राहुल गांधींचं संसदीय सदस्यत्व संपल्यानंतर काँग्रेसला बिगरएनडीए पक्षांचा पाठिंबा मिळाला. मात्र विरोधकांची एकजूट करण्यात राहुल यांचं व्यक्तिमत्त्व हाच अडथळा आहे. काँग्रेसच्या राजकारणासाठी हा एक निर्णायक क्षण आहे. इंदिरा गांधी यांच्यावरही राहुल यांच्यासारखीच परिस्थिती ओढावली होती. पण त्या प्रतिकूल परिस्थितीतही राजकीय फायदा उठवण्याची संधी त्यांनी हातून निसटू दिली नव्हती.
राहुल गांधींचं संसदीय सदस्यत्व संपल्यानंतर काँग्रेसला बिगरएनडीए पक्षांचा पाठिंबा मिळाला. मात्र विरोधकांची एकजूट करण्यात राहुल यांचं व्यक्तिमत्त्व हाच अडथळा आहे. काँग्रेसच्या राजकारणासाठी हा एक निर्णायक क्षण आहे. इंदिरा गांधी यांच्यावरही राहुल यांच्यासारखीच परिस्थिती ओढावली होती. पण त्या प्रतिकूल परिस्थितीतही राजकीय फायदा उठवण्याची संधी त्यांनी हातून निसटू दिली नव्हती......
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अधिसूचना काढून त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं. इतका महत्त्वाचा आणि देशापुढे आक्रमकपणे नेण्याचा हा विषय असताना काँग्रेसचे नेते मात्र सुस्त असल्याचं चित्र आहे. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट......
छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं सांगण्यात आलं; पण काँग्रेसच्या भूमिकेत मवाळपणा राहिल, असा संदेश अधिवेशनातून इतर पक्षांना दिला गेला नाही. पक्षातली विसंगती जनसामान्यातली प्रतिमा संभ्रमित करायला पूरक ठरणारी आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं सांगण्यात आलं; पण काँग्रेसच्या भूमिकेत मवाळपणा राहिल, असा संदेश अधिवेशनातून इतर पक्षांना दिला गेला नाही. पक्षातली विसंगती जनसामान्यातली प्रतिमा संभ्रमित करायला पूरक ठरणारी आहे......
काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचं भवितव्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलं गेलंय. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आलंय.
काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचं भवितव्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलं गेलंय. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आलंय......
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षासोबतच सर्वसामान्यांनाही जोडून घेतलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राहुल यांची उभी केलेली पप्पू ही प्रतिमा या यात्रेमुळे फोल ठरतेय. राहुल गांधींमधे झालेल्या प्रगल्भ बदलाचे साक्षीदार असलेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी या यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने राहुल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षासोबतच सर्वसामान्यांनाही जोडून घेतलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राहुल यांची उभी केलेली पप्पू ही प्रतिमा या यात्रेमुळे फोल ठरतेय. राहुल गांधींमधे झालेल्या प्रगल्भ बदलाचे साक्षीदार असलेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी या यात्रेच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने राहुल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय......
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे सरकलीय. यात्रेबद्दलची लोकांमधली उत्सुकता कमी झालेली नाही. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर सर्वसामान्यांची, सामाजिक संघटनांची, शेतकरी, कष्टकऱ्यांची राहील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन आणि धोरण आखलं गेलं. त्यामुळे यात्रा सर्वसमावेशक झाली. या यात्रेत महाराष्ट्रातल्या टप्प्यात सहभागी झालेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांची या यात्रेबद्दलची निरिक्षणं.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून पुढे सरकलीय. यात्रेबद्दलची लोकांमधली उत्सुकता कमी झालेली नाही. ही यात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर सर्वसामान्यांची, सामाजिक संघटनांची, शेतकरी, कष्टकऱ्यांची राहील यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन आणि धोरण आखलं गेलं. त्यामुळे यात्रा सर्वसमावेशक झाली. या यात्रेत महाराष्ट्रातल्या टप्प्यात सहभागी झालेले पत्रकार प्रमोद चुंचूवार यांची या यात्रेबद्दलची निरिक्षणं......
दोन आठवड्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात पोचली. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेला यात्रेचा हा दोन आठवड्यांचा झंझावाती प्रवास २० नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात संपला. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणांनी महाराष्ट्रातलं आणि देशातलंही राजकीय तापमान चांगलंच वाढवलं.
दोन आठवड्यांपूर्वी ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात पोचली. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यापासून सुरु झालेला यात्रेचा हा दोन आठवड्यांचा झंझावाती प्रवास २० नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात संपला. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणांनी महाराष्ट्रातलं आणि देशातलंही राजकीय तापमान चांगलंच वाढवलं......
महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन.
महाराष्ट्र हा कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, असं महात्मा गांधी म्हणाले होते. या महाराष्ट्रातून चालताना राहुल गांधी यांनीही हा अनुभव घेतला. अक्षरशः हजारो सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राहुल गांधीसोबत महाराष्ट्रातल्या टप्प्यात चालले. ते या यात्रेत का सहभागी झाले, ते नक्की काय बोलले, हे देशासाठी महत्त्वाचं आहे. या मान्यवरांनी मांडलेल्या मतांचं हे संकलन......
राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट.
राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आलीय. याआधी राहुल गांधींची लोकांमधे 'पप्पू' अशी प्रतिमा तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला छेद देणारी ही यात्रा ठरतेय. लोकांमधे या यात्रेविषयी प्रचंड आवड, उत्सुकता, सद्भावना असल्याचं आपल्याला सोशल मीडियातून दिसतंय. पण प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी पत्रकार आसिफ कुरणे यांची ही फेसबुक पोस्ट......
अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल आजही गांधी परिवाराकडेच आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. तो खरा ठरू न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी खर्गे यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलीय.
अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा रिमोट कंट्रोल आजही गांधी परिवाराकडेच आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ शकतो. तो खरा ठरू न देण्याची सर्वात मोठी जबाबदारी खर्गे यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलीय......
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकात प्रवेश केलाय. खरंतर लोकजागृतीसाठी 'भारत यात्रा' ही संकल्पना महात्मा गांधी आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशात रुजवलीय. अनेक धार्मिक, राजकीय यात्रा देशाने पाहिल्यात. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय वाटली तरी; वास्तवात ती जनप्रबोधनाचीच आहे. त्यामुळे तिला बदनाम केलं जातंय.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकात प्रवेश केलाय. खरंतर लोकजागृतीसाठी 'भारत यात्रा' ही संकल्पना महात्मा गांधी आणि त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशात रुजवलीय. अनेक धार्मिक, राजकीय यात्रा देशाने पाहिल्यात. राहुल गांधी यांची यात्रा राजकीय वाटली तरी; वास्तवात ती जनप्रबोधनाचीच आहे. त्यामुळे तिला बदनाम केलं जातंय......
चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल कोणतीही इच्छाशक्ती दाखवली नाही. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या विचारांवर असलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही स्पष्टता नव्हती. प्रादेशिक पक्षांवर राहुल गांधींनी केलेली टीका ही आजच्या वास्तवात अनाठायी होती. अशा सर्वांचा विचार करता ‘चिंतन शिबिरातून हाती काय लागलं?’ असा प्रश्न पडतो.
चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल कोणतीही इच्छाशक्ती दाखवली नाही. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या विचारांवर असलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही स्पष्टता नव्हती. प्रादेशिक पक्षांवर राहुल गांधींनी केलेली टीका ही आजच्या वास्तवात अनाठायी होती. अशा सर्वांचा विचार करता ‘चिंतन शिबिरातून हाती काय लागलं?’ असा प्रश्न पडतो......
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसमधे विरोधाचे सूर उमटलेत. पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी; आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे जी-२३ वरून निर्माण झालेलं वादळ अद्याप शमलेलं नसतानाच आता प्रशांत किशोर यांच्यामुळे काँग्रेसमधे नवं वादळ निर्माण होताना दिसतंय.
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यावरून काँग्रेसमधे विरोधाचे सूर उमटलेत. पक्षात प्रवेश न देता सल्लागार म्हणून त्यांची सेवा घ्यावी; आघाडी, उमेदवारांची निवड, जागा याबाबत त्यांची कोणतीही भूमिका नसावी, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे जी-२३ वरून निर्माण झालेलं वादळ अद्याप शमलेलं नसतानाच आता प्रशांत किशोर यांच्यामुळे काँग्रेसमधे नवं वादळ निर्माण होताना दिसतंय......
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन' योजना जाहीर केली. सार्वजनिक संपत्ती पुढच्या चार वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. त्यातून ६ लाख कोटी उभे राहतील असं सरकारला वाटतंय. पण त्यावरून वादळ उठलंय. या योजनेआडून मोदी सरकार देशाची संपत्ती बड्या उद्योगपतींकडे देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन' योजना जाहीर केली. सार्वजनिक संपत्ती पुढच्या चार वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. त्यातून ६ लाख कोटी उभे राहतील असं सरकारला वाटतंय. पण त्यावरून वादळ उठलंय. या योजनेआडून मोदी सरकार देशाची संपत्ती बड्या उद्योगपतींकडे देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत......
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. पेगासस सारख्या मुद्यांमुळे विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले. राज्यसभेत विमा विधेयक आलं आणि गदारोळ झाला. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणत भर सभागृहात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या सगळ्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांची ही फेसबूक पोस्ट.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. पेगासस सारख्या मुद्यांमुळे विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले. राज्यसभेत विमा विधेयक आलं आणि गदारोळ झाला. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हणत भर सभागृहात राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या अश्रूंचा बांध फुटला. या सगळ्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांची ही फेसबूक पोस्ट......
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल......
लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही.
लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही......
काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाविषयी शिफारशी करणारे असंख्य अहवाल धूळखात पडलेत. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषयही थंडावलाय. यापूर्वी झालेल्या पराभावांचं पारदर्शक विश्लेषणही झालं नाही आणि येत्या निवडणुकांच्या दृष्टीने कोणतीच तयारीही दिसत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट अशी की, काँग्रेस अजूनही भाजपच्या हातचं खेळणंच बनून राहिलीय.
काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाविषयी शिफारशी करणारे असंख्य अहवाल धूळखात पडलेत. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषयही थंडावलाय. यापूर्वी झालेल्या पराभावांचं पारदर्शक विश्लेषणही झालं नाही आणि येत्या निवडणुकांच्या दृष्टीने कोणतीच तयारीही दिसत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट अशी की, काँग्रेस अजूनही भाजपच्या हातचं खेळणंच बनून राहिलीय......
देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे.
देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे......
फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत.
फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. .....
उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?
उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणानंतर भाजपच्या रथाची चाकं अजूनच खिळखिळी झालीयत. अनेक राज्यातल्या स्थानिक पक्षांनी भाजपला रामराम ठोकलाय. भाजपप्रणीत आघाडीत आता राम उरला नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काँग्रेस आली तर इतर अनेक राज्यांतही रान मोकळं होत जाईल. पण राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना हे शिवधनुष्य पेलवेल?.....
कोरोनावरचा साधासोप्पा उपाय म्हणून सगळ्याच देशांनी तडकाफडकी आपापले शटर खाली टाकले. भारतातही आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आता हे शटर उघडायचं कसं याचा मार्ग सापडेना. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. यात राजन यांनी लॉकडाऊन कसं उघडलं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं गाडं रूळावर आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितलं.
कोरोनावरचा साधासोप्पा उपाय म्हणून सगळ्याच देशांनी तडकाफडकी आपापले शटर खाली टाकले. भारतातही आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आता हे शटर उघडायचं कसं याचा मार्ग सापडेना. याच पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. यात राजन यांनी लॉकडाऊन कसं उघडलं पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचं गाडं रूळावर आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितलं......
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ.
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सत्तेचं गणित बिघडवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी आज ११ मार्चला भाजपमधे प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपप्रवेशाची निव्वळ औपचारिकताच उरली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी राजीनाम्यामागचं कारण सांगितलंय. काँग्रेसवर, त्यांच्या नेतेमंडळीवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा हा राजकीय अर्थ......
आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास.
आज २५ फेब्रुवारी. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. सावरकरांना जाऊन आता जवळपास ५६ वर्ष लोटलीत. पण अंदमानच्या सेल्युलर जेलमधे शिक्षा भोगलेल्या सावरकरांना आजही माफीच्या कोठडीतच उभं केलं जातं. राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याची चीड व्यक्त करताना भाजपने माफीची मागणी केली. हे माफी प्रकरण सावरकरांपर्यंत पोचवणारा हा सुरस, चमत्कारिक माहितीचा इतिहास......
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक जिंकलीय. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा दिल्लीकरांनी धुडकावून लावलाय. दिल्लीच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विखारी भाषेचा वापर केला होता. त्या सगळ्या प्रचार मोहिमेला जोराचा करंट लावण्याचं काम तमाम दिल्लीच्या मतदारांनी केल्याचं दिसतंय. काँग्रेसचं तर पानिपत झालंय.
अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक जिंकलीय. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा दिल्लीकरांनी धुडकावून लावलाय. दिल्लीच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विखारी भाषेचा वापर केला होता. त्या सगळ्या प्रचार मोहिमेला जोराचा करंट लावण्याचं काम तमाम दिल्लीच्या मतदारांनी केल्याचं दिसतंय. काँग्रेसचं तर पानिपत झालंय......
दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय.
दिल्ली विधानसभेचा उद्या ११ फेब्रुवारीला निकाल लागेल. शनिवारी मतदानानंतरच्या एक्झिट पोलमधे फिर एकबार केजरीवाल सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक फक्त कुणाचं सरकार येणार आणि जाणार यापुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीने सर्वशक्तिशाली भाजपचा येत्या काळाचा अजेंडा स्पष्ट केलाय. तसंच काँग्रेसचे मुद्दे काय असणार आहेत, हेही समोर आलंय......
निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. येत्या ८ फेब्रुवारीला होणार मतदानात दिल्लीकर आपल्या नेत्याचं भविष्य ठरवणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीपुढे आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे भाजपही २१ वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयार आहे.
निवडणूक आयोगाने आज दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. येत्या ८ फेब्रुवारीला होणार मतदानात दिल्लीकर आपल्या नेत्याचं भविष्य ठरवणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या सत्ताधारी आम आदमी पार्टीपुढे आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे भाजपही २१ वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयार आहे......
झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय. एक प्रकारे झारखंडच्या निवडणुकीत काँग्रेसने खेळलेलं हे ट्रम्प कार्डच आहे. हे कार्ड चालणार की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण आता हे कार्ड काढण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. झारखंडी भूमीवर फिरत असताना काढलेले हे चार अर्थ.
झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपतोय. शेवटच्या दिवशी काँग्रेसने प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलंय. एक प्रकारे झारखंडच्या निवडणुकीत काँग्रेसने खेळलेलं हे ट्रम्प कार्डच आहे. हे कार्ड चालणार की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. पण आता हे कार्ड काढण्याला मोठा राजकीय अर्थ आहे. झारखंडी भूमीवर फिरत असताना काढलेले हे चार अर्थ......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल......
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय.
यंदा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय अमेरिकन अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झालाय. एस्थेर डुफ्लो आणि मायकल क्रिमर यांच्यासोबतच त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलाय. जगाला गरिबीमुक्तीचा प्रयोगशील दृष्टीकोन देणाऱ्या त्रिकूटाचा हा गौरव आहे. बॅनर्जी यांचा तर आपल्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या भारतातल्या अर्थ राजकीय घडामोडींमधे मोठा वावर राहिलाय......
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या रविवारीच खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांनी आपले हुकमी पत्ते बाहेर काढले. प्रचाराला सुरवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेससाठी प्रचार केला. पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने दोघंही नेमकं काय बोलणार याकडे राजकारण्यांसोबतच मतदारांचंही लक्ष लागलं होतं......
भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?
