सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला

१३ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


युवराज सिंह म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा सिक्स मारणारा अग्रेसिव युवी आठवतो. भारताच्या बदलत्या क्रिकेटमधे युवराजचा खूप मोठा वाटा आहे. टी २० आणि वन डेतल्या वर्ल्डकपचा तो हिरो आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटलं. तो खेळत असताना मॅच बघायला किती मजा येत होती. आता हे सगळं आपण ऑनलाईन जुन्या मॅचमधेच बघू शकतो. युवराजने क्रिकेटसाठी जे काही केलय त्यावरुन तो एक ग्रेट खेळाडू आहे हे सिद्ध होतं.

भारतीय  क्रिकेटचा खऱ्या अर्थाने ‘युवराज’ असलेल्या युवराज सिंहने अखेर आपली झगडणारी बॅट म्यान केली. येत्या काही दिवसात युवराज निवृत्ती घेणार हे सगळ्यांनाच माहीत होतं. त्यामुळे आश्चर्याचा धक्का वगैरे काही बसला नाही. पण, मनात एक हळहळ होती शेवट मनासारखा झाला नाही. युवराजच्याही आणि त्याच्या चाहत्यांच्याही मनासारखा झाला नाही. 

युवराज खेळत असलेल्या काळात भारताने जिंकलेल्या दोन महत्वाच्या २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकपमधे त्याच्या कामगिरीला तोड नव्हती. त्यामुळे इतिहासात जरी धोनीने सिक्स मारताच भारताने वर्ल्डकपला गवसणी घातली अशी नोंद असली तरी त्याला सिक्स मारण्याची संधी निर्माण करुन दिली ती फक्त युवराज सिंहने.

रोहित शर्माचं ट्विट

युवराजने निवृत्ती जाहीर करेपर्यंत तो संघातला एक झगड असणारा खेळाडू वाटायचा. पण ज्यावेळी त्याने निवृत्ती घेतली आणि लोक फ्लॅशबॅकमधे गेले. त्यावेळी सगळ्यांना समजू लागलं की युवराजने काय करुन ठेवलं आहे. म्हणूनच भारताचा सलामीवीर आणि नुकताच आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्माने ‘तुमच्याकडे बहुमुल्य असं काय होतं हे ते गेल्याशिवाय समजत नाही.’ असे ट्विट केलं होतं. 

ते एका अर्थी खरंच होतं. याचा संदर्भ आपण त्याच्या अखेरच्या आयपीएलमधे अर्धशतकी खेळी करुनही त्याला चारच सामने खेळायला मिळाले याबाबत युवराजने व्यक्त केलेली खंत असाही लावू शकतो. पण, त्याची संपूर्ण कारकीर्द पाहिली तर आपल्याला युवराजच्या ग्रेटनेसची कल्पना येईल.

हेही वाचा: टीम इंडिया आणि धोनी क्रिकेट खेळायला गेलेत, ‘युद्धा’वर नाही

युवराज पहिला मॅच फिनिशर

२००२ ला झालेल्या नेटवेस्ट सिरीजच्या फायनलमधे इंग्लंडने भारताला ३२५ धावांचं टार्गेट दिलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना नेहमीप्रमाणे भारताची सर्व मदार होती ती सचिन तेंडुलकरवर. पण, सचिन पाठोपाठ भारताचे भले भले बॅट्समन माघारी परतले. त्यामुळे नेहमीप्रमाणे भारतीय चाहत्यांनी सचिन बाद झाल्यावर टीव्ही बंद केले. 

पण, अवघ्या २१ वर्षांच्या डावखुऱ्या फलंदाजाने अशी काही फलंदाजी करण्यास सुरुवात केली की लोकांनी पुन्हा टीवीचं बटन सुरु केलं. युवराजने कैफच्या साथीने इंग्लंडने ठेवलेलं ३२५ धावांचं टार्गेट पूर्ण केलं. हा विजय ऐतिहासिक ठरला असला तरी या विजयाने भारतात नव्या प्रकारच्या क्रिकेटची पायाभरणी झाली होती. आणि युवराज मॅच फिनिशर म्हणून समोर आला.

हेही वाचा: १९९२ मधे पाकिस्तानने जे केलं, ते यंदा दक्षिण आफ्रिका करू शकते?

सचिननंतर युवराज आहे

नेटवेस्ट सिरीज जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांना विश्वास बसला की सचिन नंतर भारताला सामना जिंकून देणारा युवराज मागे आहे. युवराजचं कोणत्याही बॉलवर लिलया सिक्सर मारण्याचं कसब त्याला भारताचा ग्रेटेस्ट मॅच फिनिशर बनवून गेलं. 

जरी धोनीची  भारताचा सर्वात चांगला मॅच फिनिशर म्हणून असली तरी युवराज हा भारताचा पहिला मॅच फिनिशर आहे. त्याने अडचणीत सापडलेले सामने लिलया जिंकून दिलेत.

सचिन म्हणजे भारतीय फलंदाजी असं समजणारे भारतीय क्रिकेटचे चाहते आता युवराज आहे म्हटल्यानंतर अखेरच्या चेंडूपर्यंत विजयाची आशा लावून सामने बघत राहिले. युवराजनेही आपल्या खेळीने त्यांच्या आशेचं विश्वासात रुपांतर केलं.

हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते

भारताच्या विजयात युवराजचा वाटा

पुढे भारत ऐन मोक्याच्या वेळी कच खाणारा संघ राहिला नाही. युवराजने २००७ च्या टी २० वर्ल्डकपमधे, २००३ ला फायनलमधे ऑस्ट्रेलियाने केलेल्या पराभवाचा बदला घेतला. तर सेमी फायनलमधे पहिल्या टी २० वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

यामधे युवराजचा मोठा वाटा होता. तो ३० चेंडूत ७० धावांची झुंजार खेळी खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा विजय प्रातिनिधीक होता. भारताची टीम आता कात टाकत होती. भारताला आता विजयाची चटक लागली होती.

हेही वाचा: कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

ग्लॅमरस ट्रेंडचा ब्रँड अम्बॅसेडर युवराज

२००७ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेटमधे आयपीएल युग सुरु झालं. आयपीएलमुळे ग्लॅमर आणि क्रिकेट यांचं अफेअर सुरु झालं. भारतीय संघातील चार्मिंग चेहरा असलेला युवराज या अफेरचं मुखपृष्ठ ठरला. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जाऊ लागलं. त्याचा ड्रेसिंग सेंस फॅशन ट्रेंड होऊ लागला. 

सध्याच्या भारतीय संघात जे ग्लॅमर आणि खेळाडूंचा झगमगत्या दुनियेतला सहज वावर दिसतो. या ग्लॅमरस ट्रेंडचा पहिला ब्रँड अम्बॅसेडर युवराजच आहे. युवराजनेच भारतीय क्रिकेटचा सभ्य, कारकुनी टाईपचा चेहरा बदलला. त्यानेच क्रिकेट वर्तुळात आलेल्या ग्लॅमरमधे कसे वावरायचं याचा वस्तुपाठच घालून दिला होता. आता याच रस्त्यावरून विराट कोहली आणि त्याची सेना पुढे चालत आहे.

हेही वाचा: पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?

टेस्ट क्रिकेटमधलं तंत्र बिघडलं

पहिल्या टी २० वर्ल्डकपनंतर दोन क्रिकेट फॉरमॅटमधे तिसऱ्या फॉरमॅटची भर पडली होती. याचा परिणाम सर्वात जुना फॉरमॅट असलेल्या टेस्ट क्रिकेटवर पडला. टी २० तला षटकार आणि चौकारांच्या पळत्या मिटरमुळे कसोटीत थ्रील राहिलं नाही असं चाहत्यांना वाटू लागलं. याचा परिणाम खेळाडूंवरही झाला. 

या परिणामाचं उदाहरण, युवराजची बॅललिफ्ट म्हणजे फटका मारतेवेळी उचलेली बॅट. युवराजच्या ज्या हाय बॅकलिफ्टची वनडे आणि टी २० खेळताना कौतुक व्हायचं, तेच या टेस्ट क्रिकेटमधे मारक ठरलं. या हाय बॅकलिफ्टमुळे टेस्ट मॅचमधे स्पिन बॉलला बॅटींग करताना युवराजचा बॅलेन्स बिघडायचा. 

टेस्ट मॅचमधल्या ओवरमधले ५ बॉल डिफेन्स करावे लागतात पण, या हाय बॅकलिफ्टमुळे युवराजचं टेस्ट क्रिकेटमधलं सगळ्यात महत्वाचं मानलं जाणारं डिफेन्स तंत्र बिघडलं.

हेही वाचा: आजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर

टेस्ट क्रिकेटवर फोकस करा

त्यामुळे ३०० च्या वर वनडे खेळणाऱ्या युवराजची टेस्ट क्रिकेटमधली कारकीर्द ४० सामन्यांतच संपली. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला कसोटी किकेट काय आहे हे माहिती आहे. कसोटी प्लेअरचा क्रिकेटच्या इतिहासात एक वेगळाच आणि उच्च दर्जा आहे. 

म्हणूनच युवराजला क्रिकेट सोडताना कसोटी क्रिकेटमधे फार चमक दाखवता आली नाही याची खंत आहे. त्याने येणाऱ्या पिढीला ग्लॅमरस टी २० बरोबरच टेस्ट क्रिकेटवर फोकस करण्याचा सल्ला दिलाय.

हेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर