संपूर्ण लेख

भारतीय महिला क्रिकेटला गरज नव्या टीम इंडियाची

भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्‍या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.