संपूर्ण लेख

दंगलीत जातधर्म नाही, तर ‘माणुसकी’ मारली जातेय!

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला, छत्रपती शाहूंचा पुरोगामित्वाचा वारसा जोपासणारा, छत्रपती प्रतापसिंह महाराजांची विचारधारा घेऊन पुढे जाणारा, शाह-फुले-आंबेडकर…
संपूर्ण लेख

वडिलांनी कर्ज काढलं, त्याचं आदितीनं सोनं केलं!

अपार मेहनत, जिद्द आणि एकाग्रता असा त्रिवेणी संगम असला की, मग यश तुमच्या पायाशी लोळण घेते. सातार्‍याच्या सतरा…
संपूर्ण लेख

अजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात ‘ईडी’ची एण्ट्री

साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखान्याची जागा ईडीनं जप्त केलीय. या कारखान्याचे मालक हे अजित पवार यांचे मामा आहे. त्यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही जागा ताब्यात घेत असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. पण खरंतर, अजित पवार ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळायला तयार नाहीत, याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय.
संपूर्ण लेख

कांताबाई सातारकर: तमाशा जगणाऱ्या आणि जपणाऱ्या कलावंत 

तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

हातावर पोट असणारे मजूर दोन वेळच्या जेवणासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत. पोलिस टू व्हिलरवाल्या मवाल्यांच्या ढुंगणांवर फटके देतात. पण घोटाळेबाज वाधवान कुटुंब मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमधे मुंबईहून महाबळेश्वरला येतात. गृहखात्यातला बडा अधिकारी अमिताभ गुप्ता त्यांना परवानगीचं पत्र देतो. पण सातारा जिल्हा या वाधवानच्या नोटांच्या पुडक्यासमोर न झुकता आपला हिसका दाखवतो, हे कौतुकास्पद आहे.
lock
संपूर्ण लेख

संचारबंदीतही साताऱ्यात सर्वधर्म भाईचारा सभा झाली, कारण

साताऱ्यात पुरोगामी विचाराच्या संस्थांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त १० नोव्हेंबरला सर्वधर्म भाईचारा सभा घेतली. बाबरी मशीद निकालामुळे देशभरात कुठंही जाहीर सभा घ्यायला बंदी होती. असं असताना साताऱ्यात सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.
lock
संपूर्ण लेख

सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.
lock
संपूर्ण लेख

शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

साताऱ्याच्या जिल्हा परिषद मैदानावर शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. आणि बघताबघता सोशल मीडियासोबतच सगळे न्यूज चॅनेल्स ‘पवारमय’ झाले. या वातावरणात अनेक तरुण नव्यानेच पवारांकडे आकर्षित झाल्याचं बघायला मिळालं. दुसरीकडे भाजपच्या सभेला तुरळक गर्दी दिसून येतेय.