लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. .....
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेरमधे डोळ्यासमोर पक्षावर संकट येताना पाहिलं. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदाराला लाथाबुक्क्यांनी मारताहेत. कार्यकर्ते थेट महाजनांच्या अंगावर धावून येत आहेत. महाजन त्यांना ढकलत आहेत. कार्यकर्ते चप्पल काढूनही मारत आहेत. भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा इतका भयंकर उद्रेक का झाला असेल?.....