सुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो.
'लॉकडाऊन'ला पर्याय म्हणून लसीकरण वेगाने वाढवा, असं सांगितलं जातंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचं पूरक पाऊल आहे. मात्र सध्याच्या लाटेतून निर्माण झालेल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर हॉस्पिटल खाटांच्या तुडवड्यावर लसीकरण ताबडतोबीचं उत्तर नाही. लसीमुळे प्रसार थांबतो, असा त्या कंपन्यांचाही दावा नाहीय. डॉ. अनंत फडके यांचा हा वायरल होत असलेला लेख इथं देत आहोत.
लसींची खरेदी, आयात, तिचं वितरण यांचे अधिकार केंद्राने आपल्या हाती एकवटून ठेवण्याऐवजी राज्यांना द्यायला हवे. १६ जानेवारीला लसीकरण सुरू झालं तेव्हा लस उत्सव समजून घेता आला असता. मात्र आज देशात लशींची टंचाई असताना लस-उत्सव म्हणजे जनतेला केंद्र सरकारला धारेवर धरण्याची संधी देणारे ‘टीका उत्सव’ साजरे करण्यासारखं आहे.
सध्या कोरोनावरच्या रेमडेसिविर या औषधाची सगळीकडे चर्चा आहे. कोरोना पेशंटची संख्या वाढल्यामुळे औषधाच्या मागणीतही वाढ झालीय. त्यासाठी मेडिकल बाहेर लांबच लांब रांगा लागतायत. भरमसाठ किंमत आकारली जातेय. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने औषधाची निर्यातही थांबवलीय. पेशंटला एवढं विश्वासार्ह वाटणारं हे औषध खरंच कोरोनावर काम करतं का?
महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिलला १९४ वी जयंती. तर आज १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती. कृतिशील आणि सर्जनशील समाजाचं चित्र प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी दोन्ही विचारवंतांनी आंदोलनाचा आणि चळवळीचा मार्ग स्वीकारला असला, तरी तो मार्ग लोकशाही चौकटीतला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा घेतलेला वेध.
कोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.
गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६० हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.