बंडखोर पायलटांचं भवितव्य काय?

१९ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यासाठी त्यांना एक तर शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल.

१९९४ ची गोष्ट आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांचा नेतृत्वाच्या श्रेष्ठत्वावरून तत्कालीन पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी प्रचंड संघर्ष झाला होता. योगायोगानं तेव्हा माझी काँग्रेसचे सरचिटणीस बुद्धप्रिय मौर्य यांच्याशी अचानक गाठ पडली. मौर्य हे दलित नेते असून ते उत्तर प्रदेशचे होते. तेव्हा यूपीमध्ये अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते राव यांच्याविरोधात होते.

मौर्य यांना मी खिजवण्याच्या, चिडवण्याच्या उद्देशानं विचारलं, ‘तुम्ही अर्जुन सिंग यांना मदत का करत नाही?’ तरीही ते दुखावले गेले नाहीत. अत्यंत संयत आवाजात ते म्हणाले, ‘मी अलीगडजवळच्या उद्रौली गावातला आहे. तिथे एक म्हण प्रचलित आहे. एखाद्या व्यक्तीला आपला जावई किंवा नेता आपल्याहून वरचढ असावा असं वाटतं आणि अर्जुन सिंग हे माझ्याहून चांगले नाहीत.’

हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

राहूल गांधीचे घरातले प्रतिस्पर्धी

सध्या सचिन पायलट आणि काँग्रेस हाय कमांडमध्ये अशीच हमरीतुमरी सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे ८७ वे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांची पुन्हा निवड करण्याला पक्षातूनच काहीसा विरोध होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि इतर (यातले काही येत्या काळात पक्षही सोडू शकतात) काही जण राजकीय समज, सामाजिक कौशल्य आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या जोरावर स्वतःला राहुल यांच्याहून चांगले समजतात.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर ‘टीम राहुल’चे अनेक आजी-माजी सहकारी राहुल गांधी यांना तुच्छ मानत आहेत. खासगी चर्चांमध्ये ते स्वतःच्या पराभवासाठी घराणेशाहीच्या वारसदारांना उखडून देणार्यात नरेंद्र मोदींऐवजी राहुल गांधींना दोष देतात.

सचिन पायलट यांना वयाच्या २६व्या वर्षी लोकसभेचं तिकीट दिलं. ३९व्या वर्षी केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि ४०व्या वर्षी उपमुख्यमंत्री केलं. पद आणि आश्रयाचे लाभार्थी असलेले हेच घराणेशाहीचे तरुण वारसदार आता काहीसे प्रतिकाराच्या भूमिकेत गेलेत. त्यांच्या मते, त्यांनी गांधींच्या कुठल्याही मदतीशिवाय स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं आहे. सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, प्रिया दत्त यांसारख्या दुसर्याी-तिसर्या  पिढीच्या वारसदारांचा त्यामध्ये समावेश आहे.

बंगालमधला चौथा फुटबॉल क्लब

धर्माच्या उलट राजकारणात निष्ठा ही गोष्ट व्यवहार्य आणि सशर्त असते. १९७७मधे इंदिरा गांधींची सत्ता गेली. तेव्हा ‘इंदिरा इज इंडिया’ आणि ‘इंडिया इज इंदिरा’ (इंदिरा म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच इंदिरा) या नार्यांला जन्म देणार्या् देवकांत बरुआ यांनी सत्ता जाताच निष्ठाही बदलली. पक्ष बदलला. शाह चौकशी आयोगापुढे जाण्याआधी विद्याचरण शुक्ल आणि अंबिका सोनी यांना पदच्युत करण्यात आले होते. 

१९९७ मधे सीताराम केसरींच्या नेतृत्वातल्या काँग्रेस पक्षाची स्थिती बिकट होती. तेव्हा नेहरूवादी मणिशंकर अय्यर यांनी तृणमूल काँग्रेसमधे प्रवेश केला. नंतर ते पुन्हा काँग्रेसमधे आले. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातली तृणमूल काँग्रेस म्हणजे ‘बंगालमधला चौथा फुटबॉल क्लब’ यापलीकडे दुसरं काही नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

सचिन पायलट यांचं काय होणार?

काँग्रेसच्या समकालीन इतिहासावर  एक धावती नजर टाकली तर मित्र, मित्रमंडळी किंवा पांढरपेशा राजकारणी फार काळ टिकत नाहीत, असं दिसते. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपला लहानपणीचा दोस्त पंतप्रधान राजीव गांधींच्या पतनाला हातभार लावला होता. १९८४ मधे इलाहाबाद का छोरा म्हणून अमिताभ यांना निवडून दिलं आणि हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासारख्या कधीकाळच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पराभव केला. पण त्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधले मतभेद उफाळून आले.

यशस्वी कॉर्पोरेट उद्योगपती असलेल्या अरुण नेहरू, अरुण सिंग हेही गरज होती त्यावेळीच चक्रव्यूहात सापडलेल्या राजीव गांधींना एकटं सोडून बाजूला झाले. याउलट यशपाल कपूर, आर. के. धवन, एम. एल. फोतेदार आणि विन्सेट जॉर्ज यांसारखे तळातून वर आलेले राजकारणी नेहमीच इंदिरा, राजीव आणि सोनिया यांच्यासोबत राहिले. दुर्लक्ष, अपमान सोसूनही ते सोबत राहिले.

सचिन पायलट यांच्या भवितव्याबद्दल काहीएक तर्क लावणं खूप कठीण आहे. काँग्रेस किंवा गांधींसोबत त्यांचं भांडण जवळपास अशक्य आहे. सचिनच्या बंडाची ही वेळ गोंधळात टाकणारी आहे. ऑगस्ट २०१९ मधे जवळपास वर्षभरापासून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी पाहणाऱ्या सोनिया गांधींना स्वतःची जागा आता राहुलनं घ्यावी, असं वाटतं. पण काही लोकांनी राहुल गांधींना पक्षातूनच तगडं आव्हान उभं केलंय.

त्यांचा प्रभाव ज्योतिरादित्य शिंदेंनी पक्ष सोडून जाण्याच्या एक्झिट डोअर पॉलिसीपेक्षा खूप अधिक आहे. तथापि, याउलट एक युक्तिवाद केला जातो. त्यानुसार, शक्तिशाली शरद पवार आणि उत्साही राजेश पायलट यांना पक्षांतर्गत निवडणुकीत सीताराम केसरीसारखा कमकुवत, तेजोहीन माणूस हरवू शकतो. कारण केसरी हे विद्यमान काँग्रेस अध्यक्ष होते, म्हणूनच ते हरवू शकले. सोनिया विरुद्ध जितेंद्र प्रसाद ही लढाई तर अधिक कामचलाऊ होती. सोनियांचा जो प्रतिस्पर्धी होता त्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

पक्ष सोडताना नेते सिंहासारखे असतात

सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसबाहेरची राजकीय कारकीर्द वाटते तेवढी सोपी नाही. त्यासाठी त्यांना एक तर ज्योतिरादित्य शिंदेंचा मार्ग निवडावा लागेल किंवा भाजपशी आघाडी, समझोता करावा लागेल. राजस्थानमधे सध्या कुठलीही तिसरी आघाडी, तिसरा पक्ष अस्तित्वात नाही. पायलट यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्याक काँग्रेस पक्षासाठी अशा पद्धतीचा हा आतापर्यंतच्या इतिहासातला ४९ वा पक्षफुटीचा प्रसंग असेल.

पक्षफुटीवर काँग्रेसचे विचारवंत नेते विठ्ठलराव गाडगीळ म्हणायचे, ‘पक्ष सोडताना काँग्रेस नेते सिंहासारखे असतात आणि पक्षात येताना एखाद्या कोकरासारखे, शेळीसारखे होतात.’ असं असलं तरीही सध्या देशभरात १६ जणांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलंय. यामधे शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, के. चंद्रशेखर राव, मुफ्ती मोहम्मद सईद यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होतो.

पण याला दुसरी बाजूसुद्धा आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाला राज्यात तिसर्याो पक्षाला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा पक्षाला सत्तेच्या काठावर बसावे लागले. पक्षाची पीछेहाट झाली. स्वबळावर एकहाती सत्ता मिळवणं हे तर काँग्रेससाठी दूरचं स्वप्न होऊन बसलं आहे. दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधे आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळते.

हेही वाचा : राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

एकहाती सत्तेचं स्वप्न

पायलट यांच्यासाठी सध्या तरी राजस्थानमधे भाजप आणि काँग्रेसपासून सारखं अंतर राखत स्वतःचं स्थान निर्माण करणं ही सर्वांत मोठी समस्या आहे. आणि सध्या तशी कुठली शक्यताही दिसत नाही. भाजपशी व्यावहारिक किंवा थेट आघाडी केल्यानं तिसरी शक्ती उभी करण्याचा पर्याय आपोआप बंद होऊन जाईल.

राज्यातल्या सत्तेच्या राजकारणापासून दूर राहण्याचा पर्याय निवडला तर पायलट हे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत एक विश्वसनीय पर्याय म्हणून स्वतःला स्थापित करू शकतात. सध्याचं सत्तेचं राजकारण अशोक गेहलोत, वसुंधराराजे शिंदे यांच्यासाठी ते मोकळं ठेवू शकतात. पण यासाठी प्रचंड संयम, प्रयत्न आणि मोठमोठ्या पदांच्या सततच्या मोहांना टाळावं लागेल.

जर सर्वसमावेशक मध्यवर्ती अजेंडा घेत एखादा बिगर भाजप प्लॅटफॉर्म उभा करायचा असेल तर त्यासाठी पक्षाबाहेर पडण्याची खुमखुमी असणार्या  नेत्यांची काँग्रेसमधे वानवा नाही. पायलट हे १९७९-८० मधे देव आनंद ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं जाऊ इच्छिणार नाहीत. देव आनंद यांनी  ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाची स्थापना केली. विजयालक्ष्मी पंडित, नानी पालखीवाला आणि इतर काही दिग्गज लोक या पक्षात आले. पण त्यांनी थेट निवडणुकीचा मार्ग न निवडता राज्यसभेत जाणे पसंत केलं आणि देव आनंद यांचं हे दुकान तात्काळ बंद झालं, त्याचा पुढं काही मागमूसही राहिला नाही.

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन

राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

(अनुवादः सदानंद घायाळ)