संपूर्ण लेख

कर्नाटकातल्या अलमट्टीमुळे महाराष्ट्रातल्या गावांना धोका

कर्नाटकातल्या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवावी, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी…
संपूर्ण लेख

पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?

अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.
संपूर्ण लेख

पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.
lock
संपूर्ण लेख

वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल

साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.
lock
संपूर्ण लेख

पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच

यंदा पाऊस काही आपली पाठ सोडत नाहीय. निसर्गाचा आपल्याला शिक्षा देण्याचा बेत असल्याचं दिसून येतंय. नुकतंच पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने जोरदार सुरवात केली. आणि शेवट अनेकांचे बळी घेऊन केला. कधी स्वप्नातही आपण विचार करणार नाही एवढा पाऊस पडतोय. हे सगळं का घडतंय?
lock
संपूर्ण लेख

कोल्हापूरसाठी धावणारे आपण गडचिरोलीच्या पुराकडे दुर्लक्ष का करतो?

कोल्हापूर-सांगली परिसरात पूर आला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवताना आपण गडचिरोलीला मात्र विसरलोय. या एकाच जिल्ह्यात यावर्षी आत्तापर्यंत जवळपास सात वेळा महापूर येऊन गेलाय. २०० गावं आजही पाण्याखाली आहेत. तरीही पुरेशी मदत तिथपर्यंत पोचवण्यास सरकार आणि आपण अपयशी ठरलोत.
lock
संपूर्ण लेख

सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?

सांगली, कोल्हापूरच्या महापुरानं लोकांचं जगणं विस्कळीत केलं. त्यानंतर हा महापूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित यावर चर्चाही झाली. याच विषयावर भुजलतज्ञ उपेंद्र धोंडे यांच्याशी मयूर बागूल यांनी संवाद साधलाय. त्या संवादाचा हा संपादित अंश.
lock
संपूर्ण लेख

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

सध्या महाराष्ट्रातले काही जिल्हे महापुराचा सामना करताहेत. यात जीवतहानी, मालमत्तेची हानी होतेय. मोठ्या कष्टाने घेतलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान होतंय. पण बेसिक विम्यात या नुकसानीची भरपाई मिळत नाही. त्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव विमा उतरवावा लागतो.
lock
संपूर्ण लेख

आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?

कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.
lock
संपूर्ण लेख

गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

गेल्या दहा दिवस पुराने सांगली, कोल्हापूरला वेढा घातलाय. सरकारच्या बेफिकीरीमुळे पुरस्थितीकडे राज्य प्रशासनाने दुर्लक्ष केलं. स्थानिक प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावरच आपत्ती निवारणाचं काम सुरू ठेवावं लागलं. आता पावसाचा जोर कमी झालाय. तरी पुरपरिस्थिती काही निवळताना दिसत नाही.