संपूर्ण लेख

परतीच्या पावसाने खरीप हंगाम संकटात

परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणापासून विदर्भापर्यंत सपाटा लावलाय. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद अशा…
संपूर्ण लेख

या पाच गोष्टी करा आणि पावसाळी आजारांना दूर पळवा

पाऊस विविध दृष्टीने आनंद घेऊन येतो खरा, पण सोबत आजारपण घेऊन येतो. हे वाक्य टिवीवरच्या जाहिरातीप्रमाणे वाटत असलं, तरी सत्य आहे. आजारपण आलं की इम्युनिटी कमी होते. आजारपणांची रीघ लागते. घसा खवखवणं, सर्दी, खोकला यांनी सुरवात होत पुढे मजल डेंग्यू, मलेरीया, गॅस्ट्रो, कावीळपर्यंत जाते. या सगळ्याला वेळीच आवर घालण्यासाठी आपण घरगुती उपाययोजना करू शकतो.
संपूर्ण लेख

पावसाचे निसर्ग संकेत चकवा का देतायत?

साधारण पन्नास वर्षांपूर्वी सात जूनला पाऊस येणार, असं ठरलेलं असायचं. आज पाऊस पडतो. पूर्वीइतकाच पडतो. पण तो कुठं, किती आणि केव्हा पडणार, हे नेमकं सांगता येणं कठीण झालंय. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं दुरावलेलं आहे. झाडं, पशू, पक्षी यांनी ते आजही घट्ट जपलंय. त्यामुळे निसर्गातल्या बदलांबद्दल हे घटक माणसापेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्याप्रमाणे ते व्यक्त होतात. माणसाला ते समजून येत नाही.
संपूर्ण लेख

तळीयेचा संजीवन तळतळाट काय सांगतोय?

तळीयेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माणसांचे मृतदेह ४ दिवसानंतरही सापडले नाहीत तेव्हा त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं. सध्याची परिस्थिती पाहता बेपत्तांच्या नातेवाईकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना संत ज्ञानेश्वरांसारखी 'संजीवन समाधी' देणं सोयीचं वाटलं असावं. पण अशा सोयीस्कर आणि व्यावहारिक भूमिकेमुळे सरकारचं फावतं. वारसांना मदतीचे चेक दिले की शासनाच्या जबाबदारीचं सुतक सुटतं.
संपूर्ण लेख

पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?

अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.
संपूर्ण लेख

पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.
संपूर्ण लेख

आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?

आज जागतिक जल दिन. एचटूओ हा पाण्याचा केमिकल लोच्या सांगणारा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांनाच माहितीय. पण पाणी म्हणजे त्या पलिकडे भरपूर काही असतं. वेदांपासून डार्विनपर्यंत सगळ्यांनीच पाण्याची थोरवी गायलीय. आईच्या पोटातल्या पाण्यामुळंच आपल्या जन्म झालाय. हे सगळं आपल्याला माहीत असतानाही आपण दरवर्षी पाण्याचा दिवस का साजरा करतो?
lock
संपूर्ण लेख

वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल

साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.
lock
संपूर्ण लेख

पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच

यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?
lock
संपूर्ण लेख

कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.