तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेले एर्दोगान पूर्वी ब्रेड आणि सरबत विकायचे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल वाद आहे. धर्म हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. सर्व सत्ता स्वतःकडे असावी अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेची वाट लावली, असा त्यांच्यावर आरोप होतोय. तरीही त्यांना मिळालेला निसटता विजय भारतासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा भारतद्वेष लपलेला नाही.
तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झालेले एर्दोगान पूर्वी ब्रेड आणि सरबत विकायचे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल वाद आहे. धर्म हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. सर्व सत्ता स्वतःकडे असावी अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेची वाट लावली, असा त्यांच्यावर आरोप होतोय. तरीही त्यांना मिळालेला निसटता विजय भारतासाठी अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा भारतद्वेष लपलेला नाही......
तुर्कस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. बहुसंख्य मुसलमान असलेल्या तुर्कस्तानातलं वैचारिक ध्रुवीकरण सध्या तरी माजी राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या पथ्यावर पडतंय. एकेकाळी कट्टर धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखल्या जाणार्या तुर्कस्तानच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी यशस्वीरित्या इस्लामचं स्थान केलंय. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी किलिकदरोग्लु यांची भूमिका धर्म आणि राजकारणाची फारकत करतेय.
तुर्कस्तानात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. बहुसंख्य मुसलमान असलेल्या तुर्कस्तानातलं वैचारिक ध्रुवीकरण सध्या तरी माजी राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्या पथ्यावर पडतंय. एकेकाळी कट्टर धर्मनिरपेक्षतेसाठी ओळखल्या जाणार्या तुर्कस्तानच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी यशस्वीरित्या इस्लामचं स्थान केलंय. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी किलिकदरोग्लु यांची भूमिका धर्म आणि राजकारणाची फारकत करतेय......