ्या गेल्यावर आर्थिक संकट दूर करणारी म्हणून पुन्हा लोकांना संत कोरोना यांचीच आठवण येणार यात शंका नाही.
हेही वाचा :
अनेकांतवाद हाच महाराष्ट्र विचाराचा पाया
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
लॉकडाऊनमधे चिअर्स करण्याआधी हे वाचायलाच हवं
कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?
पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!
अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट
जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं
पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो