संपूर्ण लेख

मानव गुरू चंद्रशेखर यांना स्वत:चा मृत्यू का समजला नाही?

वास्तूशास्त्र पंडित चंद्रशेखर अंगडी यांचा कर्नाटकातल्या हूबळी इथं चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यांचा 'सरल वास्तू' हा कार्यक्रम प्रसिद्ध होता. 'मानव गुरू' म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. 'मानव गुरूजीच्या दिव्य ज्ञानाचं ज्ञानपीठ' हा त्यांचा कार्यक्रम जोरात चालू होता. आपण विश्व शक्तीच्या संपर्कात असल्याचं, दिव्यज्ञानी असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या हत्येने काही प्रश्न उभे राहतायत.