काही माणसं सदासर्वदा प्रसन्न असतात. निराशा, उदासीनता त्यांच्या जवळपासही फिरकत नाही. प्रत्येक काम ही माणसं मनापासून करतात. फायदा-तोट्याच्या गणितात ती अडकत नाहीत. कधी कोणाशी स्पर्धा करत नाहीत. खूप सकारात्मक दृष्टीनं आयुष्य जगणाऱ्या अशा प्रेरणादायी माणसांमधील एक नाव होतं, प्राचार्य मदन धनकर. ते उत्कृष्ट शिक्षक, पत्रकार, लेखक तर होतेच, पण त्याही आधी ते विदर्भाच्या मातीतला कार्यकर्ता होते.
काही माणसं सदासर्वदा प्रसन्न असतात. निराशा, उदासीनता त्यांच्या जवळपासही फिरकत नाही. प्रत्येक काम ही माणसं मनापासून करतात. फायदा-तोट्याच्या गणितात ती अडकत नाहीत. कधी कोणाशी स्पर्धा करत नाहीत. खूप सकारात्मक दृष्टीनं आयुष्य जगणाऱ्या अशा प्रेरणादायी माणसांमधील एक नाव होतं, प्राचार्य मदन धनकर. ते उत्कृष्ट शिक्षक, पत्रकार, लेखक तर होतेच, पण त्याही आधी ते विदर्भाच्या मातीतला कार्यकर्ता होते......
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वातांनो, थोडासा गु्न्हा घडणार आहे… अशा रोकड्या शब्दात कष्टकऱ्यांच्या घामेजलेल्या वेदनेला शब्द देणारे कवी नारायण सुर्वे यांचा आज तेरावा स्मृतिदिन. मुंबईच्या रस्त्यावर सापडलेल्या या अनाथ मुलाला गंगाराम सुर्वे यांनी सांभाळलं. गिरण्यांचे भोंगे, चाळी, दाटीवाटीची वस्ती, कामगार चळवळी आणि त्यासोबत आलेल्या अनिश्चित जगण्याचीच मग कविता झाली, त्याची ही गोष्ट.
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वातांनो, थोडासा गु्न्हा घडणार आहे… अशा रोकड्या शब्दात कष्टकऱ्यांच्या घामेजलेल्या वेदनेला शब्द देणारे कवी नारायण सुर्वे यांचा आज तेरावा स्मृतिदिन. मुंबईच्या रस्त्यावर सापडलेल्या या अनाथ मुलाला गंगाराम सुर्वे यांनी सांभाळलं. गिरण्यांचे भोंगे, चाळी, दाटीवाटीची वस्ती, कामगार चळवळी आणि त्यासोबत आलेल्या अनिश्चित जगण्याचीच मग कविता झाली, त्याची ही गोष्ट......
ना. धों. महानोर गेले. ते निसर्ग कवी वगैरे होतेच. पण या कवीनं फक्त गोडगोड कविता केल्या नाहीत. ते स्वतः शेतकरी असल्यानं, त्यांनी शेतकऱ्याची वेदना अनुभवली होती. त्यामुळे शेतीचं पाणी, बियाण्यांचा गोंधळ, कर्जाचा पाश, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न घेऊन ते थेट रस्त्यावर उतरले. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट विधीमंडळात जाऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. त्यांनी मांडलेले मुद्दे आजही महत्त्वाचे आहेत.
ना. धों. महानोर गेले. ते निसर्ग कवी वगैरे होतेच. पण या कवीनं फक्त गोडगोड कविता केल्या नाहीत. ते स्वतः शेतकरी असल्यानं, त्यांनी शेतकऱ्याची वेदना अनुभवली होती. त्यामुळे शेतीचं पाणी, बियाण्यांचा गोंधळ, कर्जाचा पाश, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न घेऊन ते थेट रस्त्यावर उतरले. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट विधीमंडळात जाऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. त्यांनी मांडलेले मुद्दे आजही महत्त्वाचे आहेत......
शिरीष कणेकर गेले ही बातमी व्हॉट्सअपवरून वेगानं पसरली आणि अनेकांच्या स्टेटसला कणेकरांचे फोटो दिसू लागले. फेसबुकसारख्या सोशल मीडियावरूनही अनेकांनी त्यांच्या लेखनाविषयी, पुस्तकांविषयी, कार्यक्रमांविषयीच्या आठवणी शेअर केल्या. पण त्यांच्या जवळ असलेल्या काहींनी या हसवणाऱ्या लेखकाच्या मनातील दुखरा कोपरा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपण माणूस म्हणून तोही समजून घ्यायला हवा.
शिरीष कणेकर गेले ही बातमी व्हॉट्सअपवरून वेगानं पसरली आणि अनेकांच्या स्टेटसला कणेकरांचे फोटो दिसू लागले. फेसबुकसारख्या सोशल मीडियावरूनही अनेकांनी त्यांच्या लेखनाविषयी, पुस्तकांविषयी, कार्यक्रमांविषयीच्या आठवणी शेअर केल्या. पण त्यांच्या जवळ असलेल्या काहींनी या हसवणाऱ्या लेखकाच्या मनातील दुखरा कोपरा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपण माणूस म्हणून तोही समजून घ्यायला हवा......
'पिपिलिका मुक्तिधाम' ही लेखक बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली होती. अशातच वेगळी शैली असलेल्या ‘काळमेकर लाइव्ह’ या त्यांच्या नव्या कादंबरीचीही सध्या मराठी साहित्यवर्तुळात चर्चा होतेय. या कादंबरीतून बाळासाहेब लबडे यांनी कोरोना काळातल्या माणसाचं वर्तन, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती यांचं त्यांच्या हावभावातून, प्रतिक्रियेतून, विविध घटनांमधून साकार केलंय.
'पिपिलिका मुक्तिधाम' ही लेखक बाळासाहेब लबडे यांची कादंबरी मराठी कादंबरीतला मैलाचा दगड ठरली होती. अशातच वेगळी शैली असलेल्या ‘काळमेकर लाइव्ह’ या त्यांच्या नव्या कादंबरीचीही सध्या मराठी साहित्यवर्तुळात चर्चा होतेय. या कादंबरीतून बाळासाहेब लबडे यांनी कोरोना काळातल्या माणसाचं वर्तन, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती यांचं त्यांच्या हावभावातून, प्रतिक्रियेतून, विविध घटनांमधून साकार केलंय......
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश.
वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश......
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
वर्धा जिल्ह्यात ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झालीय. या संमेलनासाठी ज्येष्ठ वैचारिक लेखक न्या. नरेन्द्र चपळगावकर यांची अध्यक्षपदी निवड झालीय. लेखकांचं वैचारिक स्वातंत्र्य आणि साहित्याचं होऊ घातलेलं सरकारीकरण याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून संमेलनाध्यक्षीय भूमिका मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तेव्हा यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींसारखे नेते महाराष्ट्राची एका अर्थाने दैवत होती. त्यांची भाषा, त्यांची सुसंस्कृतता, त्यांचं बोलणं, वागणं या प्रकारचे जे आदर्श आपल्या डोळ्यांसमोर होते, त्याच्या एकदम रसातळाला आपण उभे आहोत. आज गल्लीतल्या गुंडांनी ज्या प्रकारची भाषा वापरायची, त्या प्रकारची भाषा महाराष्ट्रातली अनेक क्षेत्रातली मंडळी वापरताना दिसतात......
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख.
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमधे अनेकांना नाईलाजाने गावाकडे स्थलांतरित व्हावं लागलं. ब्राम्हो-भांडवली राजकीय व्यवस्थेच्या या दमनकारी निर्णयामुळे नाडल्या गेलेल्या सर्वहारा वर्गाचं जगणं ठळकपणे मांडणारी कादंबरी म्हणजेच ‘ते पन्नास दिवस’. लॉकडाऊनमधे मजुरांच्या जथ्थ्यासोबत राहून त्यांचं जगणं अनुभवणारे सामाजिक कार्यकर्ते पवन भगत यांच्या या कादंबरीची ओळख करून देणारा हा लेख......
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट.
जेएनयूतले तत्वज्ञानाचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं 'भुरा' हे आत्मकथन सध्या खूप चर्चेत आहे. याच आत्मकथनावर मराठवाडा साहित्य परिषदेनं निबंधवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आत्मकथनाबद्दल थेट घडिव, बेतीव, रचित तसंच डिमांडनुसार लिहिलं गेल्याचा सूर आळवला गेला. हा सूर कसा एकांगी आहे हे सांगणारी प्रा. दिलीप चव्हाण यांची फेसबुक पोस्ट......
उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही.
उस्मानाबादच्या तुळजापूर इथं शिवणकाम करत शब्दांचे धागे जुळवू पाहणाऱ्या कवी देविदास सौदागर यांची 'उसवण' ही पहिलीच कादंबरी. व्यवसायाने शिंपी असलेल्या विठोबाची कहाणी त्यांनी या कादंबरीत चित्रित केलीय. खरंतर कुठलीही कलाकृती सामाजिक व्यवस्थेतून आणि समाज बदलाच्या प्रक्रियेत होणाऱ्या संघर्षातून जन्माला येत असते. 'उसवण' ही कादंबरीही त्याला अपवाद नाही......
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे.
स्वातंत्र्यानंतर समाज एक होण्याऐवजी शंभर तुकड्यात विभागला गेला. साहित्यात तर तुमचं-आमचं अशी गटबाजी प्रचंड वाढली. या सगळ्यात कोण हरलं-जिंकलं हे महत्त्वाचं नसून, इथं माणुसकी पराभूत होते. माणसासाठी ही सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ लेखक इंद्रजीत भालेराव यांनी नुकतंच व्यक्त केलंय. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातले त्यांचे महत्वाचे मुद्दे......
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट.
मनीषा सबनीस यांच्या 'ऊर्मी' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. आसावरी काकडेंसारख्या संवेदशील कवयित्रिच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन झालं. यावेळी अक्षय वाटवे यांना या कवितांविषयी मनोगत मांडण्याची संधी मिळाली. त्याचं शब्दांकन असणारी अक्षय वाटवे यांची ही फेसबुक पोस्ट......
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही.
चार चपटे मासे हा विवेक कुडू यांचा कथासंग्रह शब्द प्रकाशनने प्रकाशित केलाय. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, कथेतून उभं राहणारं सामाजिक, आर्थिक, राजकीय, भोगोलिक, सांस्कृतिक पर्यावरण, कथेत केलेले प्रयोग असं सगळं यात आहे. या कथांमधली वसई ते डहाणू भागातल्या लोकांच्या जनजीवनाची, भाषेची अशी सखोल नोंद मराठी साहित्यात आजवर आलेली नाही......
लेखक नंदा खरे यांचं काल निधन झालं. ते आयआयटीयन होते. सिविल इंजिनियर. कॉण्ट्रॅक्टर म्हणून देशभर अनेक महत्त्वाची धरणं, रस्ते, पुल त्यांनी बांधले. सोबत मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं लिखाण केलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरातलं संशोधन कवेत घेऊन काल, आज, उद्यावर मराठीत लिहिणारा हा फक्त लेखक न उरता खऱ्या अर्थाने विचारवंत ठरला. लेखक राहुल बनसोडे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत.
लेखक नंदा खरे यांचं काल निधन झालं. ते आयआयटीयन होते. सिविल इंजिनियर. कॉण्ट्रॅक्टर म्हणून देशभर अनेक महत्त्वाची धरणं, रस्ते, पुल त्यांनी बांधले. सोबत मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं लिखाण केलं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगभरातलं संशोधन कवेत घेऊन काल, आज, उद्यावर मराठीत लिहिणारा हा फक्त लेखक न उरता खऱ्या अर्थाने विचारवंत ठरला. लेखक राहुल बनसोडे यांनी त्यांची घेतलेली ही मुलाखत......
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे.
महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेला ‘एक कैफियत’ हा बाळासाहेब लबडे यांचा गझलसंग्रह आहे. हा गझलसंग्रह समकालीन प्रश्नांनी उकल करणारा आणि शाश्वत मानवी जीवनाविषयी मंथन करणारा, अंतर्मुख करणारा, संस्कृतीला गदागदा हलवणारा आहे. त्याने मराठी गझलेच्या समृद्धतेत भर टाकलीय. तुमच्या आणि आमच्या मनाचा ठाव घेणारी ही गझल आहे......
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या 'चाव्या' या पुस्तकाची नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलीय. जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेलं महाराष्ट्राविषयीचं हे प्रकट चिंतन आहे. आपली झापडं उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ते वाचायलाच हवं. या पुस्तकावर ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ही फेसबुक पोस्ट......
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख.
आपल्या ५५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनिल अवचट यांनी समाजाला किती काय दिलं. साधना, युक्रांद, मुक्तांगण, विविधांगी लेखन असा त्यांचा प्रवास. समाजाकडून खूपच थोडं घेणारे आणि समाजाला खूप काही देऊन जाणारे अशी वर्गवारी केली तर, तर अवचटबाबा अव्वल स्थानी दिसेल. त्यांच्याविषयी विनोद शिरसाठ यांनी लिहीलेला साधना साप्ताहिकातला संपादकीय लेख......
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट.
‘सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे’ हा गणेश कनाटे यांचा कवितासंग्रह. वरातीत वाजवलं जाणारं सॅक्सोफोन, हे दृश्यच या कवीला कुरूप वाटतं. कारण या सॅक्सोफोनमधून जे सूर बाहेर पडतात, त्यातून ज्या सौंदर्य संवेदना जागृत होतात, त्या कवीला वरातीशी विसंगत वाटतात. त्याचा शोध घेऊ पाहणारी या कवितासंग्रहावरची प्रमोद मुनघाटे यांची ही फेसबुक पोस्ट......
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की.
नाशिक शहरात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गजबज सुरू झालीय. समृद्ध परंपरा हा कोणत्याही समाजाचा अभिमानाचा विषय असतो; पण त्यासाठी ती परंपरा लवचीक असावी लागते आणि समाजाच्या भल्यासाठी तिला क्वचित नवं रूपही घ्यावं लागतं. हा विचार मराठी सारस्वतांनी आता केला नाही, तर ‘उत्सव बहु थोर होत’ एवढ्यापुरतीच ही परंपरा उरेल, हे नक्की......
महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय.
महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांच्या जीवन चरित्रावरच्या १३ खंडांचं प्रकाशन बडोदा इथल्या साहित्य संमेलनात झालं. १३ खंडांतल्या ५० ग्रंथांचं प्रकाशन नाशिक इथल्या साहित्य संमेलनात होतंय. महाराजांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेम, साहित्याची माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांचा एक दुर्लक्षित पैलू आपल्यासमोर येतोय......
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख.
रहस्य कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांचं नुकतंच निधन झालं. सर्वसाधारण लेखक आपली सर्व पुस्तकांची मिळून १२०० पानं छापून आली तरी समाधानी असतो. नाईकांनी तर १२०८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कादंबऱ्यांपेक्षाही चढउतारांनी भरलेलं होतं. त्यांच्या या आयुष्याविषयी २०१४ मधे पणजीतल्या त्यांच्या घरी भेटून लिहिलेला लेख......
पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट......
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट......
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं.
ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी विजेते लेखक सतीश काळसेकर यांचं आज निधन झालंय. त्यानंतर अमरावतीतल्या एका बँकर तरुणाने, अन्वय जवळकरने, त्यांना फेसबुकवर पत्र लिहिलंय. सतीश काळसेकर वाचनसंस्कृती कशी घडवत होते, ते त्यात वाचता येतं......
संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे.
संपत मोरे यांचा 'मुलूखमाती' नावाचा कथासंग्रह आलाय. प्रदेश, समाजशोध, परिघावरचं जग, कुस्ती क्षेत्र आणि उपेक्षित समाजचित्रं अशा विषयांवरचं हे लेखन बहुविध स्वरूपाचं आहे. व्यक्ती तसंच प्रदेशावरच्या खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झालंय. समाजाविषयीच्या आंतरिक तळमळीचा आणि बांधिलकीचा गडद स्वर त्यामधे आहे......
सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते.
सुनीता बोर्डे यांची फिंद्री ही मनोविकास प्रकाशनाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. ही कादंबरी म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्या एका दलित स्त्रीच्या जीवनसंघर्षाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. संपूर्ण कादंबरीत जातपितृसत्ताक कुटुंबात बाईचं होणारं शोषण ठळकपणे येतं. त्याचबरोबर व्यवस्थेत तगून राहत दुःख मुक्तीसाठीची पराकोटीची धडपडही दिसून येते......
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं.
'झुम्कुळा' या २०१९ च्या पहिल्याच कथासंग्रहातून वसीमबार्री मणेर यांच्या बारा कथा आपल्या भेटीस येतात. वैविध्यपूर्ण अनुभवविश्व आणि आशावादाने भरलेल्या या सशक्त कथा मराठी साहित्य विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आहेत. यातल्या माणसांचे परस्परांशी असणारे नातेसंबंध सहकार्याचे, सहजीवनाचे आहेत. जाती-धर्माच्या तटबंद्या या लोकांना विभाजित करत नाहीत. त्याचं सुंदर दर्शन या कथासंग्रहातून घडतं......
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते.
'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' हा कवयित्री शरयू आसोलकर यांचा कवितासंग्रह. त्यातली 'अनुवाद' नावाची पहिलीच कविता आसोलकर यांच्या सशक्त अभिव्यक्तीची साक्ष आहे. उत्कट संवेदनांचा विस्तीर्ण पट उलगडणं, हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. कविता म्हणजे एक प्रकारचा आत्मसंवाद असतो, या आत्मसंवादाची प्रचिती त्यांच्या कवितेमधून येत राहते......
भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे.
भूमिकानिष्ठ लेखक म्हणून शरणकुमार लिंबाळे यांना ओळखलं जातं. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा दिसते. मानाचा समजला जाणारा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ त्यांच्या ‘सनातन’ कादंबरीला नुकताच जाहीर झालाय. त्यांची ही कादंबरी दोन संस्कृतींमधला संघर्ष चितारत सनातनी प्रवृत्तीवर परखड भाष्य करते. त्यामुळेच ते अर्ध्या-अधिक भारताचं वर्तमान आहे......
ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी.
ज्येष्ठ समीक्षक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील यांचं २ मार्चला निधन झालं. वाघोड सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चित्रकला शिक्षक ते प्राचार्य असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी खानदेशातली अनेक कवी, लेखकांना लिहितं केलं. त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत त्यांचे विद्यार्थी आणि कवी नामदेव कोळी......
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत.
मराठी जगातली दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती संपेल कशी? तिच्या नावाने गळा काढणारे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढतेय. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने सचिन परब यांचा ‘दिव्य मराठी’ला आलेला लेख इथं देत आहोत......
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला.
पत्रकार सदा डुम्बरे यांचं २५ फेब्रुवारीला निधन झालं. पत्रकार ते संपादक असा ३५ ते ३६ वर्षांचा अनुभव. त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा पोत सकाळबाह्य घटनांमधे सापडण्याची शक्यता अधिक वाटते. सकाळच्या मुशीत तयार होऊनही त्यांच्या विचारांना कधी एकारलेपण आलं नाही. संधी मिळेल तिथं त्यांनी आपली भूमिका मांडली. संपादकीय स्वातंत्र्याचा पूरेपूर उपयोग सांस्कृतिक, सामाजिक हितासाठीच केला......
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.
शंकर सारडा यांचं २८ जानेवारीला निधन झालं. हजारो पुस्तकांचं त्यांनी समीक्षण केलं. अनेक लेखकांना त्यांच्यामुळे ओळख मिळाली. असा साहित्यिक आणि सर्वव्यापी समीक्षक मराठीत दुसरा सापडत नाही. लेखक संजय सोनवणी यांनी सारडा यांच्यावर लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग......
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठीमधे विज्ञान लेखन खूप उशिरा सुरू झालं. पण या परंपरेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांनी ध्रुवताऱ्याची जागा पटकावली. त्यांना मिळालेलं अध्यक्षपद हा विज्ञान साहित्याचाच सन्मान आहे. त्यांच्या लेखनाला आदर्श मानत नवे विज्ञान लेखक घडतायत. त्यामागे सरांची लेखनशैली हे महत्त्वाचं कारण आहे......
देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं.
देशप्रेम आणि क्रांतीने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोमँटिक कविताही लिहिल्यात. वेलीवरची फुलं तोडताना तरुणीची चोळी कशी तटतटून येते किंवा महादेवाचे वीर्यबिंदू कसे ताऱ्यासारखे दिसतात, अशी वर्णनं त्यांच्या कवितेत सापडतात. सागरा प्राण तळमळलाच्या पलीकडे असणाऱ्या वि. दा. सावरकरांनाही आपण भेटायला हवं......
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय.
'आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी' या नादपूर्ण संगीताच्या गजरात ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात मोठ्या जल्लोषात पार पडलं. ग्रामीण भाग असूनही मिळालेला तुफान प्रतिसाद सर्वांनाच अनपेक्षित आणि चकित करणारा होता. अनेक जुन्या परंपरांना फाटा देत उस्मानाबादेतलं संमेलन कात टाकून नव्या रुपात अवतरलंय......
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. यानिमित्तानं उस्मानाबाद इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनुराधा पाटील यांनी छोटेखानी भाषण केलं. सध्याचं वाईट अर्थानं बदललेलं वास्तव हे लेखक आणि कलावंतांवरही दबाव निर्माण करतंय, असं मत त्यांनी यावेळी मांडलं......
`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल.
`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल. .....
लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं.
लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असं जेव्हा जेव्हा घडतं, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि विशेषत: साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांत ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत......
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत.
'बिल्वदल साखळी' या संस्थेकडून गोव्यातल्या सत्तरीत तालुका पातळीवर सातव्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनुजा जोशी यांनी केलेलं भाषण फारच गाजलं. या भाषणात गोव्यात निसर्गदत्त हिरवाळीसोबतच सरकारी अर्थिक भरभराट असतानाही इथल्या साहित्यात आलेल्या दुष्काळावर त्यांनी बोट ठेवलं. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश इथं देत आहोत......
‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते.
‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते......
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय......
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य.
उस्मानाबाद इथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीचं साहित्यिक वर्तुळातून स्वागत झालं. पण काही धार्मिक संघटनांनी या निवडीला विरोध केला. या वादावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांचं भाष्य......
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्ञानाचा संदेश देणाऱ्या संत नामदेव यांची आज पुण्यतिथी. नामदेव आपल्याला माहीत असतात ते फक्त देवाकडून जोरजबरदस्तीने नैवेद्य खाऊन घेणारे. शाळेच्या पुस्तकांमधे जग गाजवणारे नामदेव सापडतच नाहीत. पण संतसाहित्याचे अभ्यासक तरी हा ग्लोबल नामदेव कुठे मांडतात?.....
आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या.
आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या......
वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश.
वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश......
जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.
जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत......
साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय.
साहित्य संमेलनातल्या निमंत्रण वापसीला विरोध करून बहिष्कार घालणाऱ्या साहित्यिकांचाच निषेध करणाऱ्या पोस्ट आता वायरल होऊ लागल्यात. अर्थात त्यात सत्ताधाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांचा भरणा अधिक आहे. त्यांनी बहिष्काराला दहशतवादही ठरवून टाकलंय. .....
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण संयोजकांनी मागे घेण्याची महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना घडलीय. त्यावर ७ जानेवारी २०१९ रोजी छापायला गेलेल्या साधना साप्ताहिकाचे हे संपादकीय आहे. त्यात आयोजक संस्था, साहित्य महामंडळ, संमेलनाध्यक्ष आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्यात......
भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत.
भाषा संवादासाठी असते. पण आपण भाषेवरून वाद घालतो. नयनतारा सहगल यांना त्या केवळ इंग्रजीत लिहितात म्हणून विरोध होतो. हा निव्वळ मूर्खपणा आहे. कोतेपणा आहे. महाराष्ट्राची परंपरा ही नाही. आमचा वारसा सर्वसमावेशकतेचा आहे. संकुचितपणाचा नाही. पण आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा नाकारून बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतो आहोत......
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी.
पुण्यात १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज सुरवात झालीय. आझम कॅम्पस इथे ४, ५ आणि ६ जानेवारीला हे संमेलन होतंय. सुफी साहित्य, राजकीय समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. अलीम वकील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. धर्म आणि राजकारण यांचा विविधांगी वेध घेणाऱ्या त्यांच्या अध्यक्षीय भाषणातल्या १० गोष्टी......
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.
सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता......
खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध.
खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध......
राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा भाग दुसरा.
राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा भाग दुसरा......
राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
राजन गवस हे आपल्या ठाम भूमिकेसोबतच लिहित्या पोरांचा हात हातात घेणारे मराठीतले नावाजलेले साहित्यिक. गावच्या राजकारणातले अंतर्विरोध मांडणाऱ्या ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ मधे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. चौंडकं, भंडारभोग, रिवणावायली मुंगी, ब बळीचा या त्यांच्या गाजलेला साहित्यकृती आहेत. आज राजन गवस वयाच्या साठीत प्रवेश करताहेत. यानिमित्त यंदाच्या ‘अक्षरदान’ दिवाळी अंकात आलेल्या गवस यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश......
यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध.
यवतमाळला होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीय. यानिमित्तानं १८ वर्षांनी अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळालाय. ही निवड अनेकार्थांनी महत्वाची आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि अरुणा ढेरेंच्या साहित्यविषयक कामगिरीचा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेला हा वेध......