सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता.
सांगलीतल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नातल्या विधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सध्या सुरु झालेला वाद मिटकरी आणि वैदिक पुरोहितांमधला परस्पर वाद आहे. त्यात उगाच धर्म घुसवू नये. पण मिटकरींच्या भाषणातला ‘कन्यादान’ हा विधी नाकारण्यात कोणत्याही आई वडलांची हरकत नसावी. त्यांना जे जे हवं, ते दानातून मिळावं हा तर फंडा महात्मा बसवेश्वरांनीही नाकारला होता......
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.
आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे......
तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट.
तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं २५ मेला संगमनेर इथं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केलं होतं. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत वगात पोवाडेही गायले. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. कांताबाईंच्या याच आयुष्याची चित्तरकथा मांडणारी पत्रकार प्रशांत पवार यांची ही फेसबुक पोस्ट......
कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला.
कुंभमेळ्यासाठी ७० लाख जण हरिद्वारला गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यापैकी अनेकजण कोरोना घेऊन गावोगावी मरण भोगत आहेत, पसरवत आहेत. हे सारं धर्माच्या खोट्या कल्पनांमुळे झालंय. खरा धर्म तर वारीचा आहे. माणुसकीचा आहे. `वारी चुको नेदी हरी`, असं वारकरी विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला......
संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.
संतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल......
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.
आज संत तुकामांची जयंती. देशाच्या संतपरंपरतेले ते अतिशय महत्त्वाचे संत. वारकरी संप्रदायात विठ्ठल या देवतेबरोबरच संतांची मंदिरही उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे कीर्तनकार प्राचार्य परशुराम मराडे यांनी बीड जिल्हात तुकोबारायांचं अतिशय देखणं मंदिर उभारलंय. या मंदिरासोबत स्थापन केलेल्या सेवापीठातून अनेक उपक्रमही आयोजित केले जातात......
माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं.
माजी खासदार श्यामकांत मोरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या साजरं होतंय. गरिबांना स्वस्तात दोन वेळचं जेवण मिळवून देणारं आशिया खंडातलं पाहिलं कम्युनिटी किचन त्यांनी १९७२ला पुणे जिल्ह्यात सुरू केलं. महाराष्ट्रात झुणका भाकर योजनेपासून सध्या सुरू असलेल्या शिवभोजनापर्यंत आणि तामिळनाडूतल्या अम्मा किचनपर्यंत गाजलेल्या प्रकल्पांची मुळं शोधत आपल्याला श्यामकांत मोरेंपर्यंत जावं लागतं......
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख मुद्दामून देत आहोत.
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्ताने घरोघर श्राद्ध किंवा म्हाळ घातला जातो. पण ते संतांच्या शिकवणुकीचा विरोधात आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांनी पितृश्राद्धाला नकार दिलाय. हे सांगणारा संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर शंकर शेंडगे यांचा अभ्यासपूर्ण लेख मुद्दामून देत आहोत......
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.
कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात......
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत.
कीर्तनकार निवृत्तीबाबा वक्ते हे सध्या शरद पवारांविरोधात काढलेल्या पत्रकामुळे वादात सापडलेत. पण वादग्रस्त विधानं आणि कृती करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. त्यांची कीर्तनं माणसामाणसात द्वेष पसरवणारी असतात. सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायावर प्रतिगामी, सनातनी विचारांची मंडळी कब्जा करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा मंडळींचे निवृत्तीबाबा वक्ते हे प्रतिनिधी आहेत......
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात.
महात्मा गांधीजींची तीन माकडं जगप्रसिद्ध आहेत. पण या तीन माकडांची प्रेरणा गांधींना कुठुन मिळाली याची गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. ही प्रेरणा गांधींना तुकाराम आणि बसवण्णांकडून मिळाल्याचं दिसतं. त्याची मूळ आपल्याला तुकाराम आणि महात्मा बसवण्णा यांच्या रचनांमधे सापडतात......
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा......
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय......
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे.
संतांनी सांगितलं, ‘माणूस सर्वश्रेष्ठ आहे.’ संतांनी मनुष्य जातीला हा विश्वास दिला की, माणूस अमर आहे आणि बाकी सगळं मर्त्य आहे. माणूस हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सारं विश्व त्याच्यासाठी आहे. देव, धर्म, देश, राष्ट्र हे माणसासाठी आहे. जे माणसासाठी निरूपयोगी असेल ते ते माणूस फेकून देईल. ही संतांची शिकवण आहे......
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
आज १२ जुलै आषाढी एकादशी. कितीतरी दिवस झालेत, वारकरी पायी निघालेत विठूरायाच्या दर्शनाला निघून. ते आज पंढरपुरात पोचतायत. वारीत ते सगळ्या संतांचे अभंग म्हणतात. हे अगंभ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगणारा विकिपीडीयाच. या अभंगात ते सहज संत कबीरांचे दोहेसुद्धा म्हणतात. आता संत कबीर महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वारकऱ्यांना किती आपलेसे वाटतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही......
तुकाराम महाराजांच्या गाथा सगळ्यांना माहीत आहेत. तुकाराम महाराज आणि गाथा हे समीकरणच होऊन बसलंय. तुकोबांचे मंचरी अभंगही खूप महत्त्वाचे आहेत. ते आजही आपल्याला लिखित स्वरूपात बघायला मिळतात. त्या अभंगांच्या आणि तुकोबांच्या पाऊल खुणांचा घेतलेला हा शोध.
तुकाराम महाराजांच्या गाथा सगळ्यांना माहीत आहेत. तुकाराम महाराज आणि गाथा हे समीकरणच होऊन बसलंय. तुकोबांचे मंचरी अभंगही खूप महत्त्वाचे आहेत. ते आजही आपल्याला लिखित स्वरूपात बघायला मिळतात. त्या अभंगांच्या आणि तुकोबांच्या पाऊल खुणांचा घेतलेला हा शोध......
आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय.
आज वसंत पंचमी म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक जयंतीचा दिवस. आपल्याला वाटतं तुकोबा हे महाराष्ट्रापुरतेच. पण तुकोबांचं गारुड देशभरातल्या अनेकांवर होतं. त्यात महात्मा गांधी हे प्रमुख नाव. त्यांनी तर तुकोबांचे अभंगही इंग्रजीत अनुवादित केले होते. या दोन वैष्णवांमधलं अद्वैत पाहून आश्चर्य वाटतं. आज ते समजून घेणं फारच महत्त्वाचं झालंय. .....
यंदा २ फेब्रुवारीला संत तुकारामांचा जन्मोत्सव देहूमध्ये पहिल्यांदाच तारखेनुसार साजरा होणार आहे. मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेने त्याच्यासाठी तयारी केलीय. त्यामुळे समाजाला घडवणारे महापुरूष म्हणून संतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण होऊ शकतो.
यंदा २ फेब्रुवारीला संत तुकारामांचा जन्मोत्सव देहूमध्ये पहिल्यांदाच तारखेनुसार साजरा होणार आहे. मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेने त्याच्यासाठी तयारी केलीय. त्यामुळे समाजाला घडवणारे महापुरूष म्हणून संतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण होऊ शकतो......
आज कार्तिक वद्य त्रयोदशी. हा ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधीचा दिवस. वारकरी आज ज्ञानदेवांच्या समाधीशी लीन होण्यासाठी आळंदीला पोचतात. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांमधलं भक्कम नात्याला उजळा देणारा हा लेख.
आज कार्तिक वद्य त्रयोदशी. हा ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधीचा दिवस. वारकरी आज ज्ञानदेवांच्या समाधीशी लीन होण्यासाठी आळंदीला पोचतात. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांमधलं भक्कम नात्याला उजळा देणारा हा लेख. .....