कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत.
कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत......
नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा.
नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा......