संपूर्ण लेख

दीडशे वर्षानंतरही धावतेय भारतातली पहिली ट्राम

कधीकाळी भारतातल्या काही ठराविक शहरांमधे ट्राम हेच सर्वसामान्यांचं प्रवासाचं साधन होतं. पण कालौघात या ट्राम बंद पडल्या. १८७३ला…
संपूर्ण लेख

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल

पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.
संपूर्ण लेख

झुलन गोस्वामी: बंगालची तुफान एक्स्प्रेस

भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मॅच मिळून सहाशे गडी बाद करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. महिलांच्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे दोनशे विकेट घेणारी जगातली पहिली बॉलर होण्याचा मान तिला मिळालाय. ताशी १२० किलोमीटर वेगाने चेंडू टाकणार्‍या मोजक्या महिला बॉलरमधे तिचा समावेश होतो. एका जिद्दी बॉलरची ही कहाणी.
संपूर्ण लेख

नारायण राणे- मुख्यमंत्री ठाकरे वाद: महाराष्ट्र बंगालच्या वाटेवर?

महाराष्ट्रामधे राजकीय कार्यसंस्कृती आहे. ती धोक्यात आणण्याचे प्रयत्न झुंडगिरीने झाले, तरी राज्यातल्या माणसाने या प्रवृत्तींना कधीच थारा दिलेला नाही. अनेक संकटं झेलत हे राज्य प्रगतिपथावर राहिलं. ते पश्‍चिम बंगालच्या वाटेवर नेलं जाण्याचा धोका मात्र कायम आहे. या सगळ्या राजकीय वितंडवादात राज्यासमोरच्या मूळ प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होणं राज्याच्या हिताचं नाही.
संपूर्ण लेख

मुकुल रॉय यांच्या घरवापसीच्या निमित्ताने

भारतीय लोकशाहीला पक्षांतरं आणि त्यानंतर होणारी घरवापसी काही नवीन उरलेली नाही. पश्चिम बंगालमधे मुकुल रॉय यांची घरवापसी हा या पक्षांतराच्या संपन्न परंपरेतला एक छोटा पण निश्चितच दखल घेण्यासारखा विषय. पण एकूणच या उबगवाण्या पक्षांतरांमुळे भारतीय राजकारणाचा पोत दिवसेंदिवस खालावू लागलाय. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा आत्मा ओंगळ होत चाललाय.
संपूर्ण लेख

मोदी-शहांच्या विखारी राजकारणाला हरवता येऊ शकतं

पश्चिम बंगालमधली निवडणुकीची रणधुमाळी विशेष ठरली. एकीकडे ममता बॅनर्जी तर दुसरीकडे त्यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेली मोदी-शहा जोडगोळी. या जोडीच्या विखारी प्रचाराला बंगाली जनतेनं चपराक दिली. कशी ते सांगतायत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा. न्यूयॉर्क टाइम्समधे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाची अनंत घोटगाळकर यांनी अनुवादित केलेली ही फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

पाच पोलचा पाच पाच पॉइंटमधला पंचनामा

निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.
संपूर्ण लेख

प्रशांत किशोर : मोदींना निवडणुकांत सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

राजकीय पक्षाच्या बाहेरही पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट नावाची एक जमात असू शकते, हे भारताला पहिल्यांदा सांगितलं ते प्रशांत किशोर यांनी. त्यांच्यामुळेच आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी प्रोफेशनल नेमले जातात. ते या क्षेत्रातला सर्वात मोठा ब्रँड आहे. बंगाल आणि तामिळनाडूमधल्या विजयाने तो ब्रँड आणखी मोठा झालाय.
संपूर्ण लेख

राज्यांमधल्या पर्यायी नेतृत्वांमुळे देशाचं राजकारण बदलेल?

देशातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. आसाममधे भाजप तर पुदूचेरीत एनडीएचं सरकार आलंय. लोकांच्या राजकारणाचं नेतृत्व पश्‍चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू यांनी प्रादेशिक पक्षांकडे आणि प्रादेशिक नेत्यांकडे वळवलंय. यामुळे या निवडणुकीतून नरेंद्र मोदी, अमित शहा विरूद्ध प्रादेशिक नेतृत्व असा एक नवीन प्रवाह पुढे आला. त्याची सुरवात गेल्या दशकात झाली होती.
संपूर्ण लेख

निवडणुकीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमुळे कोरोनाचं फावलं?

फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी  वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत.