logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
मोदींवरची बीबीसीची डॉक्युमेंट्री ब्लॉक का केली गेली?
सम्यक पवार
२३ जानेवारी २०२३
वाचन वेळ : ५ मिनिटं

नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे.


Card image cap
मोदींवरची बीबीसीची डॉक्युमेंट्री ब्लॉक का केली गेली?
सम्यक पवार
२३ जानेवारी २०२३

नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडणारी बीबीसीची डॉक्युमेंट्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरली आहे. ही डॉक्युमेंट्री भारतात कुणाला पाहता येऊ नये, म्हणून तिच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्यात. तिच्यासंदर्भातले ट्विट्सही ब्लॉक केले गेलेत. पण, आपण आपलं काम चोख केलंय, असं 'बीबीसी'चं म्हणणं आहे......


Card image cap
अब्बासला सांभाळणारी मोदींची आई... हिराबा!
सीमा बिडकर
३१ डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचं ३० डिसेंबरला वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या आईच्या आठवणी सांगणारा लेख लिहिलाय. त्यात त्यांनी आपल्या आईनं अब्बास नावाच्या मुस्लिम मुलाला स्वतःच्या घरी कसं सांभाळलं त्याचं हृद्य वर्णन केलंय. आज देशात धार्मिक भेदभाव वाढत असताना, मोदींच्या आईंची ही आठवण दिलासा देणारी आणि अनुकरणीय आहे.


Card image cap
अब्बासला सांभाळणारी मोदींची आई... हिराबा!
सीमा बिडकर
३१ डिसेंबर २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचं ३० डिसेंबरला वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या आईच्या आठवणी सांगणारा लेख लिहिलाय. त्यात त्यांनी आपल्या आईनं अब्बास नावाच्या मुस्लिम मुलाला स्वतःच्या घरी कसं सांभाळलं त्याचं हृद्य वर्णन केलंय. आज देशात धार्मिक भेदभाव वाढत असताना, मोदींच्या आईंची ही आठवण दिलासा देणारी आणि अनुकरणीय आहे......


Card image cap
गुजरातमधे काँग्रेस बॅकफूटवर का गेली?
डॉ. प्रकाश पवार
१० डिसेंबर २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधे भाजपने अपेक्षित यश मिळवलंय. यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला. काँग्रेस पक्षाला गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालंय. एवढी दारुण अवस्था या पक्षाची कधीच झाली नव्हती. काँग्रेस पक्ष सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेनं झपाटल्याचं गुजरातमधे एकदाही दिसलं नाही. त्यामुळेच हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं अपयश आहे, असं म्हणता येतं.


Card image cap
गुजरातमधे काँग्रेस बॅकफूटवर का गेली?
डॉ. प्रकाश पवार
१० डिसेंबर २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधे भाजपने अपेक्षित यश मिळवलंय. यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला. काँग्रेस पक्षाला गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालंय. एवढी दारुण अवस्था या पक्षाची कधीच झाली नव्हती. काँग्रेस पक्ष सत्ता मिळवण्याच्या स्पर्धेनं झपाटल्याचं गुजरातमधे एकदाही दिसलं नाही. त्यामुळेच हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं अपयश आहे, असं म्हणता येतं......


Card image cap
गुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत?
विनिता शाह
३० नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ६ मिनिटं

पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा अभेद्य बालेकिल्ला असणार्‍या गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच मतदान होतंय. मोदी पंतप्रधान बनल्यापासून गुजरातमधला भाजपचा प्रभाव वाढत चाललाय. काँग्रेस यंदा लढाईपूर्वीच शस्त्रे टाकल्याच्या स्थितीत आहे. ही पोकळी सांधण्याचं काम आम आदमी पक्ष करेल, असं सध्याचं चित्र आहे. गुजरातचे निकाल हे जनतेमधला ‘अंडरकरंट’ स्पष्ट करतील यात शंकाच नाही.


Card image cap
गुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत?
विनिता शाह
३० नोव्हेंबर २०२२

पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा अभेद्य बालेकिल्ला असणार्‍या गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच मतदान होतंय. मोदी पंतप्रधान बनल्यापासून गुजरातमधला भाजपचा प्रभाव वाढत चाललाय. काँग्रेस यंदा लढाईपूर्वीच शस्त्रे टाकल्याच्या स्थितीत आहे. ही पोकळी सांधण्याचं काम आम आदमी पक्ष करेल, असं सध्याचं चित्र आहे. गुजरातचे निकाल हे जनतेमधला ‘अंडरकरंट’ स्पष्ट करतील यात शंकाच नाही......


Card image cap
हिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का?
अक्षय शारदा शरद
२७ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ७ मिनिटं

भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.


Card image cap
हिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का?
अक्षय शारदा शरद
२७ नोव्हेंबर २०२२

भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमधे निवडणूक ऐन तोंडावर आलीय. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलाच घाम फोडला होता. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या एण्ट्रीनं काँग्रेसचं टेंशन वाढवलंय. त्यामुळे मोदी-शहांच्या कर्मभूमी गुजरातमधे यंदा महागाई, बेकारी हे मुद्दे चालणार की, हिंदुत्वाचं मॉडेल भाजपला तारणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय......


Card image cap
महाराष्ट्रातल्या प्रोजेक्टची विमानं गुजरात का पळवतंय?
अक्षय शारदा शरद
०१ नोव्हेंबर २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय.


Card image cap
महाराष्ट्रातल्या प्रोजेक्टची विमानं गुजरात का पळवतंय?
अक्षय शारदा शरद
०१ नोव्हेंबर २०२२

वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअरबस असे महाराष्ट्रात येऊ घातलेले तीन प्रोजेक्ट गुजरातला गेलेत. हा प्रोजेक्ट पळवापळवीचा खेळ काही सहजपणे झालेला नाही. गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खेळी खेळली गेलीय. त्यात महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला हाताशी धरुन महाराष्ट्राचं महत्व कमी करायचा घाट घातला गेलाय......


Card image cap
बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना सोडल्यामुळे चुकीचा पायंडा पडलाय
अ‍ॅड. असीम सरोदे
२१ ऑगस्ट २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा.


Card image cap
बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना सोडल्यामुळे चुकीचा पायंडा पडलाय
अ‍ॅड. असीम सरोदे
२१ ऑगस्ट २०२२

बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या ११ दोषींची सुटका करण्यात आली आहे. केवळ चांगल्या वर्तणुकीच्या कारणामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत सवलती देताना, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि अन्यायग्रस्त व्यक्तींचा विचार प्राधान्याने होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा निर्णयाचे समाजमनावर काय परिणाम होऊ शकतात, याचाही विचार व्हायला हवा......


Card image cap
मीठ उद्योगात मिठाचा खडा कोण टाकतंय?
चंद्रशेखर पटवर्धन
२२ जुलै २०२२
वाचन वेळ : ४ मिनिटं

आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं.


Card image cap
मीठ उद्योगात मिठाचा खडा कोण टाकतंय?
चंद्रशेखर पटवर्धन
२२ जुलै २०२२

आज मीठ उत्पादक टनामागे २५० ते ३०० रुपये कमवतो. हंगामानुसार त्यात वाढ किंवा घट होते. कधी कधी उत्पादन खर्च निघणंही मुश्कील! एकट्या गुजरातमधे १२,८०० मीठ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यावर हजारो कामगार आणि कुटुंबं जगतात. पण समस्यारूपी ‘मिठाचा खडा’ या उद्योगाच्या विकासात अडथळा ठरतोय. केंद्र सरकारने यात वेळेवर लक्ष घातलं नाही तर देशाचं मीठ उत्पादनातलं स्थान धोक्यात येऊ शकतं......


Card image cap
हार्दिक पंड्या: भावी नेतृत्वाची पायाभरणी
मिलिंद ढमढेरे
०७ जून २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय.


Card image cap
हार्दिक पंड्या: भावी नेतृत्वाची पायाभरणी
मिलिंद ढमढेरे
०७ जून २०२२

भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या गुजरात टायटन टीमला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिकने बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलंय......


Card image cap
भारताच्या बँकिंग इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याची कुंडली
रवीश कुमार
१८ फेब्रुवारी २०२२
वाचन वेळ : ५ मिनिटं

गुजरातच्या एबीजी या शिपयार्ड कंपनीनं तब्बल २३ बँकांना चुना लावत २३ हजार कोटींचा घोटाळा केलाय. भारताच्या बँकिंग इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गुजरातच्या उद्योगपतींनी याआधीच बँकांना चुना लावून देशातून पळ काढलाय. त्यात एबीजी ग्रुपच्या ऋषी अग्रवाल यांची भर पडतेय. या घोटाळ्याची कुंडली मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन.


Card image cap
भारताच्या बँकिंग इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्याची कुंडली
रवीश कुमार
१८ फेब्रुवारी २०२२

गुजरातच्या एबीजी या शिपयार्ड कंपनीनं तब्बल २३ बँकांना चुना लावत २३ हजार कोटींचा घोटाळा केलाय. भारताच्या बँकिंग इतिहासातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गुजरातच्या उद्योगपतींनी याआधीच बँकांना चुना लावून देशातून पळ काढलाय. त्यात एबीजी ग्रुपच्या ऋषी अग्रवाल यांची भर पडतेय. या घोटाळ्याची कुंडली मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टचं हे शब्दांकन......


Card image cap
मुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर
भाऊसाहेब आजबे
२२ सप्टेंबर २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

उत्तराखंड आणि गुजरातमधल्या निष्प्रभ नेतृत्वाचा पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो हे लक्षात आल्यामुळे दोन्हीही ठिकाणी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय झालेला दिसतो. गुजरातमधे नवीन मुख्यमंत्री हे पाटीदार समाजाचे आहेत. भाजपवर नाराज पाटीदार समाजाला चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे.


Card image cap
मुख्यमंत्री बदलाच्या राजकारणामागे भाजपचं हाय कमांड कल्चर
भाऊसाहेब आजबे
२२ सप्टेंबर २०२१

उत्तराखंड आणि गुजरातमधल्या निष्प्रभ नेतृत्वाचा पुढच्या वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो हे लक्षात आल्यामुळे दोन्हीही ठिकाणी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय झालेला दिसतो. गुजरातमधे नवीन मुख्यमंत्री हे पाटीदार समाजाचे आहेत. भाजपवर नाराज पाटीदार समाजाला चुचकारण्याचा हा प्रयत्न आहे......


Card image cap
उत्तर प्रदेशमधे भाजपची कोंडी?
भाऊसाहेब आजबे
१५ जून २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.


Card image cap
उत्तर प्रदेशमधे भाजपची कोंडी?
भाऊसाहेब आजबे
१५ जून २०२१

अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय......


Card image cap
पीचचं कारण देत इंग्लंड रडीचा डाव का खेळतोय?
अनिरुद्ध संकपाळ
१९ मार्च २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

क्रिकेट हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व आहे. यात कधी बॅट वरचढ ठरते. तर कधी बॉल. पण, बॉल वरचढ ठरल्यानंतर पीचमधे दोष शोधणं हा रडीचा डाव आहे. भारतीय पीचवर भारत ‘दादा’ आहेच. पण आता तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक इतिहास असलेल्या पीचवरही आपली दादागिरी गाजवू लागलाय. त्यामुळे भारताची टेस्ट टीम इतर टीमच्या तुलनेत सरस वाटते.


Card image cap
पीचचं कारण देत इंग्लंड रडीचा डाव का खेळतोय?
अनिरुद्ध संकपाळ
१९ मार्च २०२१

क्रिकेट हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व आहे. यात कधी बॅट वरचढ ठरते. तर कधी बॉल. पण, बॉल वरचढ ठरल्यानंतर पीचमधे दोष शोधणं हा रडीचा डाव आहे. भारतीय पीचवर भारत ‘दादा’ आहेच. पण आता तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या आव्हानात्मक इतिहास असलेल्या पीचवरही आपली दादागिरी गाजवू लागलाय. त्यामुळे भारताची टेस्ट टीम इतर टीमच्या तुलनेत सरस वाटते......


Card image cap
‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद?
केतन वैद्य
१८ जानेवारी २०२१
वाचन वेळ : ६ मिनिटं

आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय.


Card image cap
‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद?
केतन वैद्य
१८ जानेवारी २०२१

आपल्या डीएनएत मराठीपण घेऊन मिरवणारी शिवसेना आता मुंबईतल्या गुजराती समाजावर राजकीय जाळं टाकतेय. पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ‘जलेबी अने फाफडा अने उद्धव ठाकरे आपडा’ अशी साद घातली जातेय. यामागचं कारण म्हणजे गुजराती समाजाचा मुंबईत वाढत असलेला प्रभाव. भाजपबरोबर युती तुटल्यापासून महानगरपालिकेतल्या जागा जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांची रुखरुख नक्कीच शिवसेनेला लागून राहिलीय......


Card image cap
मराठी गरबा का बंद झाला?
टीम कोलाज
२४ ऑक्टोबर २०२०
वाचन वेळ : ४ मिनिटं

नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.


Card image cap
मराठी गरबा का बंद झाला?
टीम कोलाज
२४ ऑक्टोबर २०२०

नवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो? काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय......


Card image cap
कुणी खुलेपणाने तर कुणी निनावी पण बोलतोय, गुजरात बोलू लागलाय
रवीश कुमार
३० मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

गुजरातमधला कोविड-१९ मृत्यूदर महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. मौन बाळगणं आपल्याच जीवावर बेतू शकतं, ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आलीय. अगोदर पत्रकारांनी सत्य समोर आणण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर लोक आपापसातच बोलू लागले. एका निवासी डॉक्टरनं हायकोर्टाला निनावी पत्र लिहिलं. आणि कोर्टानं त्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. राज्य सरकारला जागं करणाऱ्या, धारेवर धरणाऱ्या कोर्टाच्या बेंचमधेच बदल करण्यात आलाय.


Card image cap
कुणी खुलेपणाने तर कुणी निनावी पण बोलतोय, गुजरात बोलू लागलाय
रवीश कुमार
३० मे २०२०

गुजरातमधला कोविड-१९ मृत्यूदर महाराष्ट्राच्या दुप्पट आहे. मौन बाळगणं आपल्याच जीवावर बेतू शकतं, ही गोष्ट लोकांच्या ध्यानात आलीय. अगोदर पत्रकारांनी सत्य समोर आणण्याचं धाडस दाखवलं. त्यानंतर लोक आपापसातच बोलू लागले. एका निवासी डॉक्टरनं हायकोर्टाला निनावी पत्र लिहिलं. आणि कोर्टानं त्या पत्राची स्वतःहून दखल घेतली. राज्य सरकारला जागं करणाऱ्या, धारेवर धरणाऱ्या कोर्टाच्या बेंचमधेच बदल करण्यात आलाय......


Card image cap
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
रेणुका कल्पना
१४ मे २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?


Card image cap
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
रेणुका कल्पना
१४ मे २०२०

भारतात लॉकडाऊन शिथील करण्याची, मागं घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण लॉकडाऊन मागं घेताना सुपर स्प्रेडरला रोखणं हे एक मोठं आव्हान आहे. कारण कोरोनाग्रस्तापेक्षा सुपर स्प्रेडर व्यक्तिला रोखणं हे जगापुढचं नवं संकट आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तर असे ३३४ सुपर स्प्रेडर सापडलेत. आणि त्यामुळेच गुजरातची स्थिती महाराष्ट्राहून बिकट झालीय. सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून आपण काय करू शकतो?.....


Card image cap
महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
कुमार केतकर
०५ मे २०२०
वाचन वेळ : ८ मिनिटं

महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर.


Card image cap
महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
कुमार केतकर
०५ मे २०२०

महाराष्ट्राची निर्मिती फक्त भाषक अस्मितेतून झाल्याचं आजच्या पिढीला वाटतं. या गैरसमजाचं कारण या पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा लढा नीट माहीत नाही. हा संघर्ष प्रामुख्याने मुंबईतले अमराठी भांडवलदार आणि मराठी कामगार यांच्यातला होता. हा वर्गसंघर्ष होता. कष्टकऱ्यांचं राज्य व्हावं, म्हणून हा महाराष्ट्र निर्माण झालाय. `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेत आजची मांडणी करत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर......


Card image cap
आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!
रामचंद्र गुहा
२८ एप्रिल २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख.


Card image cap
आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!
रामचंद्र गुहा
२८ एप्रिल २०२०

नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख......


Card image cap
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
सदानंद घायाळ
२० मार्च २०२०
वाचन वेळ : ६ मिनिटं

कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?


Card image cap
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
सदानंद घायाळ
२० मार्च २०२०

कोरोना वायरसविरोधातल्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. तसंच जीव धोक्यात घालत कोरोनाविरोधात काम करणाऱ्यांसाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलंय. टाळ्या वाजवणं हे मुंबई, महाराष्ट्रासाठी नवं असलं तरी जनता कर्फ्यूशी मराठी माणसाचं अनोखं कनेक्शन आहे. मग टाळ्या वाजवण्याचं कनेक्शन कुणाशी आहे?.....


Card image cap
ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!
रेणुका कल्पना
२० फेब्रुवारी २०२०
वाचन वेळ : ५ मिनिटं

डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय.


Card image cap
ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!
रेणुका कल्पना
२० फेब्रुवारी २०२०

डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणाऱ्या एअर फोर्स वन या विमानाची सध्या जोरदार चर्चा सुरूय. उडतं ‘व्हाईट हाऊस’ असं या विमानाला म्हणलं जातं. राहण्यासाठी जागा, ऑफीस, कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुखसुविधा या विमानात आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जय्यत व्यवस्थाही आहे. त्यामुळेच अनेक राष्ट्राध्यक्षांचे जीव वाचवण्याचं काम या विमानाने केलंय......


Card image cap
गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?
संजीव पाध्ये
११ डिसेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज दत्तजयंती. अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी ऋषी अवतार घेतला आणि त्यातून दत्त गुरू अवतरले. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढल्यावर दत्त गुरुंच्या पावलांचं दर्शन होतं. पर्वत चढताना छोटी छोटी मंदिरं लागतात. एकदा पावलांचं दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन जातं. दत्त गुरुंवरच्या श्रद्धेतून संपूर्ण पर्वत चढण्याचं बळं मिळत असावं, असं वाटतं.


Card image cap
गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?
संजीव पाध्ये
११ डिसेंबर २०१९

आज दत्तजयंती. अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी ऋषी अवतार घेतला आणि त्यातून दत्त गुरू अवतरले. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढल्यावर दत्त गुरुंच्या पावलांचं दर्शन होतं. पर्वत चढताना छोटी छोटी मंदिरं लागतात. एकदा पावलांचं दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन जातं. दत्त गुरुंवरच्या श्रद्धेतून संपूर्ण पर्वत चढण्याचं बळं मिळत असावं, असं वाटतं......


Card image cap
स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका
सदानंद घायाळ
२६ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो.


Card image cap
स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका
सदानंद घायाळ
२६ ऑक्टोबर २०१९

ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ साधत फिफ्टी-फिफ्टीचा आग्रह धरलाय. भाजपचं सत्तेचं स्वप्न अधांतरी लटकलंय. पण सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत पीएचडी मिळवलीय. भाजपने सत्ता मिळवायची ठरवल्यास शिवसेनेला जोर का झटका बसू शकतो......


Card image cap
द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज
विनय उपासनी
२५ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय.


Card image cap
द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज
विनय उपासनी
२५ सप्टेंबर २०१९

दर दिवशी नवी वेब सिरीज येतेय. त्यात आणखी एक वेब सिरीज आलीय ती म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांवर बेतलीय. भारतात घातपात घडवून ‘तबाही’ माजवण्याची दिवास्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानला शह देणाऱ्या, त्यांचा कट उधळून लावणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचं अंतरंग या मालिकेत साकारलंय......


Card image cap
नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार
समीर मणियार
२७ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश.


Card image cap
नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार
समीर मणियार
२७ ऑगस्ट २०१९

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, पालघरचे पहिले आमदार नवनीतभाई शहा यांचं काल सोमवारी २६ ऑगस्टला निधन झालं. सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पालघर परिसराच्या विकासासाठी अनेक आंदोलनं केली. संस्था उभारल्या. ज्येष्ठ पत्रकार, पालघरचे रहिवासी समीर मणियार यांनी नवनीतभाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी फेसबूक पोस्ट टाकलीय. त्या पोस्टचा हा संपादित अंश......


Card image cap
उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?
दिशा खातू
१२ जून २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे.


Card image cap
उद्या गुजरातमधे धडकणाऱ्या वादळाला वायू हे नाव कोणी दिलं?
दिशा खातू
१२ जून २०१९

सध्या संपूर्ण दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर वायू वादळाचं संकट आलंय. त्यामुळे चक्रिवादळ, मुसळधार पाऊस, पूर येण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या वादळामुळे आपल्याकडे पावसाला उशिरा सुरवात होणार आहे......


Card image cap
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
यशवंतराव चव्हाण  
०१ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला.


Card image cap
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
यशवंतराव चव्हाण  
०१ मे २०१९

आज १ मे. आपण सगळे मराठी माणसं महाराष्ट्र दिन साजरा करतो. पण इथवरचा हा प्रवास निव्वळ संघर्षाचा, लढ्याचा नाही. दोन राज्यांमधे फारकत होताना तिथे वाटाघाटींना खूप महत्त्व येतं. त्यासाठी कुणाचं तरी आर्थिक नुकसान होतं. अशा नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रानेही गुजरातला कोट्यवधी रुपये दिले. पण तिथे यशवंतरावांनी खूप भारी फॉर्म्युला काढला......


Card image cap
गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?
सचिन परब
०१ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी.


Card image cap
गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?
सचिन परब
०१ एप्रिल २०१९

आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे गुजरात भेटीवर गेले होते. तेव्हा नरेंद्र मोदींची त्यांनी तोंडभरून स्तुती केली. आता उद्धव ठाकरेही अमित शाहांचा अर्ज भरायला गुजरातला गेले. राज यांच्या गुजरात भेटीनंतर त्यांचं राजकारण गाळात जायला लागलं. तसंच उद्धव यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे का? मुंबईतल्या मराठी गुजराती अस्मिता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती तपासायला हवी......


Card image cap
मोदींच्या गुजरातमधे होणार दुरंगी लढत
दीपक पर्वतियार      
०६ मार्च २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्‍न सर्वांच्या मनात आहे


Card image cap
मोदींच्या गुजरातमधे होणार दुरंगी लढत
दीपक पर्वतियार      
०६ मार्च २०१९

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासाला गुजरात मॉडेलच्या रूपात त्यांनी देशासमोर मांडलं. पुढे याच मॉडेलच्या जोरावर मोदी मोठ्या बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी मोदी सज्ज झालेत, तेव्हा गुजरातची जनता त्यांना पुन्हा मागच्या वेळेप्रमाणेच पाठिंबा देणार का, हा प्रश्‍न सर्वांच्या मनात आहे.....