छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय......
२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय.
२२ मार्च म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर जनता कर्फ्यूचं आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. या थाळीनादात छत्तीसगडमधे २१ मार्चला नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या किंकाळ्या कुणालाच ऐकू आल्या नाहीत. छत्तीसगडमधे नक्षलवाद उरलाच नाहीय या समजाला छेद देणारी ही घटना होती, असं मत पत्रकार पवन डाहाट यांनी व्यक्त केलंय......