वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय.
वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय......
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक नामांकित व्यक्तींना एका चर्चासत्रासाठी बोलावलं होतं. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरेत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानिमित्तानेच या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी बॉलीवूडमधल्या अनेक नामांकित व्यक्तींना एका चर्चासत्रासाठी बोलावलं होतं. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तरेत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानिमित्तानेच या चर्चासत्राचं आयोजन केलं गेलं होतं......
उत्तरप्रदेशमधे पुन्हा एकदा भाजपची सत्ता आलीय. योगी आणि मोदी हे डबल इंजिन इथं बरंच चालल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालंय. हिंदुत्वापासून ते अगदी वेगवेगळ्या योजनांमधल्या लाभार्थ्यांचा फायदा घेत भाजपनं वोटबँक भक्कम केली. त्याचा फायदा त्यांना उत्तरप्रदेशच्या सत्तेत येण्यात झालाय.
उत्तरप्रदेशमधे पुन्हा एकदा भाजपची सत्ता आलीय. योगी आणि मोदी हे डबल इंजिन इथं बरंच चालल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालंय. हिंदुत्वापासून ते अगदी वेगवेगळ्या योजनांमधल्या लाभार्थ्यांचा फायदा घेत भाजपनं वोटबँक भक्कम केली. त्याचा फायदा त्यांना उत्तरप्रदेशच्या सत्तेत येण्यात झालाय......
१० मार्चला ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागेल. उत्तरप्रदेशकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. उत्तरप्रदेशमधे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण तसाच सरकारी योजनांचा गाजावाजा यांचे प्रयत्न झाले. यावर भाष्य करणारी एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांची फेसबुक पोस्ट.
१० मार्चला ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागेल. उत्तरप्रदेशकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. उत्तरप्रदेशमधे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण तसाच सरकारी योजनांचा गाजावाजा यांचे प्रयत्न झाले. यावर भाष्य करणारी एनडीटीवी इंडियाचे संपादक रवीश कुमार यांची फेसबुक पोस्ट......
उत्तरप्रदेशमधे सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं आहे. पण गेल्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलीय. कर्जाचा डोंगर वाढलाय. २०१७ला उत्तरप्रदेशमधे मोदी-योगी डबल इंजिनचा प्रयोग झाला. पण तो फेल गेल्याचं रिजर्व बँकेचे आकडे सांगतायत. राजकीय विश्लेषक सुबोध वर्मा यांनी उत्तरप्रदेशमधल्या या कारभाराचं विश्लेषण केलंय. न्यूजक्लिकवरच्या त्यांच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.
उत्तरप्रदेशमधे सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं आहे. पण गेल्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलीय. कर्जाचा डोंगर वाढलाय. २०१७ला उत्तरप्रदेशमधे मोदी-योगी डबल इंजिनचा प्रयोग झाला. पण तो फेल गेल्याचं रिजर्व बँकेचे आकडे सांगतायत. राजकीय विश्लेषक सुबोध वर्मा यांनी उत्तरप्रदेशमधल्या या कारभाराचं विश्लेषण केलंय. न्यूजक्लिकवरच्या त्यांच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......
पुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण.
पुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण......
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियांका गांधी असणार आहेत. त्या योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरतायत. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ अशी एक नवी घोषणा करून लोकांच्या मनात प्रियांका गांधींनी स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलाय. ही घोषणा करताना येणार्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या ४० टक्के उमेदवार या महिला असतील, असं जाहीर केलंय......
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. पण इंदिरा गांधी यांच्यापेक्षा विषम परिस्थिती प्रियांका यांच्यापुढे आहे. देशातल्या राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाचा प्रभाव अत्यंत क्षीण झालाय. या परिस्थितीत प्रियांका यांच्या रूपाने काँग्रेसने टाकलेला डाव काय करू शकतो याची उत्सुकता असेल......
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय.
अनेक जातींचा प्रभाव असणाऱ्या उत्तर प्रदेशमधे जातीय समीकरणाचा समतोल टिकवणं ही सत्तेत राहण्याची पूर्वअट आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी राज्यात प्रचंड रोष आहे. संघ-भाजपच्या उच्चस्तरीय नेतृत्वाने सगळ्या आमदारांशी चर्चा केली. त्यातले २५० आमदार आदित्यनाथ विरोधी आहेत असंही म्हटलं जातंय. त्यांना हटवण्याचा निर्णय मात्र भाजपने घेतलेला नाही. आदित्यनाथांचं असलेलं उपद्रव मूल्य आणि निवडणुका तोंडावर असताना भाजप कोणताही धोका घेत नाहीय......
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद.
उत्तरप्रदेशात मागच्या आठवड्यात एक घटना घडली. दोन कॅथलिक नन्स ना रेल्वे प्रवासात तरुणांच्या टोळक्याने त्रास दिला. पोशाखातली विशिष्ट धार्मिक ओळख लपवायचा त्यांना सल्ला देण्यात आला. यात पोलिसही सहभागी झाले. त्यावरून ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक ए.जे. फिलिप यांनी थेट गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. सध्या वायरल होत असलेल्या पत्राचा अनंत घोटगाळकर यांनी केलेला हा अनुवाद......
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं.
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली. ४ जागांवरून भाजपने ४४ जागांवर झेप घेतली. एमआयएमचं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी टीआरएसच्या जागा जवळपास निम्म्याने कमी झाल्या. तर, काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत चाललीय. धार्मिक ध्रुवीकरण जसं भाजपला फायदेशीर ठरतं. तसंच, ते एमआयएमला देखील फायदेशीर ठरल्याचं यातून दिसतं......
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल.
मुंबई महानगरीनं आपल्या मनोरंजन जगाची सगळी स्थित्यंतरं पाहिलीत. इथंच झिरोचे हिरो झाले. सुपरस्टार, सुपरडुपर स्टार्स, किंग खान झाले आणि मुंबईची मायानगरी ही स्वप्ननगरी झाली! आता मुंबईतून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलवली जाणार का, हा प्रश्न किंवा चर्चा कितपत गांभीर्यानं घ्यावी याबद्दल शंकाच आहे. मात्र या निमित्तानं मुंबईतल्या मनोरंजन क्षेत्राच्या गरजा आणि त्यांची पूर्ती याबद्दल काही सकारात्मक पावलं पडली तर ते अधिक स्वागतार्ह ठरेल......
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं.
तेलंगणातल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या लागेल. मोदी-शहा नीतीच्या 'पंचायत ते पार्लमेंट' या घोषणेमुळे भाजपसाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असतो. एका महापालिकेसाठी थेट अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीइतकं त्याला महत्व आलंय. तेलंगणा विधानसभेच्या सत्तेचा मार्ग या महापालिका निवडणुकीतलं यश अपयश ठरवतं असं म्हटलं जातं......
उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?
उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?.....
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय.
मधल्या काळात देशातल्या बहुसंख्य मध्यमवर्गाला हिंदू - मुस्लिमद्वेषी चर्चा आणि विध्वंसक अजेंड्यावर आनंदाचं भरतं यायचं. पुढे अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या गेल्या, बेरोजगार तरूण आणखी निराश झाले. अशात पुर्वीच्या गुदगुल्यांचं रुपांतर आता वेदनेत झालंय. मोदींना मिळालेला सरसकट पाठींबा हा देशात नंगानाच करण्यासाठी नव्हता. तर काम करण्यासाठी होता, हा सुर आता निघू लागलाय......
सध्या देशात निवडणुकीचा माहोल आहे. इतिहासाचे दाखले देऊन आरोप प्रत्यारोप होतायत. तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचाराला आले होते. ‘निजामासारखंच निवडणुकीनंतर एमआयएमच्या ओवेसींना हैदराबाद सोडावं लागेल,’ अशी टीका योगींनी केली. पण खरंच स्वातंत्र्यपूर्व काळात क्रूरकर्मा म्हणून ओळख मिळवलेला निजाम देश सोडून पळून गेला होता?
सध्या देशात निवडणुकीचा माहोल आहे. इतिहासाचे दाखले देऊन आरोप प्रत्यारोप होतायत. तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचाराला आले होते. ‘निजामासारखंच निवडणुकीनंतर एमआयएमच्या ओवेसींना हैदराबाद सोडावं लागेल,’ अशी टीका योगींनी केली. पण खरंच स्वातंत्र्यपूर्व काळात क्रूरकर्मा म्हणून ओळख मिळवलेला निजाम देश सोडून पळून गेला होता?.....