संपूर्ण लेख

केशवराव जेधे चरित्र: एका संघर्ष नायकाची चरित्रगाथा

२०२१ हे देशभक्त केशवराव जेधे यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने पुण्यात य. दि. फडके लिखित 'केशवराव जेधे चरित्र' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. पंचवीस वर्ष हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. त्यासाठी केशवराव जेधे फाउंडेशननं पुढाकार घेतला. या पुस्तकाला राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

केशवराव जेधे: शेतकरी-कामगारांचा बुलंद आवाज

देशभक्त केशवराव जेधे यांची आज १२५ वी जयंती. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला नवी सुयोग्य दिशा देण्याचं काम केशवराव जेधेंनी सलग ४० वर्ष केलं. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे ‘बहुजन हिताय’ धोरण जपणारे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहेच; पण अस्पृश्यता निर्मूलन तसंच शेतकरी, कामगारांसाठी त्यांनी केलेलं कामही तितकंच महत्वाचं आहे.