काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या पत्रकारांसाठी ‘एचएमवी’ म्हणजेच ‘हिज मास्टर्स वॉइस’ असा शब्द वापरला. याधीही…
देवेंद्र फडणवीस हेच आजच्या महाराष्ट्रातलं खरे किंगमेकर आहेत हे महिनाभरातल्या घडामोडींवरून सिद्ध झालंय. देवेंद्र फडणवीस ही एक व्यक्ती आहे, त्याबरोबरच ते एक राजकीय प्रारूपही आहे. हे राजकीय प्रारूप समजून घेतलं, तर सत्तांतर का झालं? ते समजून येतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सत्ता का दिली? यांची कारणंही समजून घेता येतात.
महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावं असं काही नाही, पण या पक्षाला उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असं त्यांना अभिमानानं मिरवायचं असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचं असेल तर ते त्यांचं समाधान मात्र कुणालाही हिरावून घेता येणार नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर चौदा ट्विटची मालिका सादर केली. राज ठाकरेंच्या हातात हात घालून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य जितकं बिघडवता येईल तितकं बिघडवण्याचा विडा फडणवीसांनी उचललाय असं दिसतं. त्यामुळेच फडणवीसांच्या या ट्विटरहल्ल्याची दखल घेणं भाग पडतं.
नवाब मलिक यांच्यावर लावलेले आरोप गंभीर आहेत आणि त्यातल्या अनेक आरोपांसंदर्भात मलिक यांनी यापूर्वी तपशीलवार स्पष्टीकरण दिलंय. तरीसुद्धा कारवाई झाली. आमच्याविरुद्ध बोलाल तर तुमची अशीच गत होईल, असा इशाराच जणू केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिलाय. यामागची क्रोनॉलॉजी समजावून सांगणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. आपल्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रश्नांवरून त्यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी धारेवर धरलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजप पुणे शहर चिटणीस यांनी त्यांच्या कामाचा घेतलेला वेध.
सध्या भाजप काहीही करून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतंय. आश्चर्य वाटावं इतका उतावीळपणा त्यातून दिसतोय. उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यांमुळे संघाची ताकदही नव्या दमाने फडणवीसांच्या मागे उभी राहतेय. त्यातून परमबीर सिंह, रश्मी शुक्ला अशी प्रशासनातली मंडळी उघडपणे सरसावलीयत. हेच सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरही घडणार आहे.