भाजपने पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिलीय. त्यासाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींचं तिकीट कापण्यात आलंय. पण या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केलाय. कोथरूड हा ब्राम्हणबहुल मतदारसंघ आहे. भाजपसाठी कोथरूड हे काँग्रेसच्या वायनाडसारखं आहे का?.....
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय.
सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय......
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद.
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष नसणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांनी चार पानांचं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या पत्रात त्यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत. तसंच आयडिया ऑफ इंडियाची कल्पना धोक्यात आल्याची भीती व्यक्त केलीय. या पत्राचा हा मुद्देसुद अनुवाद......
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख......
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय.
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय......
भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख.
भाजपला मिळालेल्या यशाला कितीही शब्दांच्या उपमा दिल्या तरीही लोकसभा निव़डणुकीचा निकाल एकतर्फी लागला आहे. हा निकाल सगळ्यांसाठी आर्श्चयकारकच आहे. या निकालामागची कारणं काय आहेत. हा मोदींचा चमत्कार आहे की भाजप पक्षाने ग्राऊंड लेवलला केलेलं काम? मोदींची लाट नसतानाही सौम्य लाट कशी तयार झाली? याची उत्तर देणारा हा लेख......
आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल.
आज २३ मे हा जागतिक कासव दिन. कासव म्हटलं की ससा आणि कासवाची गोष्ट आठवते. त्यात हळू असला तरी चिवटपणे प्रयत्न करणारा कासव जिंकतो. पण लोकसभेच्या शर्यतीत वेगात असणारा ससा जिंकला. कारण त्याने हलगर्जी केली नाही. कासव कितीही चिवट असलं तरी ते मुळातच हळू असल्यामुळे फार मोठी मजल मारू शकलं नाही. मोदी विरुद्ध राहुल यांच्यातल्या स्पर्धेचा असा अर्थ लावून कासव दिन साजरा करता येईल......
दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न.
दुपारी एक वाजेपर्यंतच्या मतांच्या आघाडीचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकहाती विजयाच्या दिशेने जोरात घोडदौड सुरू असल्याचं स्पष्टच आहे. अंतिम निकाल येईपर्यंत त्यात आकडे थोडे वरखाली होऊ शकतील. पण निकालांची दिशा साधारणपणे अशीच असेल. या प्रचंड विजयामागची महत्त्वाची कारणं मांडण्याचा हा प्रयत्न......
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता.
एक्झिट पोलवाल्यांनी एका सूरात फिर एकबार मोदी सरकारचा नारा दिला. पण सत्तेच्या राजकारणात या नाऱ्याला काही अर्थ नाही. मतदारांनी कुणाच्या नावाचा नारा दिलाय हे महत्त्वाचं. हे ओळखूनच दिल्लीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष २३ मेनंतरची मोर्चेबांधणी करू लागलेत. या सगळ्या राजकारणात कुणाची सत्ता येऊ शकते, याबद्दलच्या पाच शक्यता......
सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे.
सगळ्या एक्झिट पोल्समधे येणार तर मोदीच यावर एकमत दिसलं. काही जणांनी तर भाजपप्रणित एनडीएला साडेतीनशेच्या घरात जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. पण एका एक्झिट पोलची आकडेवारी ही मोदी सरकार पाडणारी आणि यूपीएला सरकार स्थापन करण्याची संधी देणारी आहे......
एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं.
एक्झिट पोल आले. नरेंद्र मोदी आता जणू पंतप्रधान बनलेच अशा चर्चा सगळ्या चॅनलवरून सुरू झाल्या. तेही स्वाभाविक आहे, कारण सगळेच सर्वे काही खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे निकालाची दिशा दाखवणारे आकडे म्हणून या सन्मान करायलाच हवा. त्याचबरोबर एक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेतल्या मर्यादाही समजून घ्यायला हव्यात. आनंद किंवा दुःख साजरं करण्याआधी एक्झिट पोल म्हणजे काही निकाल नाही, याचंही भान ठेवायला हवं......
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात......
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?.....
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या रविवारी होतंय. मतदान झाल्यानंतरच्या क्षणापासून सगळीकडे एक्झिट पोल सुरू होतील. पण त्याआधीच सगळीकडे वेगवेगळी भाकितं येताहेत. निवडणुकीच्या विश्लेषणाच्या कोलाज स्पेशल लेखांतला हा एक लेख......
