'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय.
'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा जयंत पवार यांचा कथासंग्रह. यातलं गोष्टीचं रूप आपल्या आतल्या जाणिवांच्या शक्यतेला आव्हान देता-देता जगण्याच्या अभावग्रस्त अस्तित्वाचं भयावह आणि करुणदायक रूप आपल्या समोर मांडत जातं. मृत्यूशी हितगुज करत मानवी जगण्याचा, सुख-दुःखाचा विशाल पट जयंत पवारांनी या कथांमधून मांडलाय......
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे.
लेखक ज्ञानेश्वर दमाहे यांचं नुकतच निधन झालं. गेल्या ३० वर्षापासून पुणे-मुंबई सोबतच राज्यभरातल्या वाचकांना आपल्या वऱ्हाडी लिखाणानं त्यांनी खिळवून ठेवलं. असंख्य किलोमीटरचा फेरफटका मारला. इतिहासाच्या पाऊलखुणा लेखनबद्ध केल्या. सर्वसामान्य वाचकांना ऐतिहासिक नजराणाही पेश केला. सहज फेरफटका मारताना एखाद्या व्यक्तीचं ते खुमासदार वर्णन आणि तितकंच हटके सादरीकरणही करायचे......
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.
प्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या 'श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम' या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. हे राजकारण्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा वेगळं वाटतं. पण आपल्या देशात लिहित्या नेत्यांची एक मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या देशातल्या पिढ्या घडवल्यात......
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध......
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत.
मनोरंजन ब्यापारी बंगाली भाषेतले महत्वाचे लेखक. एक साधा रिक्षा चालक ते साहित्यिक हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. त्यात चढउतार आहेत तसं भारतीय साहित्य विश्वानं केलेलं दुर्लक्षही आहे. पोटापाण्याची सोय म्हणून त्यांना कोलकत्त्याच्या एका शाळेत कुक म्हणून काम करत असलेल्या ब्यापारी यांना नुकतीच लायब्ररीयन म्हणून पुस्तकांच्या सहवासात रहायची संधी त्यांना मिळतेय. त्यामुळे ते चर्चेचा विषयही ठरलेत......
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 'अर्थसंकल्प-सोप्या भाषेत' हे पुस्तक बाजारात आलंय. अलीकडच्या काळात आत्मचरित्र वगळता एखाद्या विषयावर राजकारण्यानं लिहिलेलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. राजकारण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अभ्यास असतो. खरंतर, अशा राजकारण्यांनी आपले राजकीय अनुभव लिहून काढावेत. पण आपल्याकडची अनेक नेतेमंडळी पुस्तकं लिहित नाहीत. असं का होतं?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 'अर्थसंकल्प-सोप्या भाषेत' हे पुस्तक बाजारात आलंय. अलीकडच्या काळात आत्मचरित्र वगळता एखाद्या विषयावर राजकारण्यानं लिहिलेलं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. राजकारण्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अभ्यास असतो. खरंतर, अशा राजकारण्यांनी आपले राजकीय अनुभव लिहून काढावेत. पण आपल्याकडची अनेक नेतेमंडळी पुस्तकं लिहित नाहीत. असं का होतं?.....
कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश.
कवी, गीतकार, पटकथाकार, लेखक आणि उत्तम वक्ता असलेल्या जावेद अख्तर यांचा आज ७५ वा बड्डे. ते राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य होते. शेरोशायरीच्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांची राज्यसभेतली भाषणं गाजायची. त्यांचं शेवटचं भाषण तर खूपच गाजलं. वंदे मातरम, भारत माता की जय हा वाद होतो तेव्हा या भाषणाचा आवर्जून दाखला दिला जातो. त्या वायरल भाषणाचा हा संपादित अंश......
