संपूर्ण लेख

निवडणूक प्रचाराचा नवा पॅटर्न आभासी दुनियेतली लोकशाही

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी केवळ वर्च्युअल प्रचार मोहिमा राबवायला परवानगी देण्यात आली. पण ज्या प्रकारे संसर्ग पसरतोय ते पाहता, संपूर्ण निवडणूकच वर्च्युअल मोडवर होईल, असं दिसतं. पाश्‍चात्त्य देशांमधे निवडणुकांमधे सोशल मीडियाचा आधार पूर्णपणे घेतला जातो. पण पूर्णपणे वर्च्युअल प्रचार मोहीम कुठेही चालवली जात नाही.
संपूर्ण लेख

समतेशी करार : जात संपवण्यासाठी आपण, समाजाने आणि सरकारने काय करायचं?

मधु कांबळेंच्या लोकसत्तेतल्या अलिकडच्या काही लेखांचं ‘समतेशी करार-समाजमंथन’ हे पुस्तक या वर्षी प्रसिद्ध झालंय. यातले लेख सुटे असले तरी एकप्रकारे सलग जातव्यवस्था हा विषय उलगडणारी ती प्रकरणं आहेत. जातव्यवस्थेच्या निर्मूलनाला वर्तमानात भिडताना कांबळेंनी मांडलेल्या काही सुत्रांकडे लक्ष वेधत पुस्तकाचा परिचय करून देणारा ‘आंदोलन’ मासिकाच्या ताज्या अंकातला हा लेख.
संपूर्ण लेख

तिसऱ्या आघाडीची बिकट वहिवाट

लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्‍लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही.
संपूर्ण लेख

उत्तर प्रदेशमधे भाजपची कोंडी?

अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
संपूर्ण लेख

इस्रायलमधलं सत्तांतर जगभरातल्या राजकीय पर्यायांची नांदी ठरेल?

इस्रायलमधे बेंजामिन नेतान्याहू यांच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागताना दिसतोय. अशावेळी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर नेतान्याहू यांची सद्दी संपेल. हे सत्तांतर खरंच टिकलं तर त्याचे अनेक दूरगामी परिणाम दिसून येतील. त्यामुळे मागच्या दशकात जागतिक राजकारणात तयार झालेल्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या धोरणांना लगाम बसू शकतो.
संपूर्ण लेख

पाच पोलचा पाच पाच पॉइंटमधला पंचनामा

निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.
संपूर्ण लेख

निवडणुकीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमुळे कोरोनाचं फावलं?

फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी  वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. 
संपूर्ण लेख

मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल

पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे.
संपूर्ण लेख

ग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल

साठीच्या दशकात ग्रामपंचायत निवडणुकांत हिंदुत्व परिघावर होतं. यावेळी झालेल्या निवडणुकांमधेही तेच दिसलं. गावागावांत आणि वाडी वस्तीवर हिंदुत्व हाच मुद्दा आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रकर्षाने ऐरणीवर आला. ग्रामपंचायतीला राजकीय पक्षांच्या छताखाली आणण्याचे कित्येक वर्षांपासून चालू असलेले प्रयत्न यावेळी सफल झाले. इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे ही क्रांती झालली दिसते.