माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय.
माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय......
चांद्रयान-३ मोहीमेनंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. आदित्य-एल१’ हा उपग्रह पीएसएलव्ही अग्नीबाणावरून अवकाशात झेप घेईल. हा उपग्रह सूर्याच्या जवळ जाणार नाही, तर चार महिने प्रवास करून पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावरील ’एल१’ या बिंदूपाशी जाईल. तो भारताची अवकाशातील प्रयोगशाळा असेल. तिच्या मदतीनं आपला सूर्याचा अभ्यास सुरू होईल.
चांद्रयान-३ मोहीमेनंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. आदित्य-एल१’ हा उपग्रह पीएसएलव्ही अग्नीबाणावरून अवकाशात झेप घेईल. हा उपग्रह सूर्याच्या जवळ जाणार नाही, तर चार महिने प्रवास करून पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावरील ’एल१’ या बिंदूपाशी जाईल. तो भारताची अवकाशातील प्रयोगशाळा असेल. तिच्या मदतीनं आपला सूर्याचा अभ्यास सुरू होईल......