संपूर्ण लेख

भारतातल्या अस्पृश्यांच्या पहिल्या मंदिर प्रवेशाची शंभरी

३० मार्च १९२४ला केरळच्या वायकोम गावात मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी भारतातलं पहिलं बंड केलं. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या…
संपूर्ण लेख

दोन वर्षात दुसऱ्या जागतिक आरोग्य आणीबाणीचं कारण ठरलेला मंकीपॉक्स

मंकीपॉक्स हा वायरस ७८पेक्षा अधिक देशांमधे पसरलाय. जगभरात २० हजारापेक्षा अधिक पेशंट आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला 'जागतिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केलंय. भारतातही मंकीपॉक्सचे पेशंट आढळलेत. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात.
संपूर्ण लेख

डॉ. अनिल मेनन: नासाच्या महत्वाकांक्षी मोहिमेत भारतीय वंशाचा चेहरा

नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी…
संपूर्ण लेख

बिनव्याजी कर्ज देणारी केरळची ट्री बँक योजना

हवामान बदलाचा फटका अख्खं जग अनुभतंय. त्यातून सावरण्यासाठी केरळचे माजी अर्थमंत्री टीएम थॉमस यांनी 'ट्री बँक' नावाची योजना आणली होती. झाडं लावण्याच्या बदल्यात बिनव्याजी कर्ज देणाऱ्या या योजनाला आता मूर्त रूप मिळालंय. ट्री बँक उत्सुकतेचा, चर्चेचा विषय ठरतेय. झाडं लावणं ती जगवणं आणि रोजगारासोबत कार्बन उत्सर्जन कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
संपूर्ण लेख

केरळच्या ओणमचा धडा महाराष्ट्र घेणार का?

गेल्या वर्षीच्या केरळमधल्या ओणम सणानंतर तिथं कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ झाली होती. याहीवर्षी केरळनं तोच अनुभव घेतलाय. महाराष्ट्रातही उत्सवांचा हंगाम सुरू होतोय. ओणमनंतर केरळला ठेच लागलीय. त्यातून महाराष्ट्रानं शहाणं होणं अपेक्षित आहे. येणार्‍या लहान-मोठ्या लाटेला आपण जबाबदार असू नये, एवढी तरी जबाबदारी आपल्याला उचलायला हवी. उत्सव साजरे करताना विवेकाचं भान ठेवायला हवं.
संपूर्ण लेख

डॉ. पीके वॉरियर: विज्ञानाची जोड देत त्यांनी आयुर्वेदाला आधुनिक बनवलं

जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. पीके वॉरियर यांचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालंय. वयाची शंभरी गाठलेल्या वॉरियर यांनी केरळच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीला जगभर पोचवलं. आयुर्वेद आणि एलोपॅथी यांच्यात समन्वय साधत आयुर्वेदाला विज्ञान आणि आधुनिकतेची जोड देण्याचं श्रेय त्यांना जातं. लाखो लोकांवर त्यांनी उपचार केले. यात जसे बडे राजकीय नेते होते तसेच सर्वसामान्य लोकही होते.
संपूर्ण लेख

राज्यांमधल्या पर्यायी नेतृत्वांमुळे देशाचं राजकारण बदलेल?

देशातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. आसाममधे भाजप तर पुदूचेरीत एनडीएचं सरकार आलंय. लोकांच्या राजकारणाचं नेतृत्व पश्‍चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू यांनी प्रादेशिक पक्षांकडे आणि प्रादेशिक नेत्यांकडे वळवलंय. यामुळे या निवडणुकीतून नरेंद्र मोदी, अमित शहा विरूद्ध प्रादेशिक नेतृत्व असा एक नवीन प्रवाह पुढे आला. त्याची सुरवात गेल्या दशकात झाली होती.
संपूर्ण लेख

निवडणुकीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमुळे कोरोनाचं फावलं?

फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी  वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. 
संपूर्ण लेख

केरळ: सत्तांतराच्या ट्रेंडचं काय होणार?

गेली चार दशकं केरळमधे डाव्यांच्या एलडीएफ आणि काँग्रेस नेतृत्वातल्या यूडीएफ आघाडीकडे सत्तेच्या चाव्या राहिल्यात. २०१६ मधे पहिल्यांदा तिथं भाजपने एक जागा जिंकली. मतांची टक्केवारी वाढल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला. सीवोटरच्या सर्वेनुसार, केरळमधे पुन्हा एकदा एलडीएफचं सरकार येण्याचा अंदाज आहे. तसं झालं तर गेली चार दशकं दोन बाजूने झुकणारा ट्रेंड यावेळी मोडीत निघेल. 
संपूर्ण लेख

चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे.