संपूर्ण लेख

एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस

अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं.