शंकराचार्यापासून उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांचे लेख ‘ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथात आहेत. रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी यासारखा दुसरा ग्रंथ नाही, असं नमूद केलंय. मात्र, काळाच्या ओघात ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ दुर्मिळ झाला. सध्याच्या अनेक मंडळींना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही. या दुर्मिळ ग्रंथाची माहिती करून देणारी भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट.
शंकराचार्यापासून उभ्या महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांचे लेख ‘ज्ञानेश्वर दर्शन’ ग्रंथात आहेत. रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी यासारखा दुसरा ग्रंथ नाही, असं नमूद केलंय. मात्र, काळाच्या ओघात ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन’ हा ग्रंथ दुर्मिळ झाला. सध्याच्या अनेक मंडळींना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही. या दुर्मिळ ग्रंथाची माहिती करून देणारी भूषण देशमुख यांची फेसबुक पोस्ट......
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत.
२०२१च्या बुद्धपौर्णिमेनिमित्त डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आलोकशाही या यूट्युब चॅनलसाठी कोलाजचे संपादक सचिन परब यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात बौद्ध, वारकरी आणि आंबेडकरी विचारांमधला ऋणानुबंध मांडला होता. ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ मासिकाच्या जून २०२१च्या अंकात योगेश सकपाळ यांनी या व्याख्यानाचं केलेलं शब्दांकन या आंबेडकर जयंतीनिमित्त इथं शेअर करत आहोत......
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय.
समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमधे असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणं दुरापास्त होतं. त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक काम केलं. त्यांच्या संजीवन समाधीचा ७२५ वा सोहळा २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सुरू होतोय......
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे.
आज आषाढी एकादशी. कुणी वारीची आठवण काढली की आपोआप आवंढा गिळला जातोय. शरीर घरात आहे, मन पंढरीच्या वाटेवर भिरभिरतंय. याला देवाने घेतलेली परीक्षा मानायचं आणि त्यालाही या परीक्षेत पास होऊन दाखवायचं. विरहाच्या आगीत भक्तीला झळाळून घ्यायचं. आता मार्ग एकच, `ठायीच बैठोनि करा एकचित्त, आवडी अनंती आळवावा.` हीच आता वारी आहे. हेच आता पंढरपूर आहे......
पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते.
पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते......
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच.
भागवत संप्रदायाचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय. नामदेवांनी स्वतःला वीर वारीकर म्हटले. ज्ञानोबांनीही आपल्या अभंगात वारीकर शब्द योजला आहे. म्हणजे वारी हे या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संत नामदेव-ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे. परंतु या वारीला दिंडी पताका घेऊन येणाऱ्या वारकऱ्यांचे सुसंघटित रूप दिले नामदेवादी संतांनीच......
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा.
कोरोना नसता तर येणाऱ्या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपुराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट `गरुडावर बैसोनि` पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणाऱ्या वारकऱ्यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना पडलाय खरा......
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा......
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय......
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
आज २५ एप्रिल. ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला. त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट आपल्या देव्हाऱ्यात केली. मोडक यांचा धर्म, अध्यात्माचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......