संपूर्ण लेख

अमीर खुसरो, बहिणाबाई आणि शेतकरी

अमीर खुसरो हा मध्ययुगीन काळातला एक महत्वाचा कवी, कलावंत होता. भारतीय संस्कृतीची पालखी आपल्या खांद्यावर घेतलेला खुसरो हिंदू-मुस्लिम…
संपूर्ण लेख

कळल्यावरी कुठे कशास्तव, मरणे सोपे रे ध्येयास्तव

आमच्या सामाजिक सलोखा अभियानाला अचानक चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित नसतानाही एका निवडक प्रतिनिधींच्या सभेला मुंबईचे पोलीस आयुक्त आले. आमच्या अभियानाच्या पुढच्या टप्प्याला गती आली. पण हे दखल घ्यायचे मापदंड फसवे आहेत. उद्या परत एकटं फिरावं लागेल. लोकांना आपल्यालाच गोळा करावं लागेल हे मनात पक्कं असायला हवं.
संपूर्ण लेख

हिंदुत्ववाद बहुसंख्य हिंदूंना फक्त अल्पसंख्यगंड देतो

हिंदुत्ववादी विचारसणीच्या अंमलबजावणीमुळे अल्पकालीन पातळीवर भारतीय मुस्लिम गंभीररीत्या दुखावले जातील. याची सुरवात झालीच आहे. पण, दीर्घकालीन पातळीवर हिंदूंनाही ही गोष्ट त्रस्त करत राहील. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखाचा साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेला अनुवादित अंश इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

हिंदू अल्पसंख्याकांचं नेमकं काय म्हणणं आहे?

देशात हिंदू बहुसंख्य आहेत, यात वादच नाही. पण ज्या ठिकाणी ते धर्म किंवा भाषेच्या निकषानुसार अल्पसंख्य आहेत, तिथं त्यांची ससेहोलपट होता कामा नये. भाजप नेते आणि प्रसिद्ध वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी या विषयाला वाचा फोडताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. प्रत्यक्षातलं चित्र याच्या विरुद्ध आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन किंवा आदेश क्रांतिकारी ठरणार आहे.
संपूर्ण लेख

राष्ट्रपिता महात्मा गांधी सन्मान कायद्याची गरज!

महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं.
संपूर्ण लेख

नाही धर्मी, नाही अधर्मी असं म्हणणाऱ्या कबीर-रविदासांचं काय करायचं?

संत कबीर आणि संत रविदास यांनी आपण धार्मिक नाही आणि अधार्मिकही नाही असं स्पष्ट म्हटलंय. त्यांनी कधीही कोणत्याही धर्मांचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. अनेकदा धर्मातल्या गोष्टींवर टीका केली. असं असलं तरी ते अधार्मिक या पठडीत मोडतील असंही नाही. मग त्यांच्या कार्याचं मूल्यमापन कोणत्या परिभाषेत करता येईल?
संपूर्ण लेख

चार्वाक: शाश्वत जीवनमूल्यांच्या दिशेनं घेऊन जाणारं पुस्तक

प्रा. सुरेश द्वादशीवार यांचं ‘चार्वाक’हे पुस्तक साधना प्रकाशनाने नुकतंच प्रकाशित केलंय. आधुनिक मानवी जीवनाच्या विचारविश्वाला व्यापलेल्या कळीच्या प्रश्नाला द्वादशीवार यांनी पुस्तकात हात घातलाय. द्वादशीवार यांचा ‘चार्वाक’ वाचताना ताज्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांसह प्राचीन-पौराणिक-ऐतिहासिक घडामोडींचा एक विशाल पट धावत्या सिनेमासारखा आपल्या डोळ्यासमोर येतो.
संपूर्ण लेख

म्हशीचे कबाब खाणारा लहानपणीचा मित्र गोरक्षक बनला

लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.
संपूर्ण लेख

बुद्धांच्या मार्गाने जाणारे विवेकानंद आपल्याला माहीत आहेत का?

आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांची जयंती. हिंदू अभिमानी लोकांनी आजवर विवेकानंदांना हिंदू धर्माचा प्रेषित अशा अवतारात पुढे आणलं. पण खरं म्हणजे विवेकानंदांचं सगळं आयुष्य बुद्धमय झालं होतं. या देशाच्या विकासासाठीही ते बुद्धांना कारणीभूत मानत होते. विवेकानंदांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल किती पराकोटीची आदरभावना होती याची ही छोटीशी झलक.
संपूर्ण लेख

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

चीता, मेहरात आणि काठात हे एकच वैशिष्ट्य असणारे तीन समुदाय राजस्थानातल्या अजमेर, भीलवाडा, पाली आणि राजसमंद या जिल्ह्यात पसरलेत. या समुदायातले एकाचवेळी हिंदू असतात आणि मुसलमानही. दोन्हीकडचे सण आपले म्हणून हे लोक साजरे करतात. पण आता आधुनिक काळाने, खरं म्हणजे साचेबंद समाजाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे करायला सुरवात केलीय. त्यांच्या या प्रश्नातून आपण त्यांना बाहेर काढू शकू?