महान शायर कैफी आझमी यांची आज १०१ वी जयंती. आज गुगलनेही डूडल बनवून अख्तर हुसैन रिजवी म्हणजेच कैफी आझमींना अभिवादन केलंय. उत्तर प्रदेशातल्या आझमगढ इथे जन्मलेल्या कैफींनी ‘कर चले हम फिदा, जान-ओ-तन साथियों’ सारखी देशभक्तीपर गाणी लिहिली. तसचं ‘मकान’ सारख्या कवितेतून आपली मुलगी शबाना आझमी यांच्या कामाची प्रेरणा बनले. सोशल एक्टिविस्ट मुलीला घडवणाऱ्या कलंदर बापाची ही गोष्ट.
महान शायर कैफी आझमी यांची आज १०१ वी जयंती. आज गुगलनेही डूडल बनवून अख्तर हुसैन रिजवी म्हणजेच कैफी आझमींना अभिवादन केलंय. उत्तर प्रदेशातल्या आझमगढ इथे जन्मलेल्या कैफींनी ‘कर चले हम फिदा, जान-ओ-तन साथियों’ सारखी देशभक्तीपर गाणी लिहिली. तसचं ‘मकान’ सारख्या कवितेतून आपली मुलगी शबाना आझमी यांच्या कामाची प्रेरणा बनले. सोशल एक्टिविस्ट मुलीला घडवणाऱ्या कलंदर बापाची ही गोष्ट......
‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते.
‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते......
संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात आणि तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते.
संस्कृतीची चिकित्सा करणारे, नवे शोध घेणारे, विविध सांस्कृतिक अवकाशांचा संकर घडवून आणणारे, गणवेषात न वावरणारे लेखक सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ या कथेमधील बिशनसिंहासारखे वेडे ठरतात. ते कुठलेही राहत नाहीत. ते इकडचेही नसतात आणि तिकडचेही नसतात. त्यांना इथेही जागा नसते आणि तिथेही जागा नसते. .....
लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या लेखनात सतत अभिव्यक्तीचाच विचार असायचा. बोरकरांचं जगणं हा अस्वस्थ करणारा आलेख आहे. त्यांच्या लिखाणाविषयी आणि जगण्याविषयी शब्द रुची मासिकात अजीम नवाज राही यांचा लेख आलाय. त्या लेखाचा हा संपादित अंश.
लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या लेखनात सतत अभिव्यक्तीचाच विचार असायचा. बोरकरांचं जगणं हा अस्वस्थ करणारा आलेख आहे. त्यांच्या लिखाणाविषयी आणि जगण्याविषयी शब्द रुची मासिकात अजीम नवाज राही यांचा लेख आलाय. त्या लेखाचा हा संपादित अंश......
गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो.
गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाट्यलेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाने भारतीय रंगभूमी समृद्ध केली किंवा एका वेगळ्या उंचीवर नेली असंही म्हणता येईल. त्यांच्या नाटकांमधला आशय हा समाजवास्तवाशी भिडणारा होता. नाट्यतंत्र आणि लोकरंगभूमीच्या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग कर्नाडांच्या नाटकांमधे झालेला दिसतो......
गिरीश कर्नाड यांच्या जाण्याचं दु:ख साऱ्या जगाला आहे. त्यांनी आपलं नुसतं मनोरंजन केलं नाही, आपल्याला विचार करायला भाग पाडलं. मग ती त्यांची नाटकं असोत, सिनेमा असोत आणि त्यांचं जगणंही. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचा जगभर सन्मान झालाच, शिवाय ते जगभर आदरणीयही ठरले. आज आपण त्यांना शेवटचा निरोप देत आहोत. त्यांनी केलेलं काम मात्र अजरामर झालंय.
गिरीश कर्नाड यांच्या जाण्याचं दु:ख साऱ्या जगाला आहे. त्यांनी आपलं नुसतं मनोरंजन केलं नाही, आपल्याला विचार करायला भाग पाडलं. मग ती त्यांची नाटकं असोत, सिनेमा असोत आणि त्यांचं जगणंही. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींचा जगभर सन्मान झालाच, शिवाय ते जगभर आदरणीयही ठरले. आज आपण त्यांना शेवटचा निरोप देत आहोत. त्यांनी केलेलं काम मात्र अजरामर झालंय......