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय.
काँग्रेसमधे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे जोरात वाहताहेत. अशोक चव्हाणविरोधी गट दिल्लीत शड्डू ठोकून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारी आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, राजीव सातव यांचं प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार म्हणून नाव समोर येतंय......
भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय.
भाजपसाठी २०१४ सारखं वातावरण नाही. भाजपवाले गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत असले तरी जमिनीवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचं चौकीदार चोर हैं कॅम्पेनला दणक्यात रिस्पॉन्स मिळतोय. पण निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांनी काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जातो की काय असं बोललं जातंय......
लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे.
लोकसभा निवडणुकीचा नूर आता पुरता सेट झालाय. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनाही निवडणूक कुठल्या दिशेने जातेय याचाही अंदाज आलाय. यूपी यंदा भाजपला जड जातेय. त्यामुळे कुणाची सत्ता येणार हे पुढच्या चार टप्प्यांमधे ठरणार आहे. त्यासाठी दोघांनीही सारी ताकद पणाला लावलीय. भाजपची तर या टप्प्यांमधे करो किंवा मरोसारखी अवस्था आहे......
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेताच मिनिमम गवरमेंट, मॅक्झिमम गवर्नंसचा नारा दिला. मी चौकीदारासारखं देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं सांगितलं. पण नंतरच्या काळात चौकीदाराभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेसने चौकीदार ही चोर हैं, असा आरोप केला. मग मोदींनी मैं भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. पण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपात चौकीदार चोर नसूही शकतो......
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आला. भाजपचा येण्याच्या मार्गावर आहे. ही औपचारिकता आहे की अपरिहार्यता? सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या शर्यतीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मर्यादितचं राहिलीय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या मोर्चेबांधणीवर प्रकाश टाकणारा हा लेख......
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट.
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या प्रश्नांना उत्तर दिली. सोशल मीडियावर काल दिवसभर राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची चर्चा होती. हा कार्यक्रम पुण्यात घेत काँग्रेसने महाराष्ट्रातल्या तरुणाईपुढे आपला अजेंडा मांडला. या कार्यक्रमाचा हा लाईव रिपोर्ट......
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?
राहुल गांधींनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःच नरेटीव उभं केलं. त्यामुळे भाजप समर्थकांची खूप गोची झाली. काँग्रेस समर्थक भाजपवाल्यांना चौकीदार चोर है म्हणून चिडवत होते. यावर मोदी समर्थकांकडे काही उत्तरच नव्हतं. मात्र आता मोदींनी आपल्या समर्थकांना मैं भी चौकीदार म्हणायला लावत ही कोंडी फोडलीय. याचा विरोधक कसा सामना करणार?.....
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय.
आजवर नरेंद्र मोदींवर टीका या निगेटिव अजेंड्यावर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यातून आपला टोन बदललाय. बऱ्यापैकी जमिनीवर राहून नवे वायदे केलेत. रोजगार आणि शेतीची समस्या सोडवण्याची पाच मोठी आश्वासनं दिलीत. `हम निभाएंगे` असं म्हणत गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणारी न्याय योजना हाच काँग्रेसचा निवडणुकीचा अजेंडा असल्याचं या जाहीरनाम्यातून स्पष्ट झालंय......
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे.
काँग्रेस देशभरात अनपेक्षितपणे खूपच विचारपूर्वक पावलं टाकताना दिसतेय. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसची अनेक आडाखे चुकताहेत. तिकीटवाटपात घोळ सुरू आहे. सगळं नेतृत्व प्रभावहीन वाटतंय. आता हायकमांड जागं झालंय. दिल्लीहून नेतेमंडळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पण हे बैल गेला आणि झोपा केल्यासारखं आहे......
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?.....
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
डीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारात घोटाळा केल्याची टीका केली. त्याच्या पुराव्यादाखल ऑडियो टेप दिली. त्याने देशाच्या राजकारणापेक्षाही गोव्याच्या छोट्याशा राजकारणात मोठं वादळ आलंय. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत......