२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?
२००६ मधे आपल्याकडे आग प्रतिबंधक कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या निष्काळजी लोकांना आणि आगीला जबाबदार असणाऱ्यांना कारावासासह दंडाची तरतूद करण्यात आलीय. भंडारा इथल्या हॉस्पिटलमधे आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालंय. आता या आग प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी नेमक्या कुणाविरोधात वापरणार?.....
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र.
लॉकडाऊन लावल्यावरही कोविड-१९ पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊनमधे थोडीफार ढिलाई दिल्यावर तर परिस्थिती अजून बिकट झालीय. महाराष्ट्रातली परिस्थिती तर आणखी गंभीर बनतेय. रूग्णवाढीचा वेग वाढतोय तशी आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतेय. सर्वसामान्यांचं बेहाल जगणं चव्हाट्यावर येतंय. या साऱ्या परिस्थितीच्या अनुषंगानं एका सर्वसामान्य नागरिकानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे पत्र......
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर.
कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या वॉरिअर्ससाठी खरंच आता फुलं वाहण्याची गरज होती का, हा प्रश्न आहे. आणि तेही दिवसभरात २६४४ केसेस सापडल्याच्या बातम्या आल्या त्याच दिवशी आम्ही फुलं वाहतोय. मला चांगलं माहीत आहे, की आयटी सेलला कामाला लावून मी सैन्यदलाला विरोध करतोय, असा अपप्रचार होईल. पण ही काही सैन्यदलाला विरोध करण्याची गोष्ट नाही. सैन्यदलाकडून कधीही युद्ध अर्ध्यात असताना पुष्पवृष्टी केली जात नाही. ते सलामी देतात तीही पूर्ण विजय मिळाल्यावर......
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.
शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं......
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना.
सगळं जग सध्या जणू युद्धकाळात राहतंय. हे युद्ध सुरुय डोळ्यांना न दिसणाऱ्या, स्पर्शाला न जाणवणाऱ्या वायरसविरुद्ध. हरेकजण लढतोय. कुणी आपापल्या घरात बसून शत्रूला हुलकावणी देतंय. कुणी थेट सीमेवर अहोरात्र तैनात आहे. अशाच एका सैनिकाला पत्र लिहून व्यक्त केलेल्या या भावना......
भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी.
भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी......
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय.
कोरोना वायरसनं साऱ्या जगाला संकटात टाकलंय. पण या संकटाला तोंड द्याला सध्याच्या यंत्रणा फेल गेल्यात. साऱ्या यंत्रणांची पोलखोल झालीय. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातली सरकारं वेगवेगळ्या कामचलाऊ योजना जाहीर करताहेत. या सगळ्या योजनांचा तोंडवळा समाजवादी आहे. यानिमित्तानं जागतिकीकरणाने कुस बदललेलं जग पुन्हा आपल्या जुन्या वळणावर जाताना दिसतंय......
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला.
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. सध्या कोरोनाच्या निमित्ताने आज आपल्याला आरोग्यावर बोलावं लागेल. तेही आरोग्य विज्ञानावर, हेल्थ सायन्सवर. सध्या यातली पडद्यामागची एक ब्रांच खूप चर्चेत आहे, पॅथॉलॉजी. कोरोनाशी लढायचं तर टेस्ट ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना आपल्याला पॅथॉलॉजी समजून घ्यावी लागेल. त्याची बारीक बारीक माहिती देणारी ही लेखमाला......
माणूस वेंटिलेटरवर आहे म्हणजे तो गेलाच, असं अनेकांना वाटतं. पण वेंटिलेटर हे दररोज हजारो रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढतं. कोरोनात श्वसनसंस्थाच कुचकामी होत असल्याने वेंटिलेटर आणखी महत्त्वाचे ठरू लागलेत. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेंटिलेटरची निर्मिती जोरात केली जातेय. पण वेंटिलेटरमुळे कोरोनाच्या किती पेशंटचा जीव वाचू शकतो?
माणूस वेंटिलेटरवर आहे म्हणजे तो गेलाच, असं अनेकांना वाटतं. पण वेंटिलेटर हे दररोज हजारो रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढतं. कोरोनात श्वसनसंस्थाच कुचकामी होत असल्याने वेंटिलेटर आणखी महत्त्वाचे ठरू लागलेत. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेंटिलेटरची निर्मिती जोरात केली जातेय. पण वेंटिलेटरमुळे कोरोनाच्या किती पेशंटचा जीव वाचू शकतो?.....
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं.
मध्यंतरी टीवीवर निर्मलबाबा जोरात होता. तो कोणत्याही अडचणीवर एकदम सोपासा उपाय सांगायचा. पुढे उघड झालं की ते सारं थोतांड होतं. आज खुद्द पंतप्रधान कोरोनासारख्या महासंकटावर निर्मलबाबासारखेच सोपेसोपे तोडगे सांगत आहेत. ते त्यांचं निर्बुद्ध लोकांना वश करण्याचं तंत्र आहे. म्हणून आता आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलीय, स्वतःचं डोकं वापरायचं की कुणीतरी हाकलत असणारी मेंढरं बनायचं......
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?
आपल्यापैकी काहीजण वर्क फ्रॉम होम करून पोटापाण्याची सोय करतोय. पण २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरी पंचाईत केलीय ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी मजुरांची. कोरोनानं देशात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झालाय. तर लॉकडाऊनशी संबंधित वेगवेगळ्या अपघातांमधे वीसेक मजुरांचा बळी गेलाय.लॉकडाऊनमुळं कोरोनापेक्षाही भीषण संकट उभं होणार नाही ना?.....
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय.
दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन लढाया करून अमेरिकेनं जगभरात महासत्ता म्हणून आपला दबदबा निर्माण केलाय. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अमेरिकाच्या अचाट शक्तीची ताकद दरवर्षी येणाऱ्या चक्री वादळात दिसते. पण कोरोना वायरसपुढे मात्र अमेरिका हतबल झालीय. निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे अमेरिका गंभीर संकटात सापडलीय......
कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?
कोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही?.....
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?
कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?.....
कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय.
कